अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर

अटल बांबू समृध्दी योजना:- बांबू हे बहुउपयोगी पीक असून ग्रामीण तसेच शहरी भागातील लघु उद्योगात त्याला अत्यंत मागणी आहे. या बहुउपयोगी पिकाला ( Green Gold ) हिरवे सोने असे संबोधले जाते. अनेक लघु उद्योग बांबूवर अवलंबून असल्यामुळे, गरिबांच्या हाताला काम व रोजगार निर्माण करून देणारे प्रमुख साधन आहे. त्याचे गरीबाच्या जीवनात आणि उद्योगात विशेष स्थान आहे. या अनुशंगाने केंद्र शासनाने  राष्ट्रींय बांबू अभियानाची ( N.B.H. ) स्थापना केली आहे. या अभियाना द्वारे शेतकर्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि देशातील बांबूवर आधारित उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी  शेतकऱ्याच्या जमिनीवर तसेच शेतीच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृध्दी योजना सुरु करण्यात आलेली आहे. हि योजना काय आहे ते पाहू.अटल बांबू समृध्दी योजना

अटल बांबू समृध्दी योजना काय आहे

अटल बांबू समृद्धी योजनेत पूर्वी 1 हेक्टर शेत्रासाठी 600 रोपे देण्याचे प्रावधान होते आणि पिकांच्या देखभालीचा खर्च नव्हता. पण आता नवीन शासन निर्णयानुसार 1 हेक्टर च्या एवजी क्षेत्र वाढवून 2 हेक्टर करण्यात आले आणि रोपांची संख्या वाढवून 1200 करण्यात आली, त्या सोबतच पिकांच्या देखभालीचा खर्चाची तरतूद हि करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेती पूरक आणि वातावरण पूरक पिके घेता यावीत, पारंपरिक पिकांना फाटा देऊन अधिक सुलभ पद्धतीने शेत उत्पन्न मिळावे यासाठी शासन नवनवीन पिकांनचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा या साठी शासन सदरील योजना राबवित आहे.

✅👉🏻 पीएम सूर्यघर योजना: मीटर वीजबिलाची चिंता सोडा, केंद्र सरकारची नवीन योजना अर्ज सुरु

अटल बांबू समृध्दी योजनेची उद्दिष्ट

अटल बांबू समृद्धी योजना हि आद्योगिक कच्चा माल तयार करणे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे यासाठी सदरील योजना 50% ते 80% अनुदानावर चालू केली आहे.

  • उद्योगांच्या कच्च्यामालाच्या पूर्ततेसाठी आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात जोड देण्यासाठी शेत जमिनीवर बांबू क्षेत्र वाढविणे.
  • बांबू लागवडीतून पारंपारिक पिकला फाटा देत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणेआणि शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पादनात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रेरित करण्यासाठी अनुदान देणे.

✅👉🏻 ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर

केंद्र शासन बांबू लागवडीसाठी 50% अनुदान शेतकऱ्यांना देत आहे, बांबूनचे लागवड क्षेत्र वाढावे हा उद्देश शासनचा आहे. केंद्र शासन अनुदानावर रोपे आणि रोपांचा देखभाल खर्च उपलब्ध करून देत आहे. 2 हेक्टर शेत्रासाठी प्रती हेक्टर 600 झाडे या प्रमाणे 2 हेक्टर शेत्रासाठी 1200 झाडे शासन नवीन निर्णया नुसार देत आहे. रोपांची लागवड 5 x 4 अंतराने लागवड करायची आहे.

अनुदानाचे स्वरूप प्रथम वर्ष द्वितीय वर्ष त्रितीय वर्ष एकूण
प्रतीरोप 350 रु. 90 रु. 50 रु. 35 रु. 175 रु.

✅👉🏻 महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम

टिश्यू कल्चर बांबू रोपाकरिता प्रजाती 

  • Bambusa balcooa
  • Dendrocalamus brandisi
  • Bambusa nutan
  • Dendrocanus asper
  • Bambusa talda

वरील प्रजाती शासनाने सुचवलेल्या आहेत, या मध्ये नवीन जात शेत जमिनीच्या भागानुसार वाढवता येते. शासनाचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा.

Conclusion 

अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर या blog मध्ये आपण केंद्र शासनाच्या अटल बांबू समृध्दी योजना या बद्दल माहिती पहिली आहे. शासनाने शेतकरी आणि बांबूवर आधारित उद्योग व्यवसाय या बाबी लक्षात घेवून सदरील योजनेला सुरुवात केली आहे. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top