ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान:- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती सुलभतेने करता यावी यासाठी शासन शेतकऱ्यांना अत्याधुनिक औजारे उपलब्ध करून देते. शासनाकडून ट्रॅक्टर वरील अनुदानाबरोबरच ट्रॅक्टर चलित औजारांवर ही शासन अनुदान देते. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे, आणि शेतकरी साधन व्हावा हा उद्देश शासनाचा आहे. आधुनिक ट्रॅक्टर आणि त्यावर चालणारी औजारे शेतकऱ्यांची मेहनत कमी करून त्यांच्या कामात गती आणतात. परंतु आधुनिक औजारांची किंमत जास्त असते, ती शेतकऱ्यांना परवडावी म्हणून शासन ट्रॅक्टर औजारांवर अनुदान देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या mahadbt पोर्टल वरून शेतकर्‍यांना शेती  कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर औजारांवर भरघोस अनुदान देते. शेतकर्‍यांना ट्रॅक्टर चलित औजारांवर किती अनुदान मिळते आणि कसा अर्ज करावा लागतो या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान

शेतकर्‍यांच्या उपयोगी पडणारी ट्रॅक्टर चलित औजारे

शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टर वर चालणारी काही अत्यावश्यक औजारे आहेत, जी शेतकऱ्यांना हवी असतात पण त्यांची किंमत जास्त असल्याने बऱ्याच वेळेस शेतकरी ती औजारे खरेदी करू शकत नाहीत. अशा वेळेस शासनाकडून शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या शेती औजारे अनुदान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

  1. नांगरणी यंत्र.
  2. रोटाव्हेटर.
  3. सीड ड्रिल मशीन/पेरणी यंत्र.
  4. मळणी यंत्र.
  5. पाळी यंत्र.
  6. बीबीएफ पेरणी यंत्र.
  7. कल्टीव्हेटर

इत्यादी अवजारे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असतात. या अवजारांची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाहीत, आणि या मुळे शेतकऱ्यांना या अवजारांच्या खरेदीसाठी अडचणीचा सामना करावा लागतो.

✅👉🏻 कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून

ट्रॅक्टर अवजारे अनुदान

शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टर चलित अवजारांवर अनुदान दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या mahadbt पोर्टलवरून कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वर तसेच ट्रॅक्टर चलित अवजारांवर अनुदान दिले जाते. mahadbt वर अर्ज केल्या नंतर तुमची निवड सदरील योजनेत झाल्यास शासनाकडून तुम्हाला अवजार खरेदीवर ५ ० % अनुदान दिले जाते. अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याला भरावी लागते. शासनाकडून दिले जाणारे अनुदान हे सरळ शेतकऱ्याच्या बँक अकॉउंट वर DBT द्वारे जमा केले जाते.

ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी कसा करायचा अर्ज

शासनाच्या ट्रॅक्टर अवजारे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या पोर्टल वरती जाऊन लॉगिन करावे लागेल mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टल वरती आल्यावर कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरती जाऊन ट्रॅक्टर चलित औजारे निवडावी लागतील. औजारे निवडल्या नंतर आणि अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला mahadbt द्वारे sms द्वारे कळविले जाते.

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी अर्ज केल्या नंतर पुढील प्रोसेस मध्ये लॉटरी मध्ये तुमचे नाव आल्यास तुम्हाला SMS द्वारे कळविले जाईल. त्या नंतर तुम्हाला कृषी तालुका कार्यालयाकडून निवड झालेल्या अवजारांसाठी पूर्व संमती दिली जाईल. पूर्व संमती मिळाल्यावर कृषी विभागाने ठरवून दिलेल्या एजेन्सी कडून तुम्हाला ते अवजार खरेदी करावे लागेल. अवजार खरेदी करत असतांना त्या अवजारांची पूर्ण किंमत तुम्हाला द्यावी लागेल. अवजार खरेदी केल्या नंतर मिळालेले बिल तुम्हाला MAHADBT च्या पोर्टल वर तुमची प्रोफाइल लॉगिन करून अपलोड करावे लागेल.

बिल अपलोड केल्या नंतर कृषी विभागाकडून तुमच्या खरेदी केलेल्या अवजाराच्या ५ ० % रक्कम तुमच्या बँक अकॉउंट मध्ये DBT च्या माध्येमातून जमा केली जाईल.

✅👉🏻 मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 – नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे

Conlusion

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान या ब्लॉग मध्ये आपण शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना  औजारे खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या 50%  अनुदान योजने बद्दल माहिती पहिली. कृषी विभागाच्या NAHADBT पोर्टल वरती जाऊन तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेऊ शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे किल्क करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top