बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी

महाराष्ट्रातील असंघटीत बांधकाम कामगारासाठी शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन  करण्यात आलेले आहे. या मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्व पूर्ण  योजना राबवल्या जातात. बांधकाम कामगाराचे सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सर्व बाजूने समतोल साधून प्रगती साधली जावी हा उद्देश शासनाचा आहे. बांधकाम कामगारासाठी शासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगाराच्या हिताच्या योजना, मंडळाकडे नोंदणी असलेल्या प्रत्येक कामगारापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनानांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बांधकाम कामगार म्हणून बोर्ड कडे नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली कि तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेवू शकतात. आपण बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा या विषयी आज Step By Step माहिती घेणार आहोत.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म : Construction Worker Registration

असंघटीत बांधकाम कामगारासाठी राबवल्या जाणाऱ्या  कामगार मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार म्हणून अर्ज करणे आवश्यक आहे. पूर्वी मंडळाकडे अर्ज Offline पद्धतीने करावी लागत असे, पण आता शासनाने कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट उपलब्द करून दिली आहे. त्यामुळे आता फॉर्म तयार करून ऑफिसला खेटे मारायचे काम राहिले नाही. तुम्ही तुमच्या गावात एखाद्या CSC किंवा online कामे करणाऱ्या सेंटर वर जावून बांधकाम कामगार योजनांसाठी ऑनलाइन फॉर्म भरू शकता. बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ते आपण पुढे पाहणार आहोत.

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगारासाठी महामंडळाकडून खूप योजना आहेत ज्या कामगाराच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावतात. या योजनेतून कामगाराचे आर्थिक उत्पन्न वाढवून कामगाराला सामाजिक पातळीवर सामावून घेण्याचा शासनाचा उद्देश आहे. कामगाराच्या अडचणीच्या प्रत्येक पायरीवर शासन त्याला मदत करते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आपण इथे पाहू. योजनांविषयी अधिक माहितीसाठी बांधकाम कामगार योजना फायदे हा आमचा लेख वाचा.

  1. कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी महामंडळ विवाहाच्या खर्चाच्या पर्तीपुर्तीसाठी रु. 30,000 हजार मदत म्हणून दिली जाते.
  2. कामगाराला वयाच्या 60 वर्षा नंतर मानधन म्हणून 3000 हजार रुपये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत दिले जातात.
  3. कामगाराला काम करत असतांना दुर्घटनेतील खर्चाच्या हमीसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजने अंतर्गत सुरक्षा कवच दिले जाते.
  4. बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इयत्ता 1 ली पासून ते पुढील डिग्री मिले पर्यंत शिष्यवृत्ती प्रतिवर्षी 2500 पासून ते 1,00,000 लाखां पर्यंत दिली जाते.
  5. बांधकाम कामगाराच्या पत्नीला नेसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 हजार रुपये तर शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी 20,000 हजार रुपये मदत केली जाते.
  6. कामगाराला स्वतः किंवा कुटुंबातील सदस्याला गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 एक ;लाख रुपये मदत केली जाते.
  7. कामगाराने एक मुलीच्या जन्मा नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या लग्नासाठी 1,00,000 लाख रुपये मुदत ठेव म्हणून मुलीच्या नवे दिले जातात.
  8. कामगाराला कामावर असतांना अपंगत्व आल्यास रु. 2,00,000 लक्ष रुपये मदत केली जाते.
  9. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मदत केली जाते.
  10. कामगाराचा कामावर असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला 5,00,000 रु. आर्थिक मदत दिली जाते.
  11. कामगाराचा नेसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 लाख रुपये त्याच्या कायदेशीर वारसास दिले जातात.
  12. कामगाराला घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून रु. 2,00,000 लाख रुपये अर्हसःय केले जाते.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड/Construction Worker Smart Card

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला बाधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला महामंडळाकडून 14 अंकी नोंदणी क्रमांक मिळतो. हा क्रमांक मिळाला कि तुमची नोंदणी पूर्ण झाली, इथून पुढे तुम्ही कामगार विभागाच्या योजनांचा लाभ घेवू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf

ऑफलाईन फॉर्मसाठी तुम्ही इथून बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र कामगार नोंदणी

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या अधिकृत MAHABOCW.IN  वेबसाईट वर जाऊन तुम्हाला कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुमच्या कडे बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद यांचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असायला हवे. तसेच भरत असलेली माहिती खरी असल्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र आणि तुमच्या आधार संबंधीची माहिती मंडळाला वापरण्याची परवानगी देण्यासाठी तुमचे आधार संमती पत्र हे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरतांना upload करावे लागते.

