शासनाने शुक्ष्म, लघु उद्योग आणि मध्यम उद्योजकांसाठी आपला व्यवसाय नोंदणीची सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी नोंदणी कार्याची म्हटले तर सरकार दरबारी खेटे मारावे लागत असे, पण आता मात्र अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या हि आपल्या उद्योगाची नोंदणी करू शकता ते हि अगदी कमी कागदपत्रात. आपल्या व्यवसायासाठी लोन करायचे असेल किंवा इतर शासकीय फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे उद्योग आधार असणे आवश्यक आहे. उद्योग आधार द्वारे शासन तुमच्या उद्योगाची नोंदणी करून तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा ओळख क्रमांक तयार करून देते. ज्या द्वारे तुम्ही शासनाच्या व्यवसाय विषयीच्या योजनांचा लाभ घेवू शकता. उद्योग आधार आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन कशे करायचे ते आपण असे करा उद्योग आधारचे रजिस्ट्रेशन: उद्योग आधार या बद्दल माहिती पाहू.
उद्योग आधार
उद्योग आधार हे शासनानाच्या शुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ( MSME ) यांच्याकडून दिले जाणारे तुमच्या व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्रावर तुमच्या व्यवसायाचा ओळख क्रमांक असतो. आधार उद्योग हे शासनाच्या MSME पोर्टल वरून काढता येते. आधार उद्योग शासनाच्या व्यवसाय उद्योग विषयीच्या योजनांना आवश्यक असते. तुम्ही जर शासनाच्या उद्योग विषयीच्या योजनासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे उद्योग आधार असणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रक्रिया हि पूर्णपणे पेपरलेस आणि नी शुल्क आहे. उद्योग आधार ची नोंदणी होताच online e-प्रमाणपत्र दिले जाते.
उद्योग आधारचे फायदे
- उद्योग आधार हि कायमची नोंदणी आणि ओळख क्रमांक व्यवसायाचा असेल.
- MSME नोंदणी हि पूर्णपणे कागद विरहित आणि विना मूल्य आहे.
- एकदा नोंदणी केल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
- शासनाच्या विविध व्यावसायिक कर्ज योजनेसाठी आवश्यक आहे.
- प्राधान्य शेत्रातील बँक कर्जासाठी पत्र आहे.
- भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योग आधार आवश्यक आहे.
✅👉🏻 बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना: कामगार संसार बाटला योजना
उद्योग आधार रजिस्ट्रेशन
आपल्या उद्योगाची नोंदणी करणे हे व्यावसायिकांना महत्वाचे असते, त्याशिवाय बऱ्याच गोष्टींना अडचणी येतात. शिवाय शासनाच्या लाभाच्या योजना घेण्यासाठी हि उद्योग आधार आवश्यक आहे. उद्योग आधार रजिस्ट्रेशन कसे करायचे, या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
उद्योग आधार काढण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला शासनानाच्या शुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय MSME https://udyamregistration.gov.in यांच्या पोर्टलवर जावे लागेल. पोर्टलवर गेल्या नंतर सर्वप्रथम UDYAM REGISTRATION FORM – For New Enterprise who are not Registered yet as MSME या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर Aadhaar verification चे पेज open होईल.
Aadhaar verification चे पेज Open झाल्यावर तुम्हाला इथे एक रकान्यात तुमचा आधार नंबर आणि दुसऱ्या रकान्यात आधार नुसार असलेले तुमचे नाव टाकायचे आहे. त्या नंतर Validate & Generate Otp या बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर आलेला Otp पुढील रकान्यात टाकायचा आहे. तुमचे आधार सत्यापित झाल्या नंतर पुढील पेज Open होईल.
open झालेल्या पेजवर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची माहिती भरायची आहे. तुमचे आधार स्वतः चे आहे किंवा कंपनी/संघ यांच्या नावाचे आहे ते निवडून दुसर्या रकान्यात पॅन कार्ड नंबर भरायचा आहे. या नंतर आधार नंबर च्या अनुशंघाने तुमचेपॅन कार्ड होईल.
पॅन कार्ड सत्यापित झाल्या नंतर त्याखाली तुम्हाला तुमचा GSTIN नंबर आणि इतर माहिती वाचारली जाईल जी तुम्हाला टिकमार्क करून भरायची आहे.
Udyam Registration पेजवर तुम्हाला तुम्हाला तुमचे संस्थेचे/ स्वतः चे आधार अथवा पॅन कार्ड नंबर टाकायचे आहे. त्या खालील रकान्यात तुमचा मोबाईल नंबर आणि दुसर्या रकान्यात तुमचा e-mail टाकायचा आहे. त्या खालील तुमच्या जातीचाप्रवर्ग, लिंग, दिव्यांग आहे किंवा नाही, उद्यम नाव, युनिट नाव, तुमचा पत्ता इयादी बाबी भरायच्या आहेत.
फॉर्म पूर्ण भरून झाल्या नंतर सगळ्यात शेवटी असणारे Submit And Get Final Otp या बटनावर क्लिक करायचे आहे. otp आलेला भरून फॉर्म सबमिट केल्या नंतर तुम्हाला उद्योग आधार प्रिंट काढता येयील.
✅👉🏻 पावर टिलर सब्सिडी: पावर टिलर खरेदी करा 50% सब्सिडीवर
उद्योग आधार काढण्यासाठी कागदपत्रे
- तुमचे आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- तुमचा मोबाईल क्रमांक.
- GSTIN नंबर असेल तर.
उद्योग आधार काढण्यासाठी एवढेच कागदपत्रे लागतात. जास्त कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही.
Conclusion
असे करा उद्योग आधारचे रजिस्ट्रेशन: उद्योग आधार या लेखा मध्ये आपण उद्योग आधार काय आहे आणि ते कसे काढायचे या बद्दल माहिती पहिली. शासनाच्या विविध उद्योग विषयीच्या योजनांनसाठी हे अत्यंत आवश्यक असून, त्या शिवाय संबंधित योजनांचा लाभ घेता येत नाही. माहिती आवडली असल्यास शेअर करा.
🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा