महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

महाराष्ट्र शासनाकडून अनेक विभागाचे निरनिराळे महत्वाचे शासन निर्णय काढले जातात. राज्यात एखादी नवीन योजना सुरू करायची असेल किंवा इतर शासकिय कामे असतील मंत्रिमंडळाच्या मंजूरीने शासन निर्णय काढले जातात. आणि या शासन निर्णयाची अमलबजावनी प्रशासनाकडून केली जाते. शासन स्तरावर कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास त्याला मंत्री मंडळाची मंजूरी लागत असते. त्या नंतरच एखाद्या कामा विषयीचा निर्णय घेतला जातो. कोणत्या काम विषयी काय निर्णय घेण्यात आला आहे, आपल्याला पाहता येते, त्यासाठी शासनाच्या अधिकृत वेब साईटवर जावे लागते. शासनाचे शासन निर्णय GR हे कुठे आणि कशे चेक करायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. शासनाच्या कोणत्याही विभागाचा शासन निर्णय आपल्याला पाहता येतो. विभागानुसार शासनाचे GR चेक करता येतात. महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय GR (सरकारी नियमावली) हे सरकारी प्रशासन कार्यक्षेत्रातील महत्वाचे अंग आहे. शासन निर्णय म्हणजे सरकाराच्या महत्वाच्या निर्णयांचे आदेश आहेत, ज्याचे पालन विविध विभागांतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि लोकसेवा कायमचाऱ्याकडून पालन केले जाते. लोकशाही पद्धतीमद्य राज्यात मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ, अधिकारी आणि लोकसेवा कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या निर्णयांमध्ये सर्वांचा सहभाग असतो.

मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असून. राज्यपाल शासन समितीचे अध्यक्ष आहे, ज्यांचे काम राज्य सरकारच्या निर्णयांना स्वीकृती देणे आहे. मंत्रिमंडळ महत्वाचं निर्णय घेते आणि राज्याच्या विविध विभागांच्या कामांची अंमलबजावणी करते. GR (सरकारी नियमावली) अर्थात सरकारी नियमावली आहे, ती नियमांच्या संग्रहाचा भाग आहे, ज्या सरकारी संस्थेतून सरकाराचे आदेश आणि निर्णय पालन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, बांधील असतात. शासन निर्णय GR आमच्या शासन प्रक्रियेमधील मोलाचा भाग आहे, जो सरकारी नियमांच्या पालनाची सुनिश्चितता निश्चित करते.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

महत्वाचे शासन निर्णय विभाग

महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय हे शासनाच्या महत्वाच्या असलेल्या अनेक विभागामार्फत घेतले व राबवीले जातात. महाराष्ट्र शासनाचे महत्वाचे विभाग खालील प्रमाणे आहेत.

  1. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
  2. अल्प संख्यांक विकास विभाग
  3. इतर मागास बहुजन कल्याण विभाग
  4. उच्च व तंत्र शिक्षण विभाग
  5. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
  6. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
  7. कोशल्य विकास व उद्योजकता विभाग
  8. ग्राम विकास विभाग
  9. गृह विभाग
  10. गृह निर्माण विभाग
  11. जल संपदा विभाग
  12. दिव्यांग कल्याण विभाग
  13. नगर विकास विभाग
  14. नियोजन विभाग
  15. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
  16. पर्यावरण विभाग
  17. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
  18. मृद व जलसंधारण विभाग
  19. मराठी भाषा विभाग
  20. महसूल व वन विभाग
  21. महिला व बाल विकास विभाग
  22. माहिती तंत्रज्ञान ( सा. प्र. वि. ) विभाग
  23. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग
  24. वित्त विभाग
  25. विधी व न्याय विभाग
  26. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
  27. संसदीय कार्य विभाग
  28. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग
  29. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
  30. सामान्य प्रशासन विभाग
  31. सार्वजनिक आरोग्य विभाग
  32. सार्वजनिक बांधकाम विभाग

वरील शासनाच्या विभागातून महत्वाचे व लोकहिताचे शासन निर्णय काढले जातात. आणि प्रशासन स्तरावर त्यांचीच अंमलबजावणी केली जाते.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

महत्वाचे शासन निर्णय आणि GR कशे पाहायचे

शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत निघणारे महत्वाचे शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयात कोणता निर्णय घेण्यात आला हे माहिती करून घेणे आपल्यासाठी महत्वाचे असते. शासन योजनांच्या निधीची माहिती ही यामधून आपल्याला मिळत असते. तर मग हे शासनाचे निर्णय GR कुठे व कशे पाहायचे ते आपण पुढे पाहू.

महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय GR पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या https://gr.maharashtra.gov.in/  या अधिकृत वेब साईटवर जावे लागेल. या वेब साईटवर आल्या नंतर तुम्हाला शासन निर्णय पहा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर Open होणाऱ्या पेज वर तुम्हाला सर्व विभागाचे शासन निर्णय GR पाहता येतात. चालू वर्षाचे तसेच मागील वर्षाचे शासन निर्णय GR तुम्ही पाहू शकतात.

Open झालेल्या नवीन पेजवर तुम्हाला ज्या विभागाचा शासन निर्णय GR पाहायचा आहे, तो विभाग तुम्ही विभागाचे नाव या पर्याय मध्ये निवडू शकता. तसेच कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत शासन निर्णय पाहायचे ती तारीख आणि वर्ष तुम्ही निवडू शकता. तुमच्या कामा नुसार शासन निर्णय पाहतांना तुमचा तो महत्वाचा शब्द टाकून शासन निर्णय पाहता येतो. तुम्हाला शासन निर्णय पाहतांना तुमच्या कडे त्याचा सांकेतांक क्रमांक असेल तर तो तुम्ही टाकू शकता. हि सर्व माहिती भरल्या नंतर Captcha (पडताळणी संकेतांक कोड) या मध्ये कॅप्चा टाकून शोधा या बटनावर क्लिक करा तुम्हाला हवा असणारा शासन निर्णय तुमच्या समोर असेल त्याला क्लिक करून तुम्ही तो पूर्ण वाचू शकता.

https://gr.maharashtra.gov.in या वेब साईटवर प्रत्येक दिवशी येणारे नवीन शासन निर्णय उपलब्ध असतात. ते महत्वाचे शासन निर्णय तुम्ही कुठलीही माहिती न भरता पृष्ठ क्रमांक बदलून पाहू शकता.

✅👉🏻 महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात

Conclusion

महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR या लेख मध्ये आपण शासनाचे निरनिराळ्या विभागाचे म्हत्वाचे शासन निर्णय कसे पाहायचे या बद्दल पूर्ण माहिती पहिली. शासनाच्या या वेबसाईटवर शासनाचे रोज निघणारे वेगवेगळ्या विभागाचे महत्वाचे शासन निर्णय रोजच्या रोज पाहता येतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा. आम्ही नेहमी आपल्यासाठी शासनाच्या योजनांची व कामाची माहिती घेऊन येत असतो. डेली अपडेट मिळविण्यासाठी आम्हला फॉलो करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top