सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

सुकन्या समृद्धि योजना हि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानांतर्गत केंद्र सरकार कडून चालू करण्यात आलेली आहे. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि मुला-मुलीच्या जन्म दरातील वाढती दरी कमी व्हावी म्हणून शासन मुलींसाठी सदरील योजना राबवीत आहे. मुलीच्या जन्मा नंतर ती मुलगी आई-वडिलांना वझं वाटू नये, त्यांनी तिचे सन्मानाने पालनपोषण व शिक्षण करावे, हा उद्देश शासनाचा आहे. शासन सदरील योजनेतून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नासाठी भरीव निधीची तरतूद करून देते. परिस्थितीने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आपल्या मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी कर्ज घेण्याची गरज आता या योजनेमुळे पडणार नाही. आज आपण या योजने विषयी सविस्तर माहिती पाहू, योजनेचे स्वरूप, निकष आणि पात्रता या बद्दल जाणून घेवू. सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

केंद्र शासनाने 22 जानेवारी 2015 सुकन्या समृद्धि योजना हि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियाना अंतर्गत चालू केलेली आहे. मुलीच्या जन्मा पासून किंवा मुलीचे वय वर्ष 10 होण्याच्या आत तिच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये पालकाकडून खाते उघडले जाईल, आणि खात्यामध्ये वार्षिक कमीतकमी 250 रु. किंवा जास्तीत जास्त 1,50,000 लाख रुपये हप्ता जमा करता येयील. यावर शासन वार्षिक चक्रवाढ पद्धतीने व्याज देवून 21 वर्षापर्यंत   एक ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल. जमा झालेली रक्कम मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी वापरता येयील.

सुकन्या समृद्धि योजनेचे स्वरूप

मुलगी जन्माला आली कि, घरात लक्ष्मी आणि सुख समृद्धि घेवून येते या उक्ती प्रमाणे केंद्र शासन मुलीच्या जन्मा बरोबर मुलीला समृद्ध आणि भाग्यश्री बनवत आहे.

  • मुलगी जन्माला आल्यावर ती माता-पित्याला जड वाटू नाही आणि त्यांनी तिचे शिक्षण व लग्न थाटात करावे यासाठी शासन सदरील योजना राबवीत आहे.
  • मुलीचे घटते जन्मदर कमी करून मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासन  सुकन्या समृद्धि योजना  राबविते.
  • प्रत्येक मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावे ती मनाने आणि शरीराने परिपूर्ण व्हावी हा शासनाचा उद्देश आहे.
  • मुलीला समाजात समान वागणूक मिळावी व तिला सन्मानाने वागविले जावे.
  • आई-वडिलांनी आपल्या परिस्थिती मुळे मुलीचे शिक्षण थांबवू नाही.
  • आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्याची वेळ येवू नये हे शासनाचे उद्देश आहे.

सुकन्या समृद्धि योजनेचे निकष 

सुकन्या समृद्धि योजना हि S S Y लघु बचत योजना म्हणून हि संबोधिली जाते. तर काही जन हिला पोस्ट खाते योजना म्हणतात. या योजनेचे निकष खालील प्रमाने आहेत.

  • सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत लाभार्थ्याला खात्यामध्ये वार्षिक हप्ता कमीत कमी रु. 250 तर जास्तीत जास्त रु. 1,50,000 लाख भारता येतो.
  • मुलीच्या नावे खाते तिच्या पालका कडून उघडले जाईल, त्या वेळेस मुलीचे वय जन्मा पासून ते 10 वर्षाच्या आत असावे.
  • एक मुलीच्या नवे एक खाते उघडता येयील, तर दोन मुली असल्यास त्यांचे वेगवेगळे दोन खाते उघडता येतील.
  • सुकन्या समृद्धि योजनेच्या लाभासाठी उघडले जाणारे खाते हे पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडले जावे.
  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी 10 वी पास झाल्यानंतर खात्यातील काही रक्कम काढता येते, मात्र त्यासाठी शाळेकडून तसा पुरावा आणून पोस्टात किंवा बँक शाखेत द्यावा लागेल.
  • मुलीच्या वय वर्ष 18 नंतर तिचे लग्न करण्याचे ठरल्यास सदरील रक्कम व्याजा सहित काढता येवू शकते त्यासाठी शाळेचा 10 वी पास किंवा 18 वय वर्ष पूर्ण होत असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
  • सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत उघडण्यात आलेले खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसर्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा एका बँक शाखेतून दुसऱ्या बँक शाखेत ट्रान्स्फर करता येयील.
  • मुलीच्या नावे उघडण्यात आलेले खाते मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी परिपक्व झाल्याचे गृहीत धरण्यात येते.
  • सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत खोलण्यात आलेल्या खात्याला आयकर विभागाच्या कर नियमातून सुत दिली जाते.

