PM Vishvakarma Yojana 2026: विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेतून ₹3 लाखांपर्यंत विनातारण कर्ज, प्रशिक्षण व ₹15,000 टूलकिट
आपल्या भारत देशात अनेक पारंपरिक कारागीर आढळतात, जे त्यांचा पिढीजात व्यवसाय करत असतात. या कारागिरांचा विचार केला तर आजच्या मशिनरीच्या जमान्यात त्यांचा व्यवसाय मोडकळीस आलेला दिसतो. आधुनिक साधनसामग्री नसल्यामुळे त्यांच्या हातकलेच्या व्यवसायाची जागा आज मशिनांनी घेतली आहे. अशा पारंपरिक बारा बलुतेदार कारागिरांसाठी आणि त्यांचा पिढीजात व्यवसाय टिकवण्यासाठी विश्वकर्मा श्रम सम्मान योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात




















