कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming

कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming , नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आम्ही आपल्याला भारत सरकारच्या कुकुट पालन विषयी असलेलेल्या योजनेची माहिती देणार आहोत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत शेतकर्यांना जोडधंदा मिळावा त्या बरोबरच पशुधन उत्पादक क्षमतेत वाढ करणे,पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, वेरनीची उपलब्धता वाढविणे व नाविन्य पूर्ण उपक्रमास प्रोत्साहन देणे हा उद्देश समोर ठेवून सन २०२१-२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारित पुनर्रचना करण्यात आलेली आहे.उत्पादकता वाढविणे व आधुनिक तंत्र ज्ञानावर भर देने.हा मुख्य उद्देश हया योजनेचा आहे.ह्या योजनेत कुकुट पालन हा पात्र उपक्रम आहे.

अशा प्रकारे या विकास कार्यक्रमा अंतर्गत एकाच ठिकाणी मास, बकरीचे दुध, लोकर, अंडी उत्पादन, वैैरनीची उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे असा आहे. ह्या योजनेची संकल्पना म्हणजे असंघटीत शेत्राला संघटीत शेत्राशी जोडून कच्च्या मालाकरीता, उत्पादनाकरीता व विक्रीकरिता एकमेकाशी जोडून विकास साधने ही आहे.

महाराष्ट्र मध्ये लागू असलेली भारत साकरची ही योजना कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming मिळवण्यासाठी काय पात्रता आहे,कागदपत्रे कोणकोणती लागतात. अर्ज कुठे करायचा हया विषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदानLayer Poultry Farming

शेतकरी बांधवाना व बेरोजगार तरुणांना स्वतः चा व्यवसाय ऊभा करण्याची एक संधी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार कडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात किंवा रिकाम्या जागेत शेड उभारून, चार्यापाण्याची वेवस्था करून सुरु करू शकतात. आणि शासनाच्या मदतीने आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकतात. कुक्कुट पालना बरोबरच, शेळीपालन, लोकर मिळवण्यासाठी मेंढी पालन हे व्यवसाय आपण  एकाच जागेत करू शकता. भारत सरकारच्या उद्यमी मित्र ह्या Official Site वरून online पद्धतीने आपण हया योजनेचा लाभ घेवू शकता. व शेती करता करता ह्या जोड धंद्याने उद्यागपति होऊ शकता. अंड्याच्या उत्पादनासाठी चांगल्या जातीच्या कोंबड्या पाळल्यास उत्पादनात आणखी वाढ होते.

पुढे काही कोंबड्यांच्या जाती दिल्या आहेत ज्या अंडा उत्पादनासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत. चला तर जाणून घेवू सदरील योजनेची उद्दिष्ट्ये काय आहेत, ह्या साठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ह्याची सविस्तर माहिती आपण ह्या blog मध्ये पाहणार आहोत.

अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती.

कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात, त्या पैकी काही मासा साठी तर काही अंडा उत्पादनासाठी पाळल्या जातात. आपण येथे कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान ह्या योजनेची माहिती पाहत आहोत,मग अंडा उत्पादनासाठीच्या चांगल्या जातीच्या कोंबड्यांच्या जातीची माहिती इथे पाहू.

1 ) RIR – ( ऱ्होड आइलैंड़ रेड़ ) :- वजन वाढ धीम्या गतीने 6 महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु, एका चक्रात २२० ते २५० अंडी उत्पादन ( सर्वोत्कृष्ठ लेयर ).
2 ) ब्लैक अस्ट्रॉलॉप :-सर्वोत्कृष्ठ बहुपयोगी ब्रीड 3 महिन्यात २ किलो पर्यंत वाढ आणि एका चक्रात १६०-२०० अंडी उत्पादन.
3 ) ग्रामप्रिया :– १८० ते २०० अंडी.
4 ) देहलम रेड :– २०० ते २०० अंडी प्रतिवर्षी उत्पादन.
5 ) गिरीराज :- २ महिन्यात १ किलो वजन वाढ आणि एका अंडी चक्रात १५० अंडी उत्पादन.
6 ) वनराज :– २ महिन्यात १ किलो वजन वाढ एका अंडी चक्रात १२० ते १६० अंडी उत्पादन.
7 ) कडकनाथ :- औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध देशी वाण,धीमी वजनवाढ परंतु पोष्टीक, ५ महिन्यात १ किलो वाढ आणि एका चक्रात ६० ते ८० अंडी उत्पादन.

