कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming:- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा तसेच पशुधनाच्या उत्पादक क्षमतेत वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, चाऱ्याची उपलब्धता वाढविणे व नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा उद्देश समोर ठेवून सन २०२१–२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारित पुनर्रचना करण्यात आलेली आहे.
उत्पादकता वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत एकाच ठिकाणी मांस, शेळीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन, चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, प्रति पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे व पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे असा उद्देश आहे.
या योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्राला संघटित क्षेत्राशी जोडून कच्च्या मालासाठी, उत्पादनासाठी व विक्रीसाठी एकमेकांशी जोडून विकास साधणे होय.
महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या भारत सरकारच्या या योजनेत कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान (Layer Poultry Farming) मिळवण्यासाठी काय पात्रता आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान – Layer Poultry Farming
शेतकरी बांधवांना व बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची एक संधी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या शेतात किंवा रिकाम्या जागेत शेड उभारून, चारापाण्याची व्यवस्था करून हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि शासनाच्या मदतीने आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकतात.
कुक्कुटपालनाबरोबरच शेळीपालन, लोकर मिळवण्यासाठी मेंढीपालन असे व्यवसाय आपण एकाच जागेत करू शकता. भारत सरकारच्या उद्यमी मित्र या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेती करता करता या जोडधंद्यामुळे आपण उद्योजक होऊ शकता. अंड्याच्या उत्पादनासाठी चांगल्या जातीच्या कोंबड्या पाळल्यास उत्पादनात आणखी वाढ होते.
पुढे काही कोंबड्यांच्या जाती दिल्या आहेत ज्या अंडी उत्पादनासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत. चला तर जाणून घेऊया या योजनेची उद्दिष्टे काय आहेत आणि यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत. याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती
कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही मांसासाठी तर काही अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात. आपण येथे कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान या योजनेची माहिती पाहत आहोत, त्यामुळे अंडी उत्पादनासाठीच्या चांगल्या जातींची माहिती येथे पाहू.
RIR (ऱ्होड आयलंड रेड) : वजन वाढ धीम्या गतीने होते. ६ महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरू होते. एका चक्रात २२० ते २५० अंडी उत्पादन (सर्वोत्कृष्ट लेयर).
ब्लॅक अस्ट्रॉलॉप : सर्वोत्कृष्ट बहुपयोगी ब्रीड. ३ महिन्यांत २ किलोपर्यंत वाढ व एका चक्रात १६० ते २०० अंडी उत्पादन.
ग्रामप्रिया : १८० ते २०० अंडी उत्पादन.
देहलम रेड : प्रतिवर्षी सुमारे २०० अंडी उत्पादन.
गिरीराज : २ महिन्यांत १ किलो वजन वाढ व एका अंडी चक्रात १५० अंडी उत्पादन.
वनराज : २ महिन्यांत १ किलो वजन वाढ व एका अंडी चक्रात १२० ते १६० अंडी उत्पादन.
कडकनाथ : औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध देशी वाण. वजनवाढ धीमी असते परंतु पौष्टिक. ५ महिन्यांत १ किलो वाढ व एका चक्रात ६० ते ८० अंडी उत्पादन.
या जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आहेत. शिवाय अंडी उत्पादनासाठीही या उत्कृष्ट आहेत.
कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान – अमलबजावणी यंत्रणा
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
पात्र संस्था – व्यक्तिगत / FPO / FCOs / JLG / कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत संस्था.
१) अर्जदाराने https://www.nlm.udyamimitra.in या पोर्टलवर NLM च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर करावा.
२) राज्य अमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची छाननी करून पात्र अर्जास ऑनलाइन मंजुरी देईल व सदर अर्ज बँकेकडे मंजुरीसाठी सादर होईल.
३) बँकेने कर्ज पुरवठ्याची हमी दिल्यानंतर सदर प्रकल्प राज्याच्या कार्यकारी समितीसमोर (SLEC) मंजुरीसाठी सादर केला जाईल.
४) सदर प्रकल्पाला SLEC द्वारे शिफारस प्राप्त झाल्यानंतर SIA (State Implementing Agency) सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करेल व प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर होईल.
अर्ज कसा करायचा
कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान (Layer Poultry Farming) योजनेसाठी भारत सरकारच्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या UDYAMI MITRA या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
पोर्टल उघडल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या Login बटणावर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकायचा असतो. त्यानंतर OTP येतो, तो OTP पोर्टलवर प्रविष्ट करावा लागतो. त्यानंतर उघडलेला फॉर्म ४ स्टेपमध्ये पूर्ण भरावा लागतो.
Layer Poultry Farming – योजनेची उद्दिष्टे
१) कुक्कुटपालन, वराहपालन आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती करणे.
२) जातींच्या सुधारणेद्वारे प्रति पशू उत्पादकता वाढविणे.
३) मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ करणे.
४) चारा व खाद्याची उपलब्धता वाढविणे आणि चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे.
५) चारा प्रक्रिया युनिटच्या स्थापनेस प्रोत्साहन देणे.
६) शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
७) कुक्कुटपालन, मेंढी, शेळी आणि चारा या क्षेत्रांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे.
८) शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देणे.
९) उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण व तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
पात्रता निकष
१) अर्जदार प्रशिक्षित असावा किंवा त्याच्याकडे तज्ञ व अनुभवी कर्मचारी असावेत.
२) अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँकेकडून प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र असणे आवश्यक.
३) प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर जागा असणे आवश्यक.
४) KYC साठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक.
५) अर्ज करताना सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक.
कागदपत्रे
१) प्रकल्प प्रस्ताव (त्रुटीविरहित)
२) प्रशिक्षण / अनुभव प्रमाणपत्र
३) जमीन असल्यास ७/१२ उतारा किंवा भाडेकरार
४) प्रकल्प स्थळाचे जिओ टॅगिंग फोटो
५) भांडवल किंवा बँक कर्जाचा पुरावा
६) आधार कार्ड
७) पॅन कार्ड
८) रहिवासी पुरावा
९) बँकेचे ६ महिन्यांचे स्टेटमेंट
१०) कॅन्सल चेक
११) पासपोर्ट साइज फोटो
१२) शैक्षणिक प्रमाणपत्र
१३) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१४) GST प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१५) कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO / FCO / Sec.8 कंपनी)
१६) मागील ३ वर्षांचा ऑडिट रिपोर्ट (लागू असल्यास)
१७) मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (लागू असल्यास)
अनुदान
अंड्यावरील कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
टीप : अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
Conclusion
वरील लेखामध्ये आपण Layer Poultry Farming म्हणजेच अंड्यावरील कोंबडीपालनासाठी मिळणाऱ्या २५ लाख अनुदान योजनेची सविस्तर माहिती पाहिली. भारत सरकार रोजगार निर्मितीसाठी विविध योजना राबवत असते.
अंड्यावरील कुक्कुटपालन ही योजना शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. योग्य माहिती व सूचनांनुसार प्रस्ताव तयार केल्यास या योजनेचा लाभ मिळण्यास निश्चितच मदत होईल.
आम्ही आमच्या लेखांच्या माध्यमातून योजनांची अचूक आणि सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अशाच नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Subscribe करा. तसेच आमच्या WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि ही माहिती इतर गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा. शेअर करायला विसरू नका.
हे पण वाचा
बांधकाम कामगारांना मिळणार १ रुपयात धान्या कोठ्या आणि ३० भांडे
household item kit distribution: बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तुसंच ऑनलाइन अर्ज सरू
Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती
