ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

आदिवासी समाजाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. १९९२ मध्ये आदिवासी विकास आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.आणि आदिवासी विकास विभागा अंतर्गत २९ एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयांची निर्मिती करण्यात आली.ह्या एकात्मिक विकास प्रकल्प विभागीय कार्यालया मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. हयाच एकात्मिक विकास प्रकल्प विभागीय कार्यालया तर्फे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी  शबरी घरकुल योजना, वयक्तिक लाभाच्या योजना, आदिवासी बचतगट योजना, शेतीसाठीच्या विविध योजना,राबविल्या जातात. ह्या मधूनच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आदिवासी वस्त्यांच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना राबविली जाते.महाराष्ट्रातील ग्रामीण आणि नागरी भागामधील वाड्या वस्त्यावर राहत असलेल्या अधिवासी समाजाला गावांना जोडण्यासाठी आणि गावस्तरावरील सर्व सोई सुविधा आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्यावर पोहचविण्यासाठी शासनाची ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे.ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

चालातर मग ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना काय आहे, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, ही योजना कशी राबविली जाते, या योजने मधून कोणकोणती कामे वाड्या वस्त्यावर करता येतात, या योनेत बसण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, कुठकुठली कागतपत्र या योजनेसाठी आवश्यक असतात, या सर्व गोष्टींना आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना / Thakkar Bappa Adivasi Vasti Sudhar Yojna

आदिवासी समाजाच्या वाड्या/वस्त्या/प्रभाग या मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्सायाठी शासन सदरील योजना २००४ पासून राबवीत आहे. २०२१-२०२२ पासून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत आर्थिक निकषात बदल करण्यात आले असून, दलित वस्ती सुधार योजने प्रमाणे या योजनेच्या निकषात लोकसंख्या निहाय बदल करण्यात आला आहे.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतील आर्थिक निकषात बदल

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत आर्थिक निकषात बदल करण्यात आले असून २०२१-२०२२ पासून सदरील योजनेत लोकसंख्या नुसार बदल करण्यात आले असून गावाच्या एकूण लोकसंखे पैकी त्या गावातील अधिवासी लोक्संख्याची एकूण टक्केवारी ग्राह्य धरून त्या गावातील विकास कामांना सदरील योजनेतून निधी देण्याचे नवीन निकष लावण्यात आले आहेत. ज्या वाडी/वस्ती/प्रभाग मध्ये तुमाला विकास काम करायचे आहे, तेथील एकूण लोकसंखेच्या 50% ही आदिवासी लोकसंख्या असणे बंधन कारक आहे.तसे प्रमाणपत्र तत्सम अधिकाऱ्याचे असणे आवश्यक आहे, मात्र स्वतंत्र आदिवासी वस्ती अस्तित्वात असल्यास लोकसंखेच्या नियमाची सक्ती नाही आहे. पण स्वतंत्र वस्ती म्हणून प्रमाणपत्र आवश्यक आहे.

लोकसंखेच्या टक्केवारी नुसार दिला जाणारा निधी

वाडी/वस्ती/प्रभाग मधील एकूण आदिवासी लोकसंख्या. एकूण आदिवासी लोकसंख्या नुसार दिला जाणारा निधी.
१ ) ३००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी एक कोटी पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.
२ ) १५०० ते ३००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. ७५ लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.
३ ) १००० ते १४९९ पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. ५० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.
४ ) ५०० ते ९९९ पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. ४० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.
५ ) १०१ ते ४९९ पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. २० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.
६ ) १ ते १०० पर्यंत लोकसंख्या असलेल्या क्षेत्राच्या विकास कामासाठी. ५ लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो.

वरील प्रमाणे वाडी/वस्ती/प्रभाग मधील एकूण आदिवासी लोकसंखेच्या मर्यादे प्रमाणे विकास कामांना वरील योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जक़्तो.

आदिवासी विभाग आयुक्त कार्यालये

महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी 👉 विभाग कार्यालये pdf

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत करता येणारी कामे

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून वाडी/वस्ती/प्रभाग मध्ये विविध पायाभूत सोई सुविधांसाठी वेगवेगळी विकास कामे तुम्हाला करता येतात.गाव, वाडी,वस्ती,प्रभाग वरील आवश्यकतेच्या नुसार तूम्ही ग्रामपंचायत स्तरावर कामाची निवड करू शकतात. ग्रामपंचायत च्या सभेत तुम्हाला कामाची निवड करून तसा ठराव तुम्हाला प्रस्तावा सोबत जोडावा लागतो. या योजनेतून पुढील प्रमाणे कामे घेता येतात.