हया जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आहेत. शिवाय अंडा उत्पादनाला सर्वोत्कृष्ठ आहेत.

कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming 

अमलबजावणी यंत्रणा

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पात्र संथा-व्यक्तिगत /FPO/FCOs/JLG/ कलम 8 अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था.

१ ) अर्जदाराने https://www.nlm.udyamimitra.in पोर्टल वर NUM च्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार अर्ज सादर करावा.

२ ) राज्य अमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची छाननी करून पात्र अर्जास Online मंजुरी देयील व सदर अर्ज बँकेकडे मंजुरीस्तव सादर होईल.

३ ) बँकेने कर्ज पुरवठ्याची हमी दिल्या नंतर सदर प्रकल्प राज्याच्या कार्यकारी समिती समोर ( SLEC ) कडे मंजुरीस्तव सादर केला जाईल.

४ ) सदर प्रकल्पाला SLEC द्वारे मंजुरीस्तव शिफारस प्राप्त झाल्या नंतर, SIA ( State Amplementing Agency ) सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर apload करेल व सदर प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीस्तव सादर होईल.

अर्ज कसा करायचा

कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming योजनेसाठी भारत सरकारच्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या पोर्टेल UDYAMI MITRA वर जाऊन Online पद्धतीने अर्ज करावा लागतो. Portal open झाल्या नंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या login बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा असतो. मोबाईल नंबर टाकल्या नंतर आपल्याला otp येतो तो otp आपल्याला पोर्टेल वर प्रविष्ठ करावा लागतो. त्यानंतर open झालेला फॉर्म 4 step मध्ये पूर्ण भरावा लागतो.

अर्जदाराने UDYAMI MITRA पोर्टल वर NUM च्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार अर्ज सादर करावा. राज्य अमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची छाननी करून पात्र अर्जास Online मंजुरी देयील व सदर अर्ज बँकेकडे मंजुरीस्तव सादर होईल.

बँकेने कर्ज पुरवठ्याची हमी दिल्या नंतर सदर प्रकल्प राज्याच्या कार्यकारी समिती समोर ( SLEC ) कडे मंजुरीस्तव सादर केला जाईल.

सदर प्रकल्पाला SLEC द्वारे मंजुरीस्तव शिफारस प्राप्त झाल्या नंतर,SIA ( State Amplementing Agency )सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर apload करेल व सदर प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीस्तव सादर होईल.

आशा प्रकारे तुम्ही online पद्धतीने अर्ज सादर करू शकता. कुक्कुट पालनासाठी २५ लाख रु.अनुदान योजनेचा लाभ घेवू शकता. 

Layer Poultry Farming-कुक्कुट पालन योजनेची उद्दिष्ठये

१ ) लहान रूम मिंट कुक्कुटपालन आणि वराह पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती करणे.

२ ) जातीच्या सुधारणे द्वारे, प्रती पशु उत्पादकता वाढविणे.

३ ) मास,अंडी, शेळीचे दुध,लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ करणे.

४ ) मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढविणे- चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता वाढविणे.

५ ) मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिटच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.

६ ) शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देने.

७ ) कुक्कुटपालन, मेंढ्या,शेळी,चारा या प्राधन्य क्रमित क्षेत्रामध्ये उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देने.

८ ) शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देण्यासाठी, बळकट विस्तार यांत्रानाद्वारे पशुधन मालकाची सांगड घालने.

९ ) उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन उत्पादन सुधारण्यासाठी कोशल्य आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करने.

Layer Poultry Farming / कुक्कुट पालन योजनेची वरील उद्दिष्ठये आहेत. जेणे करून उत्पादन घेणाऱ्या व्यवसायिकाला काळाच्या बरोबर आपल्या उत्पादनाच्या जोरावर मार्केट बनवून मार्केटमध्ये टकून राहता येयील.

