एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या एससी एसटीच्या योजनांन पैकी, सिंचन विहिरी साठी भरघोस अनुदानाची योजना एससी एसटी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविली जाते. कोरडवाहू शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली यावी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं या उद्देशाने शासनामार्फत एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी मार्फत वेगवेगळ्या दोन योजना राबविल्या जातात. शासनामार्फत सिंचन विहिरी साठी एक रकमी अडीच लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. हि सर्व माहिती आपण आज या लेखाच्या माद्यमातून पाहणार आहोत. एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

 सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना या दोन योजनेअंतर्गत एस सी एस टी च्या लाभार्थ्यांना सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान शासन उपलब्ध करून देत आहे. सदरील योजनेतून अगदी कमी कागद पत्राद्वारे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येते.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार Mahadbt पोर्टल वर शासनाने S. T. ( आदिवासी प्रवर्गातील ) लोकांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु केली आहे. सदरील योजनेतून कोरडवाहू शेतकर्यांना शासन सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना विहीर खोदण्यासाठी उपलब्ध करून देते. विहीर खोदकाम करताना विहिरीच्या खोद्कामानुसार बिल काढू शकता. विहीर पूर्ण झाल्यावर योजनेचे पूर्ण अनुदान विहीर पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केले जाते.

पात्रता

  • लाभार्थी आदिवासी समाजाचा असावा तसे जात प्रमाणपत्र आवश्यक.
  • लाभार्थ्याच्या नावे कमीत कमी ०.४० हेक्टर तर जास्तीत जास्त ६ हेक्टर पर्यंत लाभार्थी लाभ घेवू शकतात.
  • दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास प्राधान्य राहील.
  • विहीर घेण्याच्या जागे पासून दुसर्या विहिरीचे अंतर ५०० फुटाच्या जास्त असावे.
  • ७/१२ आणि जमिनीचा ८ अ जोडणे आवश्यक.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १५०००० ( दीड लाख ) पेक्षा जास्त नसावे.
  • तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक.

कागदपत्रे

१ ) आधार कार्ड.

२ ) बँक पासबुक.

३ ) जातीचा दाखला.

४ ) तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

५ ) ७/१२ व ८अ चा उतारा.

६ ) भूजल तज्ञांचा दाखला.

७ )दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

Online करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 👉 आपले सरकार Mahadbt Portal वर जा

👉 Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना.

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार Mahadbt पोर्टल वर शासनाने S.C. ( अनुसूचित जाती ) प्रवर्गातील लाभार्थ्यांना सिंचन विहीर योजना शासनाकडून राबविली जाते. या योजनेतून कोरडवाहू शेतकर्यांना विहीर खोदण्यासाठी शासन अडीच लाख अनुदान देते.

पात्रता

  • लाभार्थी S.C. समाजाचा असावा तसे जात प्रमाणपत्र आवश्यक.
  • लाभार्थ्याच्या नावे कमीत कमी ०.४० हेक्टर तर जास्तीत जास्त ६ हेक्टर पर्यंत लाभार्थी लाभ घेवू शकतात.
  • दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास प्राधान्य राहील.
  • विहीर घेण्याच्या जागे पासून दुसर्या विहिरीचे अंतर ५०० फुटाच्या जास्त असावे.
  • ७/१२ आणि जमिनीचा ८ अ जोडणे आवश्यक.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १५०००० ( दीड लाख ) पेक्षा जास्त नसावे.
  • तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक.

कागदपत्रे

१ ) आधार कार्ड.

२ ) बँक पासबुक.

३ ) जातीचा दाखला.

४ ) तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

५ ) ७/१२ व ८अ चा उतारा.

६ ) भूजल तज्ञांचा दाखला.

७ )दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

Cunclusion

एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना सदरील लेखा मध्ये आम्ही आपल्याला शासनाकडून मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या सिंचन विहीर योजंना विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. आपण या लेखाच्या माध्येमातून mahadbt पोर्टल वर जावून सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आपली मित्रांना शेअर नक्की करा. आम्ही नेहमी आपल्यासाठी नवनवीन माहिती लेख आणीत असतो, नवनवीन माहितीसाठी blog follo करा आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा. आणि bel बटनावर क्लिक करा.

👉 पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना”

  1. Pingback: अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

Comments are closed.

Scroll to Top