पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना: शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विध्यार्थ्यांना ६०,०००रु.

आदीवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर वसतिगृह योनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनस्तरावर मान्यता देण्यात आलेली आहे.  ज्या विध्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही, अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यान करीत सदरील योजना शासन स्तरावर राबविली जाणार आहे. या योजनेतून धनगर समाजातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना शासकीय वसतिगृहात प्रवेश नाही मिळाला तरी वसतिगृहाच्या खर्चाच्या परिवपूर्तीसाठी शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासन रोख रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करते. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना काय आहे, या बद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत.पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना 

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या मध्येमातून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विध्यार्थ्यांना लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. २१ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार सदरील योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे. ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशे विध्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून विध्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी रोख रक्कम शासनाकडून विध्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्थी पुढील प्रमाणे आहेत.

✅👉🏻Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या अटी व शर्थी 

  • विध्यार्थी हा भटक्या जमाती-क प्रवगातील धनगर समाजाचा असावा.
  • विध्यार्थी हा वसतिगृह प्रवेशसास पात्र असावा.
  • विध्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले भटक्या जमाती-क प्रवर्गाचा जातीचा दाखला असावा.
  • जात वैधता प्रमाणपत्र.
  • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील अनाथ प्रमाणपत्र आवश्यक.
  • दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सालय यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
  • विध्यार्थ्यांच्या पालकाचे एकूण वर्षक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्यांचे आधारकार्ड हे त्याच्या बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक.
  • विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था हि तो रहिवाशी असलेल्या तालुक्या ठिकाणी नसावी.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी शैक्षणिक व इतर निकष

  • सदरील विध्यार्थी हा १२ वि नंतर उच्च शिक्षण घेत असावा.
  • व्यावसायिक  तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर
    योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPAचे गुण असणे
    आवश्यक राहील. अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर, इयत्ता 12 वी मध्ये प्राप्त रगुणांची
    टक्केवारी विचारात घेतली जाईल.
  • सदरील योजनेतून ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी तर ३०% जागा या बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी राखीव राहतील.
  • या योजनेत निवड झालेला विध्यार्थी त्याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत लाभास पात्र राहील.
  • केंद्र शासनाच्या पोस्ट पोस्ट म्याट्रिक शिष्ट्यवृत्ती करीता सुनिश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश
    घेतलेल्या विध्यार्थ्यांना सदर योजने अंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि दोन वषापेक्षा कमी
    कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, आखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद,
    वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त
    महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
  • योजनेंतर्गणत, तालुकास्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर
    समाजातील विद्यार्थ्याने इ. 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायिक
    अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामद्धे केंद्रीभूत प्रवेि प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.
  • एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  • निवड करण्यात आलेल्या विध्यार्थी संभांड संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्येंत लोभस पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभयसक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविध्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विध्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयात विध्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अडा करण्यास संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण विभाग कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
  • सदरील योजनेचा लाभ १२ वि नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्ष लाभ देण्यात येईल, परंतु इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षणासाठी लाभाचा कालावधी जास्तीत जास्त ६ वर्ष असेल.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • शिक्षणात खंड पडलेला विध्यार्थी सदरील योजनेच्या लाभास पात्र असेल पण त्याचे वय ३० वर्षा पेक्षा जास्त नसावे.

✅👉🏻सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून लाभाचे स्वरूप

सदर योजने अंतर्गत प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विध्यर्थ्यांसाठी प्रतिवर्षी लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावा.

अ. क्र. खर्चाची बाब मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे ,पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगर पालिका क्षेत्रामद्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम
१. भोजन भत्ता ३२,००० २८,००० २५,००० २३,०००
२. निवास भत्ता २०,००० १५,००० १२,००० १०,०००
३. निर्वाह भत्ता ८,००० ८,००० ६,००० ५,०००
४. प्रति विध्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च ६०,००० ५०,००० ४३,००० ३८,०००

कागदपत्रे 

  1. भाड्याने राहत असल्यास व स्थानिक रहिवाशी नसल्यास प्रतींज्ञा पत्र.
  2. दिलेली माहिती खरी व अचूक असल्या बाबतचे स्वयं घोषणा पत्र.
  3. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याबाबतचे शपथपत्र.
  4. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र.
  5. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
  6. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा.

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनासाठी आवश्यक आहेत.

Conclusion

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या Blog आपण धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजने बद्दल पूर्ण माहिती पहिली. वसतीगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विध्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतून विध्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासन आर्थिक मदत करते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र व नातेवाईकांना शेअर करण्यास विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा.

आमच्या सोहळ मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Scroll to Top