बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना:- महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत महराष्ट्रातील बांधकाम कामगारासाठी अनेक नवनवीन योजना अमलात आणल्या जातात. अवजारे खरेदी साठी रु. 5,000 हजाराची मदत असेल किंवा सेफ्टी कित असे, कामगार आरोग्य शीबिर असेल, अशा अनेक योजना बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून राबविल्या जातात. अंगाराचा सामाजिक स्तर उंचावावा हा शासनाचा उद्देश आहे. महाराष्ट्रात असंघटीत बांधकाम कामगार यांच्या संख्या खूप आहे. प्रत्येक स्तरावर बांधकाम कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी कामगार कल्याणकारी मंडळ तत्पर असते. महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू वितारीत करण्याची नवीन योजना मंडळाने अमलात आणली आहे. बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना काय आहे, या योजनेबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना

बांधकाम कामगार योजना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील असंघटीत बांधकाम कामगारांसाठी महारष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळाच्या माध्यमातून शासन बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबवीत असते. बांधकाम कामगारांसाठी आर्थिक योजना, सामाजिक योजना, शैक्षणिक योजना या कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविते. सदरील योजनांबरोबरच कामगार मंडळ यामध्ये नवनवीन योजनांची भार घालत असते.बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना

बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कामगार मंडळाची नोंदणी असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्या नंतर कामगार मंडळ तुम्हाला 14 अबकी नोंदणी क्रमान देते. या क्रमांकाच्या आधारे तुम्हाला मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येतो. नोंदणी हि बांधकाम कामगार मंडळाच्या mahabocw.in  पोर्टलवर जावून करावी लागते.

✅👉🏻 www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना

महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू वितरीत करण्यात येणार आहेत. इमारत व इतर बांधकाम कामगारांना एखाद्या ठिकाणावरील काम पूर्ण झाल्या नंतर नवीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. अशा वेळेस स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन या समस्या बाबतीत जुळवून घ्यावे लागते.

अशा परिस्थिती मध्ये कामगाराला प्रत्येक नव्या ठिकाणी आपल्या परिवारासाठी नवीन आवास आणि संसार उपयोगी वस्तू तयार कराव्या लागतात. यासाठी शासन कामगारांना संसार उपयोगी वस्तू देत आहे. कामगारांच्या स्थलांतराच्या वेळेस त्यांना नवीन ठिकाणी संसार मानताना परेशानी होऊ नाही म्हणून शासन बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरीत करीत आहे. गृहपयोगी वस्तूंचा सेट खालील प्रमाणे आहे. बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेचा लाभ कोणाला मिळतो

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून वितरीत करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संचाचा लाभ कोनला मिळणार आहे ते आपण पाहू.

  • बांधकाम कामगार म्हणून ज्या लाभार्थ्याची नोंदणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आहे, अशा लाभार्थ्याला सदरील योजनेचा लाभ घेता येतो.
  • बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेल्या लाभार्थ्याची नोंदणी हि अद्यावत असावी, बांधकाम कामगार नोंदणी Renew केलेले असावे.
  • बांधकाम कामगार यांच्या कडे कामगार मंडळाचे नोंदणी केलेले 14 अंकी नोंदणी क्रमान असावे.

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना कागदपत्रे

  1. बांधकाम कामगार नोंदणी स्मार्ट कार्ड किंवा 14 अंकी नोंदणी क्रमांक.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  3. लाभार्थ्याची नोंदणी पावती.
  4. लाभार्थ्याचा रजिस्टर मोबाईल क्रमांक.

इत्यादी कागदपत्रांचे 2-2 झेरोक्स सदरील योजनेच्या फॉर्म सोबत जोडायचे आहे.

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना अर्ज कुठे करायचा

बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वितरण योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्याला ज्यांची नोंदणी अद्यायावत आहे अशा लाभार्थ्यांना गृहपयोगी वस्तू वितरीत करण्यात येत आहे. या योजनेसाठी तुम्हाला ऑफ लाईन अर्ज करावा लागणार आहे.

महामंडळाकडून मिळणारा फॉर्म घेवून तो वेवस्थित भरून, त्या सोबत वर दिल्या प्रमाणे कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या जवळच्या कामगार मंडळाच्या कार्यालयाला नेवून द्यावा लागणार आहे. तुमचा अर्ज मंजूर होताच तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर फोन करून कळवले जाते. त्या नंतर तुम्ही तुमच्या वस्तू घेवून येवू शकता.

✅👉🏻 बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

संपर्क कार्यालय

  • जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त ( जिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालय )

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेचा शासनाचा नवीन GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Conclusion

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना या लेखात आपण बांधकाम कामगार यांना वितरीत करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेबद्दल माहिती पहिली. महाराष्ट शासनाच्या नवीन निर्णयानुसार सदरील योजना बांधकाम कामगार यांच्यासाठी राबविण्यात येत आहे. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top