संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे हि शासनाकडून अशा लोकांसाठी राबविते ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, जे निराधार आहे. किंवा जे अपंग,अंध,अस्तीव्यंग,मूकबधिर,कर्णबधीर आहेत अशा दिव्यांगांसाठी हि योजना राबविली जाते. विधवा महिलांसाठी हि योजना राबविली जाते. दिव्यांगांनचे जीवन सुसह्य होईल त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. येणाऱ्या मानधनातून त्यांना आर्थिक मदत होईल, आणि ते आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतील, यासाठी शासन हि योजना राबविते. दिव्यांग आणि विधवा यांना शासन १२०० रु. मानधन दरमहा देते. हे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे टाकले जातात. एकदा अनुदान मंजूर झाल्यास हा निधी दरमहा लाभार्थ्यांना मिळत राहतो. दर एक वर्षाला हयात प्रमाणपत्र तहसील मध्ये लाभार्थ्याला जमा करायचे असते.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
संजय गांधी निराधार योजना हि समाजातील निराधार घटकांसाठी राबविली जाते. विधवा, दिव्यांग लोकांसाठी शासन हि योजना राबविते. या योजनेतून एक ठराविक मानधन लाभार्थ्यांना दरमहा त्यांच्या खात्यावर टाकले जाते. आज आपण संजय गांधी निराधार योजने विषयी परिपूर्ण माहिती पाहणार आहोत, या योजनेत कोण पात्र लाभार्थी आहेत, या योजनेची पात्रता व निकष काय आहेत, कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक असतात. हि सर्व माहिती आपण या blog मध्ये पाहणार आहोत.
संजय गांधी निराधार योजनेत कोण पात्र आहेत
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, कोणकोण या योजनेत पात्र आहेत, आणि या संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे कोणती लागतात ते आपण पाहू या योजनेत निराधार असेकी ज्यांना कुठल्याही प्रकारचा कोणाचाच आधार नाही असे व्यक्ती. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब, ज्या मुलांच्या पालकांचे निधन झाले असे अनाथ मुले,आणि तृतीयपंथी इत्यान्दीचा समावेश या योजनेत होतो.
निराधाराचा प्रवर्ग
निराधार प्रवर्गा मध्ये खालील व्यक्तींचा समावेश होतो.
- अपंग व्यक्ती.
- अंध व्यक्ती.
- अस्थिव्यंग व्यक्ती.
- मूकबधिर व्यक्ती.
- कर्णबधीर व्यक्ती.
दुर्धर आजार
- क्षयरोग झालेली व्यक्ती.
- पक्षघात झालेली व्यक्ती.
- प्रमस्तीष्कघात झालेली व्यक्ती.
- कर्करोग झालेली व्यक्ती.
- एड्स ( एच.आय.व्ही.+) व्यक्ती.
- कुष्टरोगी.
- सिकलसेल.
इत्यादी दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेतून अर्ज करता येतो.
वेगवेगळ्या प्रवर्गातील महिला
- निराधार महिला.
- घटस्पोट प्रक्रियेतील महिला.
- घटस्पोट झालेली पण पोटगी न मिळणारी महिला.
- घटस्पोट झालेली परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला.
- अत्याचारित महिला.
- वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली महिला.
- परित्यक्त्या महिला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब
विहित उत्पन्नाच्या मर्यादे नुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब पात्र राहील.
अनाथ मुले
अनाथ मुले ज्यांची पालक हयात नाहीत अशा अनाथ मुलगा व मुलगी हे या योजनेस पात्र राहतील.
तृतीयपंथी
तृतीयपंथी संजय गांधी निराधार योजनेत पात्र आहेत.
वरील बाबी मध्ये मोडणाऱ्या लाभार्थ्यांनाअर्ज करता येतो. संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे आपण खाली पाहणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
1 ) राहिशी दाखला :-ग्रामपंचायतचे लाभार्थी १५ वर्षापेक्षा जास्त दिवसापासून रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र.
2 ) वयाचा दाखला :- वैद्यकीय आदिक्षक ( ग्रामीण रुग्णालय ) यांचा वयाचा दाखला.
3 ) दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र :-दारिद्रय रेषेखाली असल्यास २००२ च्या दारिद्रय रेषेत नाव असल्याचे प्रमाणपत्र.
4 ) प्र पत्र ब :- २००२ च्या दारिद्रय रेषेत नाव असलेल्या लाभार्थ्याचे प्र पत्र ब संबंधित विस्तार ( पंचायत विभाग ) अधिकार्याच्या सहीने प्रमाणित.
5 ) अपंगत्वाचे प्रमाणपत्र :- अपंग लाभार्थ्यांनसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त अपंग असल्याचे अपंग प्रमाणपत्र.
6 ) दुर्धर आजार :-जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय आदिक्षक ( ग्रामीण रुग्णालय ) यांचा आजाराचा दाखला.
7 ) अनाथ असल्याचे प्रमाणपत्र :- ग्रामसेवक/प्रभाग अधिकारी यांनी दिलेला गटविकास अधिकार्ती व प्रकल्प अधिक्लारी यांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र.
8 ) परित्यक्त्या किंवा घटस्पोटीत महिला :- विधवा, परित्यक्ता,घटस्पोटीत, अत्याचारित असल्याचा ग्रामशेवक व तलाठी यांचे संयुक्तिक रित्या प्रमाणपत्र.
8 ) विधवा महिलेस पतीच्या मृत्यू प्रमाणपत्र, विधवा असल्याचेग्रामाशेवक यांचे प्रमाणपत्र.
9 ) अपत्य प्रमाणपत्र :- ग्रामशेवक.
10 ) शासकीय निमशासकीय सेवेत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र :- ग्रामशेवक.
11) उत्पन्नाचे प्रमाणपत्र :- दारिद्रय रेषेत नाव नसलेल्या लाभार्थ्यंना एकूण वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे लागते. ( उत्पन्नची अट २५०००/५०००० आशु शकते).
12 ) आधार कार्ड.
13 ) रेशन कार्ड.
14 ) बँक पासबुक प्रत.
15 ) दोन पासपोर्ट साईज फोटो.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे वरील प्रमाणे आहेत स्थानिक लेव्हल ला एखादा कागद कमी अधिक लागू शकतो.
Cunclusion
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे या blog मध्ये आपण संजय निराधार योजने बद्दल पूर्ण माहिती पहिली. वरील लेख वाचून तुम्ही संजय निराधार योजनेचा प्रस्ताव तयार करून गरजूंना शासनाची मदत मिळवून देवू शकतात. आम्ही आमच्या blog वर नेहमीच आहाच स्वरूपाच्या लोकहिताच्या शासनाच्या योजनान विषयी माहिती टाकत असतो, तुम्हाला जर अशाच नवनवीन योजनांची माहिती हवी असल्यास आमच्या फॉलो करा bel बटनावर क्लिक करा. telegram ग्रुप जॉईन करा.
Pingback: लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये