महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम

महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम :- शासन महिलाच्या सक्षमि कारणासाठी वेगवेगळ्या उपाय योजना राबवीत असते. महाराष्ट्रात शासन महिला बचत गटाच्या माध्येमातून महिलांना स्वतः च्या पायावर खंबीर पने उभे राहण्यासाठी मदत करत आहे. आज महाराष्ट्रात महिला बचत गटाचे जाळे निर्माण झाले आहे. स्वतः च्या पैशाची बचत त्याच बरोबर शासनाचे अनुदान या मुळे ग्रामीण भागात हि महिला बचत गटाच्या माध्येमातून छोटे-मोठे व्यवसाय उभे राहतांना दिसत आहेत. शासन बचत गटाच्या महिलांना शासकीय अनुदाना बरोबरच अतिशय अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे, ज्याच्या माध्येमातून महिला आपले घर प्रपंच साभाळून आपला स्वतः चा व्यवसाय उभा करीत आहेत. आज आपण शासनाच्या योजनेमुळे होणारे महिला बचत गटाचे फायदे या बद्दल जाणून घेणार आहोत.महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम

महिला बचत गट स्थापना

गावातील कोन्ही महिला एकत्र एउन महिला बचत गटाची स्थापना करू शकतात. महिला बचत गट स्थापन करण्यासाठी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 20 महिलांची आवश्यकता असते. महिलांना एकत्र एवून आपल्या बचत गटासाठी अध्यक्ष आणि सचिव यांची निवड आपल्यातून करावी लागते. त्याच बरोबर आपल्या बचत गटाला एक नाव द्यावे लागते. बचत गट तयार झाल्यावर गटाचे काही नियम महिलांना बनवावे लागतात, जेणेकरून आपला गट सुरुळीत चालेल. अद्यक्षाकडे मिटिंग बोलाविण्याची जिम्मेदारी असते तर सचिव बचत गटाचा व्यवहार आणि दप्तर सांभाळतात.

✅👉🏻 पीएम सूर्यघर योजना: मीटर वीजबिलाची चिंता सोडा, केंद्र सरकारची नवीन योजना अर्ज सुरु

महिला बचत गट नियम

महिला बचत गट चालवत असतांना काही नियमांचे पालन महिलांना करावे लागते.

 • महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांना ठरलेल्या प्रत्येक मिटिंग ला हजर राहावे लागते.
 • बचत गटातील अंतर्गत व्यवहाराचे लेखी रेकोर्ड सचिवाने ठेवणे आवश्यक असते.
 • बचत गट अंतर्गत केलेल्या व्यवहाराची परतफेड हि वेळेवर आणि ठरलेल्या व्याजदरासह परत करणे आवश्यक असते.
 • महिला बचत गटाचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे आवश्यक असते.
 • प्रत्येक हप्त्याला जमा होणारी रक्कम बँकेच्या खात्यात जमा करणे फायद्याचे असते.
 • स्थापन केलेल्या बचत गटाची पंचायत समिती अधिकाऱ्या कडून नोंदणी करून घेणे गरजेचे असते.
 • शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या महिला बचत गट योजनेचे फॉर्म भरणे गरजेचे आहे.
 • शासंकडून मिळणाऱ्या अल्प व्याज दरातील कर्जासाठी बँकेकडे माघनी करणे अवस्य्क आहे.
 • बचत गटातील सर्व महिलांमध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे.
 • बचत गटामध्ये महिला सदस्या वेतिरिक्त इतर कुटुंब सास्यांनी हस्तक्षेप करू नाही.
 • पंचायत समिती स्तरावर किंवा सर्कल स्तरावर होणाऱ्या मार्गदर्शक शबीर अथवा मिटिंग ला सर्व बचत गट महिलांनी हजर राहणे गरजेचे आहे.