सुकन्या समृद्धि योजनेच्या खात्यावरील ठेव व्यवहार 

  • सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत खोलण्यात आलेल्या खात्यावर वार्षिक रु. 250 ते 1,50,000 लक्ष रुपये जमा करता येतात.
  • एक वर्षात जमा केलेली रक्कम हि 1.50 लक्ष पेक्षा जास्त नसावी.
  • खात्यावर एकूण रक्कम 1.50 लक्ष पेक्षा जास्त सिकारल्या गेल्यास वरील रकमेवर या योजने अंतर्गत व्याज मिळणार नाही.
  • खात्यावर 1.50 लक्ष पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास वरील रक्कम कधी हि काढता येवू शकते.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून ते पुढील 15 वर्षाचा कालावधी हा या योजनेचा ग्राह्य धरला जातो.
  • लाभार्थी खात्यावर भरत असलेला वार्षिक हप्ता थकल्यास किंवा काही कारणास्तव भरणे न झाल्यास, प्रती हप्ता रु. 50 दंड या प्रमाणे थकलेल्या रकमेचे हप्ते भरून योजनेचे खाते पुन्हा चालू करता येते.
  • सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत नियमित भरणा असलेल्या खात्याचे पालक यांचा अकाळी मृत्यू झाल्यास ते खाते व्याजास पात्र असेल.

सुकन्या समृद्धि योजना Digital Acount 

सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत खोलले जाणारे खाते हे, इतर बँकेच्या Digital व्यवहार खात्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल वर Opret करता येणार आहे. तुम्ही  या योजने अंतर्गत आधार कार्ड, पॅन कार्ड च्या माध्येमातून आपल्या मोबाईलद्वारे खाते खोलू शकता. Digital व्यवहाराद्वारे तुम्ही खात्याचा वार्षिक हप्ता हा चेकद्वारे किंवा UPI पेमेंट द्वारे भरू हि शकता.

सुकन्या समृद्धि योजना 2023 : मिळणारे व्याज  

सुकन्या समृद्धि योजना हि एक बचत ठेव योजना आहे. या बचत ठेव खात्यावर शासन लाभार्थ्याच्या जमा ठेवीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज जमा करते. केंद्र शासनाच्या निर्देशानानुसार खात्यावरील रकमेवर नवीन निकषां नुसार 7.6% व्याज दिले जाते. पूर्वी व्याज टक्केवारी जास्त होती मात्र नवीन निर्णयाने कमी करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धि योजना

वरील प्रमाणे व्याजदर या योजनेतून शासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केले जाते. खायच्या Mature होण्यासाठी 21 वर्षाचा कालावधी लागतो. तर मुलीचे खाते खोल्या पासून 15 वर्षापर्यंत वार्षिक हप्ते भरावे लागतात. 21 व्या वर्षी एकूण हप्त्याची रक्कम आणि मिळणारे एकूण व्याजदर अशी एकत्रित रक्कम खात्यावरून उचलता येते. तुम्ही भरत असलेली रक्कम जर रु. 250 भरत असाल तर, त्या जमा होणाऱ्या एकूण रकमेच्या पटीत मिळणारे व्याज आणि रक्कम जमा होते. पण वार्षिक हप्ता रक्कम जर रु. 250 पेक्षा जास्त आणि रु. 1.50 लाख रुपये पेक्षा कमी जमा करत असाल तर भरत असलेली जमा एकूण रक्कम आणि त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम 15 वर्षाच्या कालावधीत खात्यावर जमा होते.

