ऑनलाइन सातबारा बघणे:- सातबारा हे मालकी हक्काचे महत्वाचे दस्तावेज आहे. शासनाने आता ONLINE सातबारा उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल किंवा PC/LAPTOP च्या साह्याने घरच्या घरी पाहू शकता. प्रत्येक वेळेस आपल्या जमिनीच्या सातबारा ची आवश्यकता असते. पिक विमा भरायचा असो किंवा इतर शासकीय कामे असोत सातबारा उतारा आवश्यक असतो. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सातबारा पाहू आणि काढू शकता. सातबारा कसा पाहायचा ते आपण खाली पाहणार आहोत.
सातबारा (7/12) काय असतो
भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. भारतात जास्तीत जास्त लोकांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन शेती आहे. स्वतः च्या मालकीच्या शेतीचे मालकी हक्काचे दस्तावेज म्हणजे सातबारा (7/12) असतो. या सातबारावर तुमच्या मालकी हक्काच्या जमिनीचा सगळा लेखा-जोखा असतो. सातबारावर तुमचे संपूर्ण नाव, तुमच्या नावावर असलेल्या शेतीचे एकूण शेत्र, वहीती योग्य जमीन, पोट खराब जमीन, शेतात जर विहीर किंवा बोर असेल तर त्याचा तपशील इत्यादी गोष्टी तुमच्या सातबारावर असतात.
ऑनलाइन सातबारा बघणे
सद्या डिजिटल युग आहे तुम्ही आज बऱ्याच गोष्टींची सुविधा घर बसल्या मिळवू शकता. पूर्वी सातबारा बघायचा म्हणले तर तुम्हाला तुमच्या गावाला असणाऱ्या तलाठ्याकडे जावे लागत असे, पण आत्ता मात्र तुम्हाला कुठे हि जायची आवश्यकता नाही तुम्ही सातबारा गावातच बघू शकता किंवा काढू शकता. ऑनलाईन सातबारा कसा बघायचा ते आपण पाहू.
- ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी तुम्हाला तुमचा गट नंबर/ सर्वे नंबर माहित असायला हवा.
- सर्वप्रथम तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या वेब्सैत्वर जावे लागेल.
- ऑनलाईन सातबारा पाहण्यसाठी तुम्ही महाभूलेख च्या वेबसाईट वरून किंवा google वर ऑनलाईन सातबारा टाईप करून महाभूलेख च्या वेबसाईट वर जावू शकता.
- महाभूलेख च्या वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या पृष्ठ वर तुमचा जिल्हा, तालुका, तुमचे गाव इत्यादी निवडायचे आहे.
- पहिल्या रकान्यात तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्या नंतर GO या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर पुढील पृष्ठ वर ओपेन झालेल्या तुमच्या विभागात तुम्हाला जी माहिती पहायची आहे, 7/12 , 8 अ , मालमत्ता पत्र त्या समोर टिक करायचे आहे.
- त्या नंतर खालील बोक्ष मध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- जिल्हा निवडल्या नंतर त्या खाली तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- तालुका निवडल्या नंतर त्या खाली तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- गाव निवडल्या नंतर खाली चेक बॉक्स मध्ये तुम्हाला सर्वे नंबर/गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव इत्यादी मधुन एका चेक बॉक्स वर टिक करायचे आहे.
- सर्वे नंबर/गट नंबर वर टिक करताच खालील रकान्यात तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. वरील इतर पर्याय निवडून ही तुम्ही सातबारा बघू शकता.
- सर्वे नंबर/गट नंबर टाकून पुढील शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- शोधा बटनावर क्लिक करताच तुम्हाला खालील रकान्यात सर्वे नंबर/गट नंबर पुन्हा निवडायचा आहे.
- सर्वे नंबर/गट नंबर निवडल्या नंतर त्या खालील रकान्यात तुम्ही तुमची भाषा निवडू शकता आणि खाली रकान्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकून 7/12 पहा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्या नंतर पुढील पेज वर तुम्हाल दिसणारा कॅप्चा बॉक्स मध्ये टाकून Verify Captcha to view 7/12 वरती क्लिक करायचे आहे.
- Verify Captcha to view 7/12 वरती क्लिक करताच तुमच्या समोर तुमची सातबारा ओपन होईल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मालकी हक्काची ऑनलाइन सातबारा बघू शकता.
Digitally signed 7/12 डिजिटल सातबारा कसा काढायचा
सातबारा बऱ्शायाच वेळेस शासकीय कामासाठी वापरावी लागते. महाभूलेख वरील सातबारा शासकीय कामाला चालत नाही. शासकीय कामाला डिजिटल सही असलेली सातबारा लागते, डिजिटल सातबारा शासकीय विभागात ग्राह्य धरली जाते. शासकीय कामाला लागणारी डिजिटल सातबारा कशी काढायची ते आपण पाहू.
डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर आल्या नंतर समोरील पृष्ठ वर डाव्या बाजूला दिसणाऱ्या चोकटीत लॉगीन करावे लागेल.
- तुम्ही जर कायम लॉगीन करू इच्छित असाल तर Regular Login च्या चेक बॉक्स वर टिक करावी लागेल, आणि फक्त सातबारा काढण्यापुरते Login करायचे असेल तर OTP Based Login या पर्यायाला क्लिक करावे लागेल.
- OTP Based Login क्लिक करताच खालील रकान्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकून सेंड otp या वरती क्लिक करायचे आहे, आलेला otp भरून वेरीफाय करायचे आहे.
- Digitally signed 7/12 नावाचे नवीन पृष्ठ ओपन होईल, या पृष्ठ वर तुम्हाला तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव इत्यादी निवडायचे आहे.
- खालील रकान्यात अंकित सातबारा आणि अक्षरी सातबारा या दोन्हीतून एक पर्यायवर टिकमार्क करायचे आहे.
- अंकित सातबारा वरती क्लिक केल्या नंतर त्या खालील बॉक्स मध्ये गट नंबर/ सर्वे नंबर टाकायचा आहे.
- त्या खालील रकान्यात तुम्हाला गट नंबर/ सर्वे नंबर निवडायचा आहे.
- त्या नंतर त्या खलील रिचार्ज amount वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या फोन पे किंवा गुगल पे च्या साह्याने सातबाराची फीस जमा करायची आहे. एका वेळेला 35 रुपये फीस लागते.
- फीस जमा केल्या नंतर तुम्हाला सातबारा डाऊनलोड या बटनावर क्लिक करायची आहे.
- सातबारा डाऊनलोड वर क्लिक करताच तुमच्या समोर सातबारा डाऊनलोड झालेली असेल.
- प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही Digitally signed 7/12 ची प्रत कडू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही Digitally signed 7/12 काढू शकता आणि तुमच्या शासकीय कामासाठी वापरू शकता.
Conclusion
ऑनलाइन सातबारा बघणे: ONLINE 7/12 कसा काढायचा या लेखात आपण ऑनलाइन सातबारा कसा बघायचा आणि Digitally signed 7/12 कसा काढायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शेतकरी आपल्या मालकी हक्काचा सातबारा उतारा घर बसल्या काढू शकतात, त्या साठी कुठे जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल वर किंवा PC/LAPTOP वरून काढू शकता. मित्रानो माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे हि वाचा :-
- Natural Farming:नैसर्गिक शेती केंद्र शासनाची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
- नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा
- Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी
- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
- अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme
- MAHADBT Farmer Scheme: रब्बी बियाणे अनुदानासाठी असा करा अर्ज
अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा खालील लिंक ला क्लिक करा.