अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना स्वतः चा उद्योग व्यवसाय करता यावा या उद्देशाने अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ची स्थापना केली. या महामंडळ अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना स्वतः च्या उदर निर्वाहासाठी उद्योग-व्यवसाय  करता यावा म्हणून सवलतीच्या व अल्प व्याजदरात कर्ज पूरवठा केला जातो. आपल्या आयुष्यात माथाडी कामगार आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कै. आण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सदरील महामंडळ तयार करण्यात आलेले आहे. या महामंडळातून तरुणांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली जाते. प्रवासी वाहन असेल किंवा ट्रक्टर असेल अशा वाहनाच्या खरेदीसाठी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ सवलतीच्या आणि अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते.अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

सध्या बाजारात असणाऱ्या खासगी कर्ज कंपन्यांच्या तुलनेत महामंडळ अतिशय कमी आणि अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देते. आपण आणण्साहेब पाटील कर्ज योजना काय आहे आणि अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ कसे कर्ज उपलब्ध करून देते या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील यांच्या विषयी माहिती

माथाडी कामगाराची चळवळ प्रणेते म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब पाटील हे आपल्या आयुष्यभर माथाडी कामगार आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढले. आण्णासाहेब पाटील यांचा ५ जून १९३३ ला पाटण तालुक्यातील मंगरुळे या गावी झाला. ग्रामीण भागात जन्मलेले आण्णासाहेब पाटील कामाच्या शोधात मुंबईला आले. शरीराने धष्ट-पुष्ट असलेले अण्णासाहेब मुंबईला आल्यावर माथाडी कामगार म्हणून काम करू लागले. हे काम करत असतांना कामगारांना मेहनतीच्या हिशेबाने मिळणारी अल्प मजुरी आणि त्यात वयोमानानुसार उभे राहणारे आजार या भयाण परिस्थितीची जाणीव झाली. आणि यातूनच त्यांनी माथाडी कामगाराच्या हक्कासाठी लढा सुरु केला.

माथाडी कामगार म्हणून कामकारणाऱ्या मराठा समाजातील दुःख दारिद्र्ये पाहता त्यांनी माथाडी कामगारांच्या लढ्या बरोबरच मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी हि लढा उभा केला आणि ते आयुष्याच्या शेवट पर्यंत लढत राहिले.

✅👉🏻 www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या आर्थिक विकासाठी आणि उन्नतीसाठी राज्य शासनाने दि. २७/११/१९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. मराठा समाजातील गरीब कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांची सामाजिक स्तिती सुधारावी यासाठी सदरील मंडळाची स्थापना करण्यात अली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना उद्योग व्यवसायासाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. महाराष्ट्रातील गरीब मराठा कुटुंबांना व्यवसायासाठी कर्ज मदत करणाऱ्या अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून वैयक्तिक व्यवसायासाठी वाहन खरेदी करायचे असल्यास किंवा ट्रॅक्टर खरेदी करायचे असल्यास अत्यंत कमी दरात लोण उपलब्ध करून दिले जाते. शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नावाने एक ऑनलाईन पोर्टल तयार केलेले आहे, त्या पोर्टलद्वारे ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आटी व पात्रता

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला खालील पात्रतेची आवश्यकता असते.

  • या योजनेत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याने या योजनेचा किंवा इतर महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या जाती-गटासाठी कोणतेही इतर महामंडळ अस्तित्वात नाही अशा जाती-गटातील लाभार्थी सदरील योजनेस अर्ज करू शकतात.
  • दि. १ जानेवारी २०१९ पासून या योजनेत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा पुरुषासाठी जास्तीत जास्त ५० तर महिलांसाठी जास्तीत जास्त ५५ वर्ष असेल.
  • लाभार्थ्यांचे वार्षिक कॊटुंबिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी  निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलियर च्या मर्यादेत जे रु. ८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • या योजने अंतर्गत एकाच कुटुंबातील (रक्त नाते) संबंधित व्यक्ती कर्जा करीता सहकर्जदार राहिले असतील तरी महामंडळ कर्ज देते. फक्त साक्षीदार पहिला कर्जदार नसावा.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला महाराष्ट्रीयन भौगोलीक क्षेत्रात स्थायिक असलेल्या व cbs प्रनालीयुक्त बँके कडूनच कर्ज घेता येयील.
  • दिव्यांगासाठी एकूण निधीच्या 4% निधी राखीव ठेवण्यात येयील. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • महामंडळा कडील कर्ज योजनेचा लाभ हा कर्ज घेतल्यापासून 5 वर्ष किंवा प्रत्येक्ष कर्ज कालावधी या पेक्षा जे कमी असेल ते ग्राह्य धरले जाईल.
  • कर्ज रक्कम 10 लक्ष मर्यादेत, व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. 12% या नुसार जास्तीत जास्त 3 लाखा पर्यंतचा व्याज रकमेचा परतावा महामंडळ मार्फत करण्यात येयील.

