कापूस सोयाबीन अनुदान e kyc: शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाई अनुदानासाठी शेतकऱ्यांना e kyc करायला सांगितली जाते. शासन या e kyc मार्फत शेतकऱ्यांचा डेटा आपल्या कडे जमा करत असते, आणि लिटी लाभार्थ्याला लाभ मिळाला किंवा किती लाभार्थी या पासून वंचित आहेत, याची माहिती समंधित विभागाकडे जाते. आता जवळ जवळ सगळ्याच शेवा शासनाने ऑनलाइन केल्या आहेत. शेतकऱ्यांना ही e kyc करण्यासाठी CSC केंद्रावर किंवा गावातील आपलेसरकार केंद्रावर करावी लागते. त्यासाठी पैसे ही मोजावे लागतात. पण ही e kyc तुम्ही तुमच्या मोबाईल वरपण करू शकता, कशी करायची ते आपण पुढे पाहणार आहोत.
कापूस सोयाबीन अनुदान e kyc
शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकर्यांना दिल्या जाणाऱ्या कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यानं कडून e kyc करून घेतली जाते. e kyc म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर (Electronic Know Your Customer). अत्याधुनिक साधनांच्या साह्याने शेतकऱ्यांची ओळख शासनाकडे केली जाते. ज्या शेतकऱ्याचा लाभ त्याच शेतकऱ्याला मिळावा हा उद्देश शासनाचा आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर दुसऱ्यानेच अनुदान लाटू नये यासाठी खबरदारी घेतली जाते.
✅👉🏻 Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती
कापूस सोयाबीन अनुदान
मागील वर्षी झालेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासन शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात काही आर्थिक मदत देत आहे. ही आर्थिक मदत पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी दिली जाते. अतिवृष्टी किंवा नेसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासन सदरील मदत देत असते. या वर्षी ही अतिरिक्त पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, आणि नुकसानीचा मोबदला दिला जाईल असे शासनाने जाहीर केलेले आहे.
e kyc म्हणजे काय
कापूस सोयाबीन अनुदान असोत किंवा इतर अनुदान असो शासन अनुदान वाटपा पूर्वी शेतकऱ्यांना e kyc करण्याचे सांगते. e kyc-Electronic Know Your Customer ( इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर ) शेतकऱ्यांची सत्यता या e kyc द्वारे पडताळून पहिली जाते. शासकीय अनुदान हे त्याच शेतकऱ्याच्या खात्यात पडावे यासाठी सदरील ऑनलाइन सिस्टीम वापरली जाते.
e kyc ही तुमच्या आधार कार्ड च्या साह्याने केली जाते, शासनाच्या जाऊन तुमच्या आधार नंबरचा OTP किंवा बायोमॅट्रिक मशीन च्या साह्याने केली जाते.
✅👉🏻 मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 – नवीन अर्ज, लाभ आणि कागदपत्रे
कापूस सोयाबीन अनुदान e kyc Process
कापूस सोयाबीनचे शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना CSC किंवा आपलेसरकार केंद्रावर जाऊन e kyc करावी लागते. आणि या बदल्यात पैसे ही द्यावे लागतात. मात्र आज आपण आपल्या मोबाईलवर कापूस सोयाबीन अनुदान e kyc कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.
कापूस सोयाबीन अनुदान e kyc करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला शासनाच्या कृषी विभागाच्या scagridbt.mahait.org या वेबसाईटवर जावे लागेल.
OTP e kyc Process:-
- कृषी विभागाच्या वेबसाईटवर आल्या नंतर सर्वप्रथम उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या दोन पर्याय पैकी दुसरे पर्याय म्हणजे Disbursement Status वर क्लिक करावे लागेल.
- Disbursement Status वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर ओपन होणाऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला कॅप्चा भरायचा आहे.
- कॅप्चा भरल्या नंतर त्याखालील OTP किंवा Biometric या पर्याया मधून एक पर्याय निवडायचा आहे. OTP:- तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्ड शी संलग्न असेल तर तुम्ही तुमच्या आधार OTP द्वारे e kyc करू शकता. Biometric:- तुमचा मोबाईल आधार संलग्न नसेल किंवा तुमच्या मोबाईलवर आधार OTP येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला Biometric पद्धतीने तुमच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा देऊन e kyc CSC केंद्रावर जाऊन करावी लागेल.
- मोबाईलवरून e kyc करत असतांना तुम्हाला ती OTP च्या साह्याने करावी लागेल. त्यामुळे OTP हा पर्याय निवडावा.
- Get Adhaar OTP या बटनावर क्लिक करा.
- Get Adhaar OTP या बटनावर क्लिक कारचाच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती OTP येईल ती तुम्हाला खाली भरून Get Data वरती क्लिक करायचे आहे. तुमचा Data पूर्ण होताच तुमची e kyc पूर्ण झालेली असेल.
Biometric e kyc Process:-
- Disbursement Status वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर ओपन होणाऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला कॅप्चा भरायचा आहे.
- कॅप्चा भरल्या नंतर त्याखालील OTP किंवा Biometric या पर्याया मधून Biometric पर्याय निवडायचा आहे.
- Biometric पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला त्याखालील बॉक्स मध्ये तुमचा डिवाइस निवडायचा आहे.
- त्या नंतर स्कॅन वर किल्क करून बोटाचा ठसा घ्यायचा आहे.
- बोटाचा ठसा घेतल्या नंतर तुम्हाला Get Data वरती क्लीककरायचे आहे. या वर क्लिक करताच तुमची माहिती ओपन होईल, अशा प्रकारे तुमची Biometric e kyc पूर्ण झालेली असेल.
कापूस सोयाबीन अनुदान E Kyc साठी कृषि विभागाकडून खालील व्हिडिवो द्वारे माहिती दिली जाता आहे.खालील व्हिडिवो पहा. व्हिडिवो पाहण्यासाठी खालील लिंक टच करा
व्हिडिवो पाहण्यासाठी लिंक टच करा👉🏻👉🏻 कापूस सोयाबीन अनुदान E Kyc
E Kyc करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड.
- आधार लिंक मोबाईल नंबर असलेला मोबाईल सोबत.
✅👉🏻 Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना
Conclusion
कापूस सोयाबीन अनुदान e kyc: कापूस सोयाबीन अनुदान e kyc करा मोबाइल वरून या लेखात आपण कापूस सोयाबीन अनुदान e kyc कशी करायची या बद्दल संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पहिली. या आधारे तुम्ही तुमची कापूस सोयाबीन अनुदान e kyc स्वतः आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्पुटर वरून करू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
🟢🔵🟣 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये होण्यासाठी इथे क्लिक करा.