कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पाण्याची उपलब्धता आहे परंतु पाणी उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी शासन कुसुम योजने अंतर्गत सोलार पंप फिट करून दिले जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून सोलार पंप बसवून दिले जातात. अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि पीएम कुसुम घटक योजना. इत्यादी योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार पंप बसवून दिले जातात. शेतकर्याची जमीन ओलिताखाली यावी आणि पर्यायाने विजेची बचत व्हावी या उद्देशाने शासन सदरील योजना राबवीत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Online अर्ज करावा लागतो. अर्ज करत असतांना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम महासेवा केंद्राकडून उसूल केली जाते. आज आपण कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कसे करायचे, ते हि तुमच्या मोबाईल वर या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना

पीएम कुसुम घटक-ब योजना, शासनाकडून सदरील कुसुम योजना सिंचन साधन उपलब्ध असणाऱ्या मात्र वीज जोडणी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. अल्पभूधारक आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन कुसुम योजनेतून सोलार पंप बसवून देते. सिंचनाचे साधन असतांना मात्र वीज जोडणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल पंप सारख्या खर्चिक मशीन वापरून शेती पिकांना पाणी द्यावे लागते, अशा शेतकऱ्यांना हि योजना अत्यंत उपयुक्त आहे. शासन सदरील योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना ९०% अनुदान देते. तसेच शेतकऱ्याच्या शेतीच्या एकूण क्षेत्रानुसार त्या मर्यादेच्या हिशेबाने सोलार पंप बसवून देते.

  • २.५ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना:- ३ HP सोलार पंप
  • ५ एकर क्षेत्रफळ असणाऱ्या शेतकऱ्याला:- ५ HP सोलार पंप
  • ५ एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या शेतकऱ्याला:- ७ HP सोलार पंप

अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या मर्यादेत सोलार पंप शासनाकडून दिले जातात. या सोलार पंपसाठी शासन ९०% अनुदान देते, तर उर्वरित लाभार्थी हिस्सा हा शेतकऱ्यांना भरावा लागतो.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र

कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी महासेवा केंद्राकडून  रजिस्ट्रेशन केल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पुढील प्रोसेससाठी कळविले जाते.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

कुसुम सोलार रजिस्ट्रेशन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी महासेवा केंद्रावर जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुसुम योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. कसे करायचे ते पुढे पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला PM Kusum Yojna च्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर गेल्या नंतर Aplication for new Offgrid Solar Pump वर Or Replacement of Existing diesel pump with solar pump हे पेज ओपन होईल.

नवीन पेजवर तुम्हाला पहिल्या पर्यायामद्ये तुमच्या कडे डिझेल पंप आहे का हे निवडायचे आहे. तिथे yes ( होय ) करायचे आहे. त्यानंतर पुढील रकान्यात कोणत्या इंधन वर चालते तिथे डिझेल निवडायचे आहे. पुढील रकान्यात पंप कोणत्या प्रकारचा आहे, तिथे AC निवडायचे आहे. पुढील रकान्यात डिझेल इंजिन उभे आहे कि, जमिनीवरील तिथे surface ( जमिनीवरील ) हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर किती HP चा आहे ती HP निवडायची आहे.  पुढील रकान्यात ऊर्जा निर्माण करणारे इंजिन आहे का तिथे होय निवडायचे आहे. आणि शेवटी डिझेलसाठी तुम्हाला वार्षिक खर्च किती येतो हे त्या पर्यायांमध्ये निवडायचे आहे.

खालील Personal & Land Details Of Applicant मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव, तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर, पुढील रकान्यात तुम्ही मागासवर्गीय असल्यास तुमचे कास्ट निवडायचे आहे. आणि शेवटी तुमचा e-mail टाकायचा आहे.

वरील माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला Payment For Online Application या बटनावर क्लिक करून तुम्हाला फॉर्म ची फीस Online भरावी लागेल. ती तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या फोनेपे किंवा इतर aap ने करू शकता.

✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Conclusion

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून या blog मध्ये आपण कुसुम योजनेचा मोबाईलवर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या बद्दल सविस्तर माहिती पहिली. कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र भरण्यासाठी तुम्हाला महासेवा केंद्रावर अव्वाच्यासव्वा पैसे देण्याची गरज नाही, ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर भरू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच माहिती साठी आम्हाला फॉलो करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Scroll to Top