सुकन्या समृद्धि योजना खाते संचालन 

  • सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत खोलण्यात आलेल्या बचत खाते हे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत खाते पालकाच्या नावाने चालविले जाते.
  • लाभार्थी खातेदार 18 वर्षाची झाल्यावर खाते मुलीच्या नावे चालविले जाईल.
  • लाभार्थी खात्यासाठी लायक होण्या पर्यंत सगळा व्यवहार हा पालकाच्या नवे करण्यात येयील.
  • लाभार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्यास खात्यातील जमा रक्कम नोमिनी प्रमाणे तिच्या पालकांना दिली जाईल.
  • लाभार्थी मुलगी 18 वर्षाची होण्या अगोदर जर पालकाचा मृत्यू झाल्यास मुलगी खात्यावरील व्याजास पात्र राहील, तसेच खात्यावरील एकूण रक्कम व्याजा सहित मुलीला काढता येयील.
  • खातेदार मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 50% रक्कम काढता येवू शकते.
  • मुलीच्या 18 वर्षानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी रक्कम काढता येते, तसा शाळेचा पुरावा धाखल करावा लागेल.
  • मुलीच्या 18 वर्षा नंतर तिच्या लग्नासाठी एकूण रक्कम खाते बंद करून काढता येते.
  • मुलीच्या शिक्षणासाठी शाळेच्या प्रवेश सुळक किंवा शेक्षणिक खर्चासाठी प्रती वर्षा प्रमाणे फक्त 5 वर्ष रक्कम काढता येते. रक्कम काढण्यासाठी शाळेचा दाखला द्यावा लागतो.
  • मुलीच्या खाते उघडलेल्या तारखेपासून 21 वर्ष पूर्ण झाल्यावर खाते Mature होते.
  • लाभार्थी जर भारताचे नागरिकत्व सोडत असेल तर खाते बंद केले जाते.
  • लाभार्थ्याने भारताचे नागरिकत्व सोडल्यास किंवा रहिवाशी पत्ता बदल्यास खाते बंद होते.

सुकन्या समृद्धि योजनेसाठी पात्रता 

  1. मुलीचे पालक हे भारताचे कायम स्वरूपी रहिवाशी असावेत.
  2. सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत खोलल्या जाणारे खाते हे मुलीच्या वय वर्ष 10 होण्याच्या आत खोलले जावे.
  3. पालकाला जर दोन मुली असतील दोन्हीच्या नावे सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  4. पालकाला पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या वेळेस दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या जुळ्या मुली या योजनेस पात्र असतील.
  5. लाभार्थ्याला पहिल्या दोन मुली या योजनेस पात्र असतील मात्र तिसरे अपत्य जन्मास आल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  6. पालक लाभार्थ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. 1.50 पेक्षा जास्त नसावे
  7. सुकन्या समृद्धि योजनेचा लाभ हा फक्त राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोष्ट ऑफिस च्या खात्यावर करता येयील.

सुकन्या समृद्धि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. पालकाचा रहिवाशी दाखला.
  2. मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
  3. मुलगी 10 वर्षाच्या आत असल्यास तिला शाळेत दाखल केल्याचा दाखला.
  4. पालकाला तिसरे अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र.
  5. पालकाचे रेशन कार्ड.
  6. पालकाचे आधार कार्ड.
  7. पालकाचे दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र.

सुकन्या समृद्धि योजनेसाठी अर्ज कुठे करायचा 

सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत तुम्ही तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सुकन्या समृद्धि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि योजनेचा फॉर्म भरून देल्यास तुम्ही योजनेच्या लाभासाठी पात्र होता. योजनेसाठी खाते खोलल्या नंतर तुम्ही योजनेच्या वार्षिक हप्त्याने खात्याची सुरुवात करू शकता किंवा ठराविक रक्कम खात्यांमध्ये जमा करून हि खात्याची सुरुवात करता येते. या योजने अंतर्गत रु. 250 ते रु. 1.50 लाख पर्यंत रक्कम तुम्हाला वार्षिक हप्ता म्हणून भारता येते. भरत असलेला हप्ता जर काही कारणास्तव थकला तर नंतर तुम्ही थकलेल्या हप्त्याला दंड रक्कम 50 रुपये व हप्त्याची रक्कम अशी एकूण रक्कम भरून खाते पुर्वरत करता येते.

सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्ज PDF

सुकन्या समृद्धि योजनेसाठी आवश्यक असलेला फॉर्म नमुना सोबत दिला आहे. या फॉर्म मध्ये आवश्यक असलेली माहिती भरून फॉर्म तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा राष्ट्रीकृत बँकेत जमा करा. फॉर्म सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून फॉर्म दाखल करावा लागेल. खते open झाल्या बरोबर तुम्ही हप्ता म्हणून निश्चित केलेली रक्कम त्या खात्य मध्ये जमा करा. थेथून तुमचे खाते रेगुलर चालू होईल.

सुकन्या समृद्धि योजनेच्या आणखी माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दया.

Conclusion 

आम्ही आपल्याला सुकन्या समृद्धि योजना काय या योजनेचे स्वरूप, पात्रता आणि निकष काय आहेत या बद्दल पूर्ण माहिती दिली. तसेच सदरील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत याची माहिती दिली. वरील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही सदरील योजनेचा लाभ घेवू शकता. माहिती आवडल्यास शेअर करा. आणि अशाच माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

🟢👉🏻👉🏻 आमचे ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top