मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही, ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा एक महत्वाचा दुवा आहे. गरिबांच्या कल्याणकारी योजना हि ग्रामपंचायत मार्फतच राबविल्या जातात. आज ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या पासून बर्याच गावांना ग्रामपंचायत कार्यालय नाहीत. कार्यालय नसल्यामुळे बर्याच वेळेस ग्रामपंचायत चा कारभार सरपंचाच्या घरी चलतो, आणि त्यामुळे  साहजिकच मनमानी निर्णय घेतले जातात व गावाच्या विकासाला खीळ बसते. महारष्ट्र शासनाने २०१८ पासून प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय उभे राहावे यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु केली आहे. या योजनेतून ज्या ग्रामपंचायतींना कार्यालय नाही अशा ग्रामपंचायतींना सदरील योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय बांधता येणार आहे. त्या साठी महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही

शासनाने पूर्वी लावलेली ग्रामपंचायत स्वनिधीची अट आता काढून टाकली आहे व या योजनेसाठी १००% अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्य्लायासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” सुरु केलेली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना पुढील चार वर्षांसाठी सन २०२३-२४ ते सन २०२७-२८ या कालावधीकरीता मुदतवाढ देवून राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वनिधीची अट रद्द करून वाढीव अनुदान

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस पूर्वी शासनाने दिलेल्या अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम हि ग्रामपंचायतला स्वतः उभी करवी लागत होती, त्यामुळे या योजनेस अल्प प्रतिसाद मिळत होता. पण आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार सदरील योजनेत ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास लोकसंखेच्या आधारावर १००% अनुदानावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना पुढील चार वर्षासाठी २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीत राबविली जाणार आहे.
  • मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २० लक्ष रुपये तर २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २५ लक्ष रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधी व्यतिरिक्त जर निधीची आवश्यकता असल्यास केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनेतून जसे कि वित्त आयोग निधी, जिल्हा ग्रामविकास निधी, स्थानिक विकास निधी इत्यादी योजनेतून निधी वापरता येणार आहे.
  • सदर योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम हे एक कालबद्ध कार्यक्रम आखून अभियान स्वरुपात राबविले जाणार आहे.
  • या योजने अंतर्गत पूर्वी प्रशासकीय मान्यता दिलेल्या पण कार्यरंभ आदेश ना दिलेल्या कामास हि योजना लागू असेल.
  • जय ग्रामपंचायतींना कार्यालय उपलब्ध नाही अशा ग्रामपंचायत नी प्रस्ताव तयार करून लोकसंखेचे मुल्यानुसार सदर ग्रामपंचायत तयार असल्याचे , ठराव व प्रमाणपत्र आणि जमीन ( जागा ) उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र जोडून जिल्हा परिषद येथे दाखल करावा.

वरील प्रमाणे मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेचा फायदा ग्रामपंचायत स्थरावर घेता येतो. या लेखा मध्ये शासनच्या नवीन निर्णया विषयी माहिती दिली आहे. निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Cunclusion

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही या लेखा मध्ये शासनाने ज्या गावंना ग्रामपंचायत कार्यलय नाहीत, अशा ग्रामपंचायती साठी पहिली स्वनिधीची अट रद्द करून निवीन शासन निर्यानुसार १००% निधी उपलब्ध करून दिला आहे, या विषयी आपण संपूर्ण माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका. आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्य सहभागी होण्यासाठी क्लिक करा.

1 thought on “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही”

  1. Pingback: भाषण कसे करावे मराठी /Learn How To Make Best Speech In Marathi

Comments are closed.

Scroll to Top