वरील पात्रता अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक आहेत.

✅👉🏻 महिला बचत गटाचे फायदे: महिला बचत गट स्थापना व नियम

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर/वाहन कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी लाभार्थ्याला अतिशय कमी व्याज दरात व व्याज परताव्यासह लोण उपलब्ध करून दिले जाते. लाभार्थ्याला ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक वाहन खरेदी करायचे असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाकडून 10 लाखा पर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. सदरील योजनेतून खरेदी केलेल्या व्यावसायिक वाहन किंवा ट्रॅक्टर यावर लागणाऱ्या व्याजाचा परतावा जास्तीत जास्त 5 वर्षात मिळतो. या योजनेतून व्याज परतावा हा लाभार्थ्याच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जातो.

वैयक्तिक व्याज परतावा योजना या योजनेतून व्यावसायिक वाहन-ट्रॅक्टर खरेदी करतांना तो महाराष्ट्रातील महामंडळाने सुचविलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत कार्यवाही केलेली असावी. खासगी बँक किंवा लोन कंपनीकडून लोन करण्यात येवू नाही. ट्रक्टर बनविणाऱ्या OEM संथा मार्फत Institutional Sales महामंडळाच्या लाभार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येते.

खालील OEM संथा मार्फत Institutional Sales अंतर्गत मंडळाच्या लाभार्थ्याला विशेष सवलत देण्यात येते.

  1. Escort Kubota Ltd.
  2.  Mahindra & Mahindra Ltd.
  3.  Sonalika (Internation Tractors Ltd.)
  4.  Solis Tractors (solis Yanmar) (Internation Tractors Ltd.)
  5.  Swaraj Mahindra
  6.  CNH New Holland
  7.  Tractors & Farm Equipment Ltd.(TAFE)
  8.  VST Tillers Tractors Ltd.
  9.  Kubota Tractors
  10.  Eicher Tractors
  11.  Captain tractor
  12.  John Deere India Pvt. Ltd.
  13.  Force Motors Limited

Annasaheb Patil Loan Bank List/अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी बँक सूची

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून वैयक्तिक व्याज परतावा योजना मधून खरेदी करत असलेल्या व्यावसायिक वाहन-ट्रक्टरचे लोन करतांना ते कोणत्याही खासगी बँक किंवा लोन कंपनी कडून करण्यात येवू नाही. मंडळाने ठरवून दिलेल्या SBC बँक शाखे मार्फत खरेदी करण्यात यावा. बँक शाखेकडून खरेदी करण्यात आलेल्या ट्रक्टर-वाहनासाठी महामंडळ कर्ज योजनेचा लाभ घेता येतो. अण्णासाहेब कर्ज योजनेसाठी बँक सूची पुढील प्रमाणे आहे.

Annasaheb Patil Loan Bank List

अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडून गरीब आर्थिक दुर्बल घटकांना त्यांची आर्थिक स्तिती सुधारण्यासाठी कर्जाच्या योजना राबविल्या जातात. वैयक्तिक व्याज परतावा योजना ( IR-I), गट कर्ज व्याज परतावा योजना ( IR-II), गट प्रकल्प कर्ज योजना ( GL-I) या योजनांमधून घेतलेल्या कर्ज रकमेवर भरावे लागणारे व्याज लाभार्थ्याला परत केले जाते. या योजनेतून केवळ बँके मार्फत मंजूर झालेल्या कर्जालाच व्याज परतावा दिल जातो.

दि. 20 मे 2022 च्या नवीन निर्णयानुसार योजनेची मर्यादा 10 लाखां वरून 15 लाख करण्यात आलेली असून, अशा प्रकरणांना रु.4.5 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येतो. मात्र दि. 20 मे 2022 पूर्वीच्या L. O. I. धारकांना रु. 10 लाखाच्या मर्यादेत देखील व्याज परतावा कण्यात येणार असून त्या करिता रु. 3 लाखाची मर्यादा असेल.या व्याज परताव्याचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्ष आणि व्याजाचा दर द. सा. द.  शे. 12% असेल.

सदरील ओज्नेचा लाभ घेण्याकरिता लान्हार्थ्याने कर्ज मंजूर होण्याच्या दिनांकापूर्वी महामंडळाचे ONLINE पात्रता प्रमाणपत्र (LOI) काढलेले असणे आवश्यक आहे.