१ ) वाडी/वस्ती/प्रभाग मधील जोडरस्ते ,अंतर्गत सिमेंट रस्ते.

२ ) पाणीपुरवठा :- अ) पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करणे ब )फिल्टर प्लांट उभारणे क ) बोअर मारणे ड ) जुन्या विहिरीची दुरुस्ती ई ) नवीन विहीर व पाईप लाईन.

३ ) बंद गटार, नाल्या-मोऱ्या बांधणे.

४ ) आदिवासी वस्तीत विद्धुतीकरण करणे.

५ ) समाज मंदिर,मंगल कार्यालय बांधणे.

६ ) सार्वजनिक सोच्छालय व मुतार्या बांधणे.

७ ) स्मशान भूमी बांधणे.

८ ) नदीकाटची स्वरक्षण भिंत व घात बांधणे.

९ ) तीर्थ क्षेत्र व पर्यटनाचा विकास करणे.

इत्यादी योजनांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावर घेता येतो.

प्रस्ताव कसा तयार करायचा

वरील दिलेल्या कामा पैकी आपण ज्या कामाची निवड ग्रामपंचायत स्तरावर करताल त्या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तुम्हाला तयार करावा लागेल. नमुना प्रस्ताव तुम्हाला पुढे दिला आहे. 👉 pdf प्रस्ताव

सरपंच/ग्रामशेवक यांच्या साह्याने परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती कडे दाखल करून गटविकास अधिकारी यांच्या कवरिंग लेटर ने पुढील मंजुरीसाठी जवळील एकात्मिक विकास प्रकल्प विभागीय कार्यालयाला पाठवावा लागतो.

आदिवासी लोकसंख्या प्रमाणपत्र

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी शासनाच्या नवीन निकषा नुसार आदिवासी लोकसंख्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एकूण लोकसंखेच्या तुलनेत खालील प्रमाणे आदिवासी लीक्संखेची टक्केवारी असावयास हवी.

१ ) गावात एकूण लोकसंखेच्या 50% लोकसंख्या आदिवासी समाजाची असावी, तसे प्रमाणपत्र आवश्यक.

२ ) गावातील प्रभागात एकूण लोकसंखेच्या 50% आदिवासी समाजाची असावी, तसे प्रमाणपत्र आवश्यक.

३ ) स्वतंत्र वस्ती असल्यास एकूण लोकसंखेच्या 50% ची अट लागू नाही, स्वतंत्र वस्ती प्रमाणपत्र असावे.

आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१ ) ग्रामपंचायत ठराव.

२ ) जिथे काम करायचे आहे त्या जागेचे जिओ ट्यागींग चे फोटो.

३ ) जागेचा नकाशा.

४ ) तहसीलदार यांच्या कडील स्वतंत्र वस्ती / प्रभाग मधील आदिवासी लोकसंख्या 50% असल्याचे किंवा गावात एकूण लोसंखेच्या 50% आदिवासी लोकसंख्या असल्याचे प्रमाणपत्र.

५ ) ज्या कामाची निवड ग्रामपंचायत कडून करण्यात आली त्या कामाचे ( T.S./TECHNICAL APPROVAL) केलेले अंदाज पत्रक.

६ ) प्रस्ताव मधील पूर्ण प्रमाणपत्र परिपूर्ण भरलेले असावेत.

वरील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने साठी आवश्यक आहे.

संपर्क कार्यालये

  • ग्रामपंचायत कार्यालय.
  • तालुका पंचायत समिति कार्यालय.
  • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागीय कार्यालय

Cunclusion

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते किंवा पात्रतेची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टींचा समवेश हया blog मध्ये केलेला आहे.आपण वरील लेख वाचून सदरील योजनेसाठी परिपूर्ण मागणी प्रस्ताव तयार करू शकता. आणि आपल्या गावात आदिवासी विकास विभाग मार्फत विकास कामे मंजूर करून आनु शकतात. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आमच्या blog ला sabscribe करा bell बटनावर क्लिक करून आमच्या अशाच माहिती पूर्ण लेखाच्या नवीन सूचना मिळवा.आणि आपल्या जवळील मित्रांना शेअर करायला विसरू नका.

👉 WhatsApp Group

👉 Shabari Loan Scheme/आदिवासी बेरोजगार व महिला बचत गटांना कर्ज योजना

 👉:- Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

Scroll to Top