पात्रता निकष

Layer Poultry Farming-कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान योजने च्या पात्रतेसाठी खाली दिलेल्या निकषा मध्ये आपला प्रकल्प अहवाल बसायला हवा.

१ ) अर्जदार हा स्वतः प्रशिक्षित असावा किंवा ताच्याकडील तज्ञ अनुभवी असणे आवश्यक.

२ ) अर्जदारास त्याच्या राष्ट्रीय कृत खाते असलेल्या बँकेकडून संबधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक.

३ ) प्रकल्पासाठी स्वतः ची किंवा भाडेतत्वाची जागा आवश्यक.

४ ) KYC शी साठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक.

५ ) अर्जदाराने अर्ज online भरताना मूळ कागदपत्र apload करावीत.

कागदपत्रे

भारत सरकारच्या पशुधन व दुग्धव्यवसाय विभागा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या Udyam Mitra या Online portal द्वारे आपण Layer Poultry Farming-कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान योजनेला अर्ज करत असताना खालील कागदपत्र आपल्या कडे असावयास हवी.

१ ) सदरील योजनेसाठी प्रस्ताव तयार करत असताना त्या मध्ये कुठलीही त्रुटी नसावी प्रस्ताव परिपूर्ण असावा.

२ ) प्रशिक्षण/ अनुभव प्रमाणपत्र.

३ ) जमीन स्वतः ची असल्यास ७/१२ प्रमाणपत्र व भाड्याची असल्यास भाडेकरार पावती.

४ ) प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीवो ट्यागिंग फोटो.

५ ) स्वतः उभारलेले भांडवल किंवा बँक/ वित्तीय संस्था मार्फत मिळालेले कर्ज बाबत पुरावा.

६ ) आधार कार्ड.

७ ) प्यानकार्ड .

८ ) रहिवाशी पुरावा.

९ ) बँकेचे ६ महिन्याचे स्टेटमेंट.

१० ) बँकेचे कॅन्सल चेक.

११ ) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.

१२ ) शेक्षणिक प्रमाणपत्र.

१३ ) अर्जदार कॅटेगरी मधून येत असल्यास जात प्रमाणपत्र अनिवार्य राहील.

१४ ) वस्तू व सेवाकर प्रमाणपत्र ( लागू असल्यास ).

१५ ) कंपनी नोंदणी प्रमाणपत्र ( FPO,FCO,Sec.8-कंपनी करिता.)

१६ ) मागील 3 वर्षाचा ओडीट रिपोर्ट ( लागू असल्यास ).

१७ ) मागील 3 वर्षाचा आयकर विवरण पत्र ( लागू असल्यास )

वरील कागदपत्रांची आवश्यकता सदरील योजने साठी आवश्यक आहे.

अनुदान

अंड्यावरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी अधिकतम 50 लक्ष पर्यंत मिळू शकते.

Note :-

कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदानLayer Poultry Farming लेखामध्ये प्रकल्प प्रस्तावा विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे,हया पेक्षा अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करणे.

Conclusion

 वरील लेखा मध्ये आपण Layer Poultry Farming म्हणजेच अंड्यावरील कोंबड्या पालन कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदानLayer Poultry Farming विषयीच्या योजने समंधी सविस्तर माहिती पहिली. भारत सरकारकडून रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अंड्यावरील कुक्कुट पालन ही योजना शेतकऱ्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगार जे आपल्या पायावर उभाराहून व्यवसाय सुरु करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, आपण ह्या योजनेच्या माद्यमातून शासनाच्या मदतीने आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. दिलेल्या सूचना व माहिती नुसार आपण प्रस्ताव तयार केल्यास, हया योजनेसाठीच्या प्रयत्नात आपली निचीतच मदत होईल.

आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून योजने विषयीची योग्य व इथंभूत माहिती आपल्या पर्यंत पोहचविण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.आपल्याला जर अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती हवी असल्यास आम्हाला Subscribe करा. आमच्या whatsapp grupteligram grup मध्ये सामील व्हा आणि माहिती आवडल्यास इतर गरजवंता पर्यंत नक्की पोहोचवा. शेअर करायला विसरू नका.

हे पण वाचा : Maharashtra Construction Workers Scholarship Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Comments are closed.

Scroll to Top