मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online

मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online आपण भारतासारख्या लोकशाही देशात राहतो, इथे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. आपले सरकार निवडण्याचा अधिकार आहे. यासाठी आपल्याला निवडणूक विभागाकडून 18 वर्ष वय झाल्यानंतर मतदान कार्ड मिळते. हे  election कार्ड नुसते मतदानालाच नाही तर इतर हि शासकीय कामा मध्ये ओळख पत्र म्हणून गृहीत धरले जाते. आज प्रत्येक 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाकडे मतदान कार्ड असतेच. पण जर समजा एखाद्या वेळेस हे कार्ड हरवले तर नवीन कार्ड मिळवण्यासाठी इलेक्शन विभागागाकडून बराच कालावधी लागतो. ते पोस्टा च्या साह्याने कार्ड पाठवतात. पण आता Online पद्धतीने तुम्ही तुमच्या मतदान कार्डची प्रिंट काढू शकता. डिजिटल स्वरुपात हि प्रिंट तुम्ही Download करू शकता. मतदान कार्ड कसे Online Download करायचे ती प्रोसेस आपण पाहणार आहोत. मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र

मतदान कार्ड काय असते

भारत निवडणूक आयोग ( ELECTION CONNISSION OF INDIA ) यांच्या कडून 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्यासाठी मतदान कार्ड दिले जाते. या ओळखपत्रावर तुमचे पूर्ण नाव तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव, तुमची जन्म तारीख, तुमचे वय आणि तुमचा संपूर्ण पत्ता इत्यादी गोष्टी तुमच्या मतदान ओळख पत्रावर असतात. त्या सोबतच ओळख पत्रावर 11 (अंकी इपिक नंबर) तुमचा ओळख क्रमांक असतो. जसे आधार कार्ड, narega चे जॉब कार्ड त्या प्रमाणेच मतदान कार्ड हि महत्वाचे कागदपत्र आहे.

👉🏻 मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी अर्थसाह्य

how to download voter id online/मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे

आपल्या कडील मतदान कार्ड खराब झाले किंवा फाटले तर आपण नवीन मतदान कार्ड Online Download करू शकतो. इतर प्रोसेस ने मतदान कार्ड ची वाट पाहत बसण्यापेक्षा online पद्धतीने आपण लगेच मतदान कार्ड Download  करू शकतो. ते कसे Online Download करायचे ते आपण खाली पाहणार आहोत.

👉🏻 सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र

सर्व प्रथम तुम्हाला ELECTION CONNISSION OF INDIA यांच्या मतदाता सेवा पोर्टल ( VOTERS’ SERVICE PORTAL ) www.nvsp.in वर जावे लागेल त्या नंतर तुम्हाला पोर्टल वर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या sing in या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर टाकून  id password बनवावे लागेल. आणि कॅपचा भरून सबमिट करावे लागेल. त्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येयील ती तुम्हाला त्या रकान्यात भरायची आहे.

OTP रकान्यात टाकल्या नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ open होईल.Open झालेल्या पृष्ठ वर उजव्या बाजूला E-EPIC Download चोकोनात दिसेल, ते टच करून नवीन पेज open करायचे आहे. नवीन पेज open झाल्या नंतर Download electronic copy of EPIC Card वर तुम्हाला तुमचा EPIC no. ( तुमच्या मतदान कार्ड वरील 11 अंकी नंबर ) प्रविष्ठ करायचा आहे, किंवा तुमच्या कडे Form Reference no रेफरन्स नंबर असेल तर तो टाकायचा आहे.

वरच्या रकान्यात EPIC no. किंवा Form Reference no टाकल्या नंतर तुम्हाला त्या खालील रकान्यात तुमचे राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्या नंतर SEARCH बटनावर क्लिक करायचे आहे.

SEARCH बटनावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर तुमचे नाव तुमचे विधानसभा क्षेत्र दिसेल, त्या खालील शेवटच्या रकान्यात निळ्या कलर मध्ये SEND otp म्हणून बटन दिसेल (OTP will be sent to the registered mobile no ) बटनाला क्लिक केल्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येयील ती OTP तुम्हाला त्या पुढील रकान्यात टाकून VERIFY बटनावर क्लिक करायचे आहे.

VERIFY बटनावर क्लिक करताच Download e-EPIC बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे मतदान कार्ड ची डिजिटल कॉपी Download करू शकता.मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र how to download voter id online

Conclusion

मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online या लेखात आपण मतदान कार्ड कसे download याची सविस्तर माहिती पहिली आहे. या आर्टिकल द्वारे तुम्ही तुमचे मतदान कार्ड download करू शकता. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रान पर्यंत अवश्य पोहचावा, त्यातून एखाद्या गरज वंत लाभार्थ्याला मदत होईल. आम्ही नेहमीच अशी नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहोचावीत असतो. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा, आम्हला फॉलो करा.

🟢🟣🔵  आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online”

  1. Pingback: Electoral Bonds: निवडणूक रोखे म्हणजे काय, आणि ते कशे काम करतात » Www.pathanik.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top