✅👉🏻 Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

महिला बचत गट कर्ज योजना

महिलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. बचत गटांना शासन निरनिराळ्या योजनेतून मदत करीत आहे. बचत गटांना शासन अतिशय अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. बचत गटाचे खाते ज्या राष्ट्रीयकृत बँकेत आहे, त्या बँकेच्या माध्येमातून शासन बचत गटांना कर्ज देते. बचत गटाचा व्यवहार सतत चालू असेल आणि बचत गटाची बचत बँकेत जमा होत असेल तर शासन बँके मार्फत महिला बचत गटांना कर्ज देते. तसेच पंचायत समिती मार्फत बचत गटासाठी असणाऱ्या योजनेतून महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

शासन अश्या बऱ्याच योजनांमध्ये महिला बचत गटांना प्रर्हम प्राधान्य देते. दुधाळ गाई-म्हशी ची योजना असल्यास त्या योजनेत पहिले प्राधान्य हे बचत गटांना असते. शेळी गट वाटप योजनेत महिला बचत गटांना पहिले लाभ दिला जातो. केंद्र शासंकडून आणि महारष्ट्र शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या अल्प व्याजदर कर्ज योजनेतून पहिले प्राधान्य महिला बचत गटांना असते.

✅👉🏻 ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

महिला बचत गटाचे फायदे

महिलांना बचत गट मार्फत अनेक फायदे आहेत, स्वतः च्या बचती बरोबरच शासनाच्या योजनांच्या मदतीने महिलांना स्वतः च्या व्यवसायासाठी भांडवल उभे करता येते, त्याच बरोबर घरघुती अडचणींना सामोरे जाण्यासाठी आर्थिक पाठबळ बचत गटाच्या माध्येमातून मिळते. महिला बचत गटाचे फायदे आपण खाली पाहू.

 1. बचत गटाच्या माध्येमातून स्वतः च्या पैशाची बचत तर हितेच शिवाय गटातील अंतर्गत व्यवहाराने येणाऱ्या व्याजातून चार पैशाचा फायदा होतो.
 2. कुटुंबाच्या अडी-अडचणी समयी अल्प व्याजदरात कर्ज मिळते सावकाराकडे जायची वेळ येत नाही.
 3. बँकेकडून मिळणाऱ्या अल्प व्याजदरातील कर्जातून स्वतः चा व्यवसाय करता येतो.
 4. बचत गटातील महिलांनी मिळून एखादा व्यवसाय सुरु केल्यास त्याचा फायदा सर्व महिलांना होतो.
 5. बचत गटाच्या माध्येमातून होणाऱ्या मार्गदर्शक शबीर आणि मेळाव्या मुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती होते.
 6. बचत गटामार्फत मिळणारे शासनाचे अल्प व्याजदरातील कर्जातून शेती पूरक व्यवसाय करता येतो,ज्याचा फायदा शेती आणि मालक दोघांना होतो. ( दुग्ध व्यवसाय;- दुधाचे पैशे होतात आणि शेतीला शेणखत मिळते.)
 7. कुटुंबाच्या अडी-अडचणीला भक्कम आर्थिक पाठबळ मिळते, त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते.
 8. महिला बचत गटामुळे समाजात महिलांना मान-सन्मान मिळतो.
 9. कर्जातून उभारलेल्या व्यवसायाला शासन मार्केट निर्माण करून देते.
 10. बचत गटामार्फत उभारलेल्या व्यवसायांना शासन निरनिराळ्या सवलती आणि सबसिडी देते.
 11. बचत गट करत असलेल्या व्यवसायाला शासन पायाभूत सोयी सवलती निर्माण करून देते.

Conclusion

महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम या blog च्या माध्येमातून आपण महिला बचत गटाचे फायदे आणि शासनाच्या बचत गटा विषयीच्या कर्ज योजना या बद्दल माहिती पाहिली. शासन महिला गटासाठी निरनिराळ्या योजना आणीत आहे, ज्याचा फायदा महिला बचत गटांना होतो आहे.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

🟢🔵🟣  आमच्या सोशल ग्रुप मध्ये सामील होण्यसाठी इथे क्लिक करा.

Scroll to Top