रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार

रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार, महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार आता E-Master गावात काढता येणार आहेत. रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या मजुरांना त्यांच्या केलेल्या कामाची मजुरी मिळावी म्हणून तालुकाच्या पंचायत समिती मधून मस्टर निघण्याची आणि पगार खात्यावर पडण्याची वाट पहावी लागायची पण आता मात्र शासनाच्या नवीन GR नुसार, गावातील ग्रामपंचायत Operator याच्या कडेच master काढून पगार खात्यावर घेता येणार आहे. तसेच रोजगार शेवक मार्फत नवीन कामाची मागणी हि गावातच करता येणार आहे. त्यामुळे कार्यालयीन कमत लागणारा वेळ हि वाचणार आहे. रोजगार शेवक यांच्यासाठी पण, पंचायत समिती चे खेटे मारणे कमी होणार आहे. शासनाच्या नवीन GR नुसार रोजगार हमी च्या कामाला गाव स्तरावर गती येणार आहे.रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार

रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मजुरांना त्यांचे अकुशल वेतन हे त्यांच्या कामच्या हजेरी पाटावरून ( E-Master ) मिळते,आणि नियमानुसार त्यांचे हजेरीपट बंद झाल्याच्या 15 दिवसाच्या आत त्यांचे वेतन त्यांच्या खात्यामध्ये यायला हवे. पण कार्यलयीन दिरंगाई मुळे बरेच दिवस मजुरांना वेतनासाठी ताटकळत बसावे लागत होते. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र Operator कडे हजेरीपट ( E-Master ) काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अशी असेल आपले सरकार सेवा केंद्रावर E-Master काढण्याची Process

रोजगार हमी योजने अंतर्गत गावात चालू असलेल्या कामावरील मजुरांच्या कामाचे 7 दिवसाचे मोजमाप करून रोजगार शेवक पूर्ण भरलेले मस्टर ग्रामपंचायत आपले सरकार शेव केंद्रावरील Operator कडे डेटा एन्ट्री करेल आणि त्या नंतर Operator पुढील Process फॉलो करेल.

1 ) ग्रामपंचायत स्तरावर चालू असलेल्या रोजगार हमी च्या कामावरील मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत Operator ला www.narega.in या साईटवर जावून GP. Login मध्ये Demand Upload करावी लागणार.

2 ) Demand Upload झाल्यानंतर याचा साईटवर मजुरांची Work Allocation प्रक्रिया पूर्ण करून तालुका स्तरावरील Operator ला दूरध्वनी व ई-मेल द्वारे सूचना करवी लागेल.

3 ) प्राप्त झालेल्या Demand नुसार तालुका स्तरावरील Operator PO. Login मधून master तयार करील, सदर master ची प्रत ग्रामपंचायत Operator GP. Login वरून काढू शकेल.

ग्रामपंचायत स्तरावरील E-Master  काढण्याच्या प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण संबंधित ग्रामपंचायत स्तरावरील सर्व व्यक्तींना देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत च्या GP. Login करिता User Name आणि Password उपलब्ध करून देण्यात येणार आहे. E-Master संबंधित शासन GR पाहण्यासाठी क्लिक करा.

Conclusion

रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार या blog मध्ये आपण शासनाच्या नवीन निर्णयानुसार EMaster काढण्याची माहिती पहिली.वरील पद्धतीने master आता गावातच काढता येणार आहेत. आणि त्यामुळे रोजगार शेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पंचायत सानितीचे मारावे लागणारे खेटे कमी होणार आहेत. माहिती तुम्हाला आवडली असल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका. आमच्या telegram ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

 

 

1 thought on “रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार”

  1. Pingback: महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून – www.pathanik.com

Comments are closed.

Scroll to Top