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणीसाठी कागदपत्रे

  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्याचे बँक पासबुक.
  • लाभार्थ्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र.
  • लाभार्थ्याचे आधार संमती पत्र.
  • लाभार्थ्यांचे  90 दिवस काम केल्याचे ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद यांचे प्रमाणपत्र.
  • लाभार्थ्याचे रेशन कार्ड.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्याच्या पाल्यांच्या शिक्षणाचे तपशील.
  • लाभार्थ्यांचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • लाभार्थ्याचा मोबाईल नंबर.

बांधकाम कामगार नोंदणीसाठी ऑनलाइन प्रोसेस 

लाभार्थ्याला सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या mahabocw.in या ऑनलाइन साईट वर जावून बांधकाम कामगार नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल. त्या नंतर जवळचे VFC स्थान निवडावे लागेल. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे ठिकाण निवडावे, त्या खालच्या रकान्यात तुमचा आधार नंबर टाकावा, आणि शेवटच्या रकान्यात तुमचा वापरात असलेला मोबाईल नंबर टाकावा. मोबाईल नंबर टाकून सबमिट केल्या नंतर तुमच्या समोर वैयक्तिक माहितीचा फॉर्म open होईल तो तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. त्यामधील वैयक्तिक माहिती, कौटुंबिक तपशील, नियोक्ता तपशील पूर्ण भरल्या नंतर तुम्हाला समर्थन दस्तऐवज मध्ये अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र upload करायचे आहे. आणि शेवटला टिकमार्क करून save बटनावर क्लिक करायचे आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

 

अशा पद्दतीने तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा व तुमचा पावती क्रमांक असल्याचा मॅसेज तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर येयील. पुढे तुम्हाला नोंदणी फीस भरण्याचा मॅसेज येयील त्यावेळेस मंडळाची फीस तुम्हाला भरावी लागेल. फीस भरल्या नंतर तुमचा 14 अंकी नोंदणी क्रमान तुमच्या मोबाईल वर प्राप्त होईल.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

 

Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार नोंदणी झाल्या नंतर तुम्ही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकता. महामंडळाच्या साईट वर जावून या योजनांसाठी तुम्ही बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म भरू शकता. वेबसाईट वर गेल्यानंतर Construction Worker:Registration या पर्यायावर क्लिक क्रल्या नंतर Select Action मधील पर्यायापेकी New Claim वर क्लिक करा. त्या खालील रकान्यात तुमचा Registration नंबर टाकायचा आहे. त्या नंतर Proceed Form वर क्लिक करा. तुमच्या Registrated नंबरवर Otp येयील ती प्रविष्ठ करून तुमचा फॉर्म open होईल.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

 

फॉर्म वर खालील बाजूला असलेल्या पहिल्या रकान्यात योजना श्रेणी निवडा या मध्ये 1 ) शेक्षणिक कल्याण योजना  2 ) आरोग्य कल्याण योजना 3 ) आर्थिक कल्याण योजना 4 ) समाज कल्याण योजना या पैकी ज्या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ती श्रेणी निवडून पुढील रकान्यात तुमची योजना निवडायची आहे, आणि शेवटी फॉर्म सबमिट करायचा आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Note:-

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी आणि सर्व योजनासाठी Online पद्दतीने फॉर्म भारता येतो, फक्त काहीच योजनांसाठी तुम्हाला Offline फॉर्म भरावा लागतो. Offline व Online फॉर्म Download करण्यासाठी इथे क्लिक करा.

Conclusion

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म या लेखा मध्ये आपण बांधकाम कामगार योजनांसाठी कसा ऑनलाइन फॉर्म भरायचा या विषयी परिपूर्ण माहिती पहिली आहे. कामगार कल्याण नोंदणी तसेच कामगार कल्याण योजना या साठी फॉर्म भरण्याची प्रोसेस अगदी step by step आपण पहिली. हि माहिती आवडली असल्यास आम्हाला फॉलो करा आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

WhatsApp

Telegram

1 thought on “बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: अशी करा कामगार नोंदणी”

  1. Pingback: Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

Comments are closed.

Scroll to Top