महिला कर्ज योजना :- महिला सशक्तीकरणासाठी शासन अनेक योजना राबिते, त्या मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठीच्या योजना असतील किंवा महिला व्यवसाय करण्यास इच्छुक असतील तर त्यांना अनेक महिला कर्ज योजनेतून व्यवसायासाठी अनुदान आणि मदत शासनाकडून केली जाते. आजच्या काळात पुर्षांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असलेल्या महिलांना कोणते ही क्षेत्र अवघड राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने ठसा उमटवत आहे. आज आपण पाहतो ज्या व्यवसायात महिला आहेत ते व्यवसाय आज भरभराटीला आहेत. शासन ग्रामीण भागातील महिलांना हि बचत गटाच्या माध्येमातून व्यवसायाकडे वळवत आहे. बचत गटाच्या माध्येमातून मोठ-मोठे व्यवसाय ग्रामीण भागात उभे राहत आहेत. आज महिलांसाठी कर्ज निर्माण करून देणाऱ्या शासनाच्या काही योजनांविषयी माहिती पाहणार आहोत.
महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात
शासनाकडून नेहमीच महिलांना पुरुषाच्या बरोबरीने उभे कण्यासाठी प्रयत्न केले जातात. कुठले हि क्षेत्र असोत, त्या क्षेत्रात महिलांना प्राधान्य दिले जाते. शासन दरबारी अनेक अशा योजना आहेत, ज्या फक्त महिलांसाठी तयार केल्या जातात. ग्रामीण भागापासून ते शहरी भागा पर्यंत महिलांसाठी शासनाचे दारे नेहमीच खुले आहेत. ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्येमातून शासन महिलांना वैयक्तिक किंवा सामुहिक व्यवसायासाठी अतिशय अल्प व्याज दरात आणि सबसिडीवर कर्ज उपलब्ध करून देते.
महिलांसाठी वैयक्तिक कर्जासाठी तसेच बचत गटाच्या माध्येमातून सामुहिक व्यवसायासाठी अनेक कर्ज योजनेतून प्राधान्य दिले जाते. शासनाच्या कर्ज योजनेत पहिले प्राधान्य हे महिला व्यावसायिकाला असते. व्यावसायिक कर्ज योजने मध्ये सहभाग घेणाऱ्या महिलांना शासन सर्वप्रथम कर्ज मंजूर करते. आपण शासनाची काही महिला कर्ज योजना पाहणार आहोत.
शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात
शासन राबवीत असलेल्या लोकहितवादी सर्व कर्ज योजनेतून महिलांना कर्ज घेता येते. त्याच बरोबर काही योजना अश्या आहेत ज्या फक्त महिलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची माहिती आपण पाहू.
- अन्नपूर्णा कर्ज योजना
- स्त्री शक्ती पॅकेज
- मुद्रा लोन योजना
- महिला बचत गट कर्ज योजना
- CMEGP कर्ज योजना
अन्नपूर्णा कर्ज योजना
प्रामुख्याने केटरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अन्नपूर्णा कर्ज योजना राबविली जाते. फूड केटरिंग व्यवसाय करणाऱ्या महिलांना या योजनेतून आर्थिक हातभार लावला जातो. या योजनेतून 50 हजार रुपया पर्यंत कर्ज फूड केटरिंग व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिले जाते. अतिशय अल्प व्याज दरात सारील कर्ज हे SBI बँकेकडून दिले जाते. या कर्जाची परत फेड हि सारण 36 महिन्यात करावी लागते. या योजनेसाठी SBI च्या होम ब्रांच ला भेट द्यावी लागेल.
स्त्री शक्ती पॅकेज
स्त्री शक्ती पॅकेज ही एक महिला कर्ज योजना आहे, या योजने अंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेतून कमी व्याज दर आकारून महिलांना कर्ज वाटले जाते. सामुहिक व्यवसाय करणाऱ्या महिला किंवा ज्या व्यवसायात महिलांची भागीदारी हि 50% पेक्षा जास्त आहे. अशा व्यवसायांना सदरील योजनेतून कर्ज पुरवठा केला जातो. या योजनेतून रु. 50 हजार ते रु. 2 लाखा पर्यंत कर्ज महिलांना दिले जाते. या योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज हे SBI बँकेमार्फत दिले जाते.
मुद्रा लोन योजना
केंद्र सरकार कडून राबविली जाणारी हि एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेचा लाभ आता पर्यंत अनेक लघु व्यावसायिकानी घेतला आहे. या योजनेतून महिला कर्ज घेवू शकतात. या योजनेत तीन अवस्थेनुसार कर्ज दिले जाते.
- शिशु योजना :- शिशु योजनेत व्यवसाय करणाऱ्या पुरुष किंवा महिलांना रु. 50 हजार कर्ज म्हणून दिले जातात. या कर्जावर बँकेकडून 12% व्याजदर वार्षिक आकारले जातात.
- किशोर योजना :- किशोर योजनेत उद्योग करणाऱ्या पुरुष किंवा महिलांना रु. 50 हजार ते रु. 5 लाखां पर्यंत कर्ज दिले जाते.
- तरुण योजना :-तरुण योजनेत रु.5 लाख ते रु. 10 लाख रुपये व्यावसायिक कर्ज दिले जाते.
केंद्र शासनाची मुद्रा लोन योजना ही SBI बँकेमार्फत राबविली जाते.
महिला बचत गट कर्ज योजना
महाराष्ट्र शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला बचत गटांना वेगवेगळे कर्ज उपलब्ध करून देत आहे. आज ग्रामीण भागात बचत गटाचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या बचत गटाच्या माध्येमातून महिला समृद्धी कडे वाटचाल करीत आहेत. बचत गटामार्फत शासन महिलांना वैयक्तिक व्यवसायासाठी कर्ज निर्माण करून देत आहेत, ज्या मधून महिला आपला स्वतः चा व्यवसाय उभा करू शकत आहेत. मग ग्रामीण भाग असेल तर दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हसी खरेदी करणे किंवा शेळी पालन करणे अशी अनेक व्यवसाय या मधून महिला करत आहेत.
वैयक्तिक व्यवसाया बरोबरच सामुहिक व्यवसायाला शासन रु. 5 लाख ते रु. 10 लाख रुपये किंवा व्यवसायाच्या अनुशंगाने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देते. यासाठी तुमचे नाव बचत गटातअसावे, तुमचा बचत गट कार्यरत असावा. बचत गटामार्फत कर्ज तुमच्या होम बँकेकडून दिले जाते.
CMEGP कर्ज योजना
महाराष्ट्र शासनाकडून MSME अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविली जाते. या योजनेतून सुशिक्षत बेरोजगार तसेच अपंग आणि कुटुंबातील कर्त्या महिला यांना व्यवसायासाठी अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
वैयक्तिक व्यवसाय करू इच्छिणारे कोन्ही हि या योजनेस पात्र आहेत.वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेल्या बचत गटांना या योजनेतून विशेष प्राधान्य आहे.
Conclusion
महिला कर्ज योजना: शासनाच्या या योजना महिलांना कर्ज उपलब्ध करून देतात या blog मध्ये आपण महिला कर्ज योजना कोणकोणत्या आहेत या बद्दल माहिती पहिली. शासन महिला सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवीत असते. व्यवसायासाठी इच्छुक असणार्या महिलांना शासन अनेक कर्ज योजनेत प्राधान्य देते. या योजनेतून कर्ज घेवून महिला उद्योजक होऊ शकतात. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
🟢🟣🔵 आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.