बाल संगोपन योजना: दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत

बाल संगोपन योजना:  महाराष्ट्र शासनाकडून अनाथ मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजनेतून आर्थिक साह्य केले जाते. अशा मुलांचे योग्य शिक्षण व्हावे, त्यांचे पालन पोषण व्हावे यासाठी शासन नेहमीच प्रयत्न शील असते. ज्या मुलांचे आई – वडिलांचे छात्र हरवले आहे, अशा मुलाच्या पालन पोषण आणि शिक्षणासाठी शासन भरपूर निधी संबंधित विभागाला उपलब्ध करून देत असते. अशा विभागाकडून शासन स्तरावर निराधार बालकांसाठी त्यांच्या हिताच्या व समाजाच्या मुख्य घटकात आणण्याच्या योजना आखल्या जातात. अशाच स्वरूपाची बाल संगोपन योजना शासन अनाथ मुलांसाठी महाराष्ट्रात राबवित आहे, या बद्दल आपण माहिती घेणार आहोत. बाल संगोपन योजना दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत

बाल संगोपन योजना

शासनाकडून अनाथ मुलांसाठी ची हि योजना आहे. ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील किंवा दोन्ही नसतील अशा मुलांसाठी सदरील योजना राबविली जात आहे. वय वर्ष ० ते १ ८ वयोगटातील बालकांना सदरील योजनेतून लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना सदरील योजनेतून लाभ घेता येतो. या योजनेसाठी अर्ज केल्या नंतर ० ते १ ८  वर्ष पर्यंत सतत दर महा रक्कम लाभार्थ्याला मिळत राहते.

✅👉🏻 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना: OBC च्या विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी रु. 60,000 शिष्यवृत्ती

बाल संगोपन योजना योजनेतून मिळणारी आर्थिक मदत

सदरील योजनेतून एका मुलासाठी दर महा १ १ ० ०  रु. प्रति महिना या प्रमाणे रक्कम लाभार्थ्याला दिली जाते. एका वर्षाला मिळणारी एकूण रक्कम १ ,३ २ ० ० ० मिळते. एकदा अर्ज केल्या नंतर ही रक्कम सतत वय वर्ष १ ८  वर्ष पूर्ण होई पर्यंत मिळत राहते. लाभार्थ्याला परत परत अर्ज अर्ज करण्याची आवश्यकता नसते.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

बाल संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड चे झेरॉक्स बालकाचे आणि पालकाचे.
  2. शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड.
  3. तलाठी यांच्या कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
  4. पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ( मृत्यू दाखला ).
  5. पालकांचा रहिवासी दाखला.
  6. मुलाचे बँक पासबुक झेरॉक्स.
  7. मृत्यूचा अहवाल.
  8. रेशन कार्ड झेरॉक्स.
  9. घरासमोर बालका सोबत पालकांचा फोटो.
  10. मुलांचे पासपोर्ट साईज फोटो.
  11. पालकांचे पासपोर्ट साईज फोटो.

इत्यादी कागदपत्रे सदरील योजनेसाठी लागतात तसेच परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्‍या बाल कल्याण समितीकडे सादर करावा लागतो. समिती तुमच्या अर्जाची परिपूर्णता पाहून तुमचा अर्ज मंजूर करते.

अधिक माहितीसाठी संपर्क

जिल्ह्यातील महिला व बालसंगोपन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्या कडे संपर्क करू शकता.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

Conclusion

बाल संगोपन योजना: दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत या blog मध्ये आपण शासनाच्या बाल संगोपन योजने विषयी माहिती पाहिली, सदरील योजनेतून राज्यातील अनाथ आणि निराधार बालकांना दर महा १ १ ,० ०  रुपये शिक्षणासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी दिले जातात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top