✅👉🏻 Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

Annasaheb Patil Loan Apply Online

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि मराठा समाजाच्या आर्टिक दुर्बल घटकांना व्यावसायसाठी कर्ज उपलब्ध करून देते. व्यावसायिक वाहन खरेदीसाठी मंडळाकडून लाभार्थ्यांना अल्प व्याजदरात लोन दिले जाते. तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि यांची अठीक स्तिती सुधारावी या धर्तीवर अण्णासाहेब पाटील महामंडळ काम करते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी पहिले OFLINE अर्ज करावा लागत होता. आत्ता मात्र महामंडळाने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ONLINE पोर्टल निर्माण करून दिले आहे. या पोर्टल द्वारे online अर्ज करता येतो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी Online अर्ज कसा करायचा

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी तुम्ही मंडळाच्या पोर्टलवर जावून online अर्ज करू शकता. मंडळाचे अधिकृत पोर्टल https://udyog.mahaswayam.gov.in हे आहे. या वेबसाईट वर जाऊन तुमी online अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.

सर्व प्रथम तुम्हाला मंडळाच्या महास्वयम या पोर्टल वर जावे लागेल. पोर्टलवर गेल्या नंतर तुम्हाल उजव्या कोपऱ्यात कृपया लॉगीन करा हा बॉक्स दिसेल. त्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password तयार करून टाकावा लागेल. त्या खालील रकान्यात कॅप्चा भरून नवीन लाभार्थ्याने नोंदणी वर क्लिक करायचे आहे.

नोंदणी वर क्लिक केल्या नंतर तुमची पुढे नवीन वापरकर्ता म्हणून पेज open होईल. त्या वर तूमचे पूर्ण नाव, लिंग, तुमचा आधार नंबर आणि आधार सलग्न मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि नंतर कॅप्चा टाकून NEXT या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

NEXT वर क्लिक केल्या नंतर तुमच्या मोबाईल वर OTP येयील ती टाकून तुम्हाला तुमचा online फॉर्म भरायचा आहे.लाभार्थ्याने फॉर्म भरून सबमिट केल्या नंतर पुढील 7 दिवसाच्या  अट लाभार्थी कर्ज घेण्यास पत्र आहे किंवा नाही हे, तुम्ही online करतांना टाकलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे कळवले जाईल.

लाभार्थ्याने अर्ज करतांना मंडळाच्या अति व शर्ती मंजूर असल्याचे शपथ पत्र अपलोड करायचे आहे.

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी Online अर्ज करतांना खालील दस्तावेज अपलोड करणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक दस्तावेज..

  1. आधार कार्ड.
  2. रहिवाशी पुरावा:- लाईट बिल/गॅस कनेक्शन/तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी दाखला/रेशन कार्ड/पासपोर्ट/भाडे कराराची पावती इत्यादी.
  3. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा.
  4. जातीचा पुरावा:-शाळा सोडल्याचा दाखला/जातीचा दाखला.
  5. एक पाणी प्रकल्प अहवाल:-online उपलब्ध करून दिलेल्या विवरण पत्रा नुसार.

✅👉🏻 CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

Annasaheb Patil Arthik Vikas Mandal Login

प्रथमतः तुम्हाला मंडळाच्या महास्वयम या पोर्टल वर जावे लागेल. पोर्टलवर गेल्या नंतर तुम्हाल उजव्या कोपऱ्यात कृपया लॉगीन करा हा बॉक्स दिसेल. त्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा Username आणि Password जो तुम्ही फॉर्म भरतांना तयार केला होता तो टाकावा लागेल. त्या खालील रकान्यात कॅप्चा भरून लॉग-इन वर क्लिक करायचे आहे.

लॉग-इन वर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज open होईल मोबाईल otp घेवून तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म तपासून पाहू शकता किंवा काही त्रुटी असल्यास तुम्ही ती त्रुटी परत भरून फॉर्म सबमिट करू शकता. तुम्हाला या द्वारे तुमच्या अर्जाची सद्य स्थिती पाहता येते.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी लाभार्थ्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  1. आधार कार्ड.
  2. रेशन कार्ड.
  3. एकूण कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
  4. 7/12 किंवा नमुना नंबर 8.
  5. शाळा सोडल्याचा दाखला/ जातीचा दाखला.
  6. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा दाखला.
  7. प्रकल्प अहवाल.
  8. आधार सलग्न मोबाईल नंबर.
  9. पासपोर्ट साईज 2 फोटो.

इत्यादी कागदपत्रे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक आहेत.

Conclusion

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online या लेखा मध्ये आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेविषयी सविस्तर माहिती पहिली. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकांना व्यवसाय वाहन घेण्यासाठी अल्प दरात कर्ज परतावा उपलब्ध करून देते. या योजनेची पात्रता कागदपत्रे आणि Online प्रोसेस या बद्दल पूर्ण माहिती आपण पहिली आहे. माहिती आवडली असल्यास गरजवंतांन पर्यंत अवश्य पाठवा. अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

🟢🔵🟣 आमचे ग्रुप जॉईन कण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online”

  1. Pingback: Maratha Aarakshan: शासन हैदराबाद गॅझेट लागू करणार

Comments are closed.

Scroll to Top