कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023:2024

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 केंद्र शासनाच्या PM कुसुम सोलर योजने ( प्रधानमंत्री कुसुम योजना ) अंतर्गत महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या कुसुम सोलर पंप योजना हि शेतकऱ्यानंसाठी अतिशय उपयुक्त आहे. महाकृषी अभियांना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सदरील योजने मध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली आणणे या हेतूने हि योजना महाराष्ट्रात चालू करण्यात अली आहे. शेतकऱ्यांकडे जल सिंचनाचे साधन तर असते पण वीज जोडणी उपलब्ध नसल्यामुळे ते शेतीला पाणी देऊ शकत नाहीत, किंवा डिझेल इंजिन सारख्या खर्चिक साधनाने जमिनीला ओलिताखाली आणणे शेतकऱ्याला परवडणारे नसते अशा शेतकऱ्यांसाठी शासन सोलर पंप या योजनेतून उपलब्ध करून देते. या योजनेतून शासन शेतकऱ्यांना क्षेत्रफळा नुसार  ३ hp, ५ hp, आणि ७ hp क्षमतेचे सोलर पंप बसवून देते. आपण आज या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 उद्दिष्टे

कुसुम सोलर पंप योजनेच्या मध्येमातून शासन शेतकऱ्यांना आपली जमीन ओलिताखाली आणण्यासाठी मदत करते. सदरील योजनेतून शेतकऱ्यांना ९०% अनुदान शासन देते. उर्वरित रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.

  • अल्पभूधारक तसेच त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या लाभार्थ्यांना ओलिताखाली आणण्यासाठी शासन कुसुम सोलर पंप योजना राबवित आहे.
  • सिंचन साधन उपलब्ध असलेल्या मात्र वीज जोडणी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी शासन सदरील योजना राबवित आहे.
  • जे शेतकरी सिंचनासाठी डिझेल इंजिन चा वापर करतात, अशा शेतकऱ्यांना सोलर पंप देऊन त्यांचे शेती खर्च कमी करणे.
  • शेतकऱ्यांना अगदी कमी दारात सोलर पंप देऊन राज्यातील विजेवरील भार कमी करणे.
  • शेतकरी वापरात असलेल्या खर्चिक साधनाला एक चांगला पर्याय देऊन शेतीखर्च कमी करून शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 मिळणारा लाभ 

कुसुम सोलर पंप योजनेतुन शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्राच्या क्षमते प्रमाणे व सिंचनाच्या आवश्येकते प्रमाणे त्याला सोलर पंप दिला जातो.

२.५ एक्कर क्षेत्रफळ असणाऱ्या लाभार्थ्याला ३ HP सोलर पंप
५ एक्कर क्षेत्रफळ असणाऱ्या लाभार्थ्याला ५ HP सोलर पंप
५ एक्कर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या लाभार्थ्याला ७ HP सोलर पंप
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023:2024

शासन कुसुम सोलर पंप योजनेतुन शेतकऱ्याला ९०% पर्यंत अनुदान देते, तर उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

कुसुम सोलर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  1. लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड.
  2. लाभार्थी शेतकऱ्याची ७/१२ आणि होल्डिंग प्रमाणपत्र.
  3. शेतकऱ्याच्या शिवारातील एखाद्या शेतकऱ्याचे वीजबिल.
  4. स्वतः चा मोबाईल नंबर.
  5. बँक पासबुक झेरॉक्स.

अर्ज कसा व कुठे करायचा 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 या योजनेतून शासन लाभार्थ्यांकडून Online पद्धतीने अर्ज भरून घेते. महा कृषी ऊर्जा अभियांना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर अर्ज करावे लागतात. शासन प्रत्येक वर्षीचे एक टार्गेट ठरवून त्या टार्गेट नुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देत आहे. शासनाने तारीख जाहीर केल्या नंतर तुम्हाला त्या तारखेच्या आत या योजनेसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची स्थितीची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे दिली जाते. अर्ज मंजुरी नंतर तुम्हाला शासन नियमानुसार भरावयाची रक्कम तुमचा लाभार्थी हिस्सा D.D स्वरूपात शासनाने ठरवून दिलेल्या एजन्सीला भरावा लागतो.

तुमचा लाभार्थी हिस्सा भरल्या नंतर समंधीत एजन्सी तुम्हाला शेतात येऊन सोलर पंप ची फिटिंग करून देते. या योजनेला अर्ज करत असतांना तुमच्या जवळ तुमचे कागदपत्रे आणि वापरात असणारा मोबाईल नंबर असायला हवा. अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B

Conclusion 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 या योजने विषयी माहिती आपण वरील लेखात पाहिली. या लेखाद्वारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या सदरील योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. दिलेल्या साईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचे ग्रुप जॉईन करा. माहिती आवडली असल्यास आम्हाला फॉलो करा. आणि माहिती शेअर करा.

आमचे ग्रुप जॉईन करा

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023:2024”

  1. Pingback: कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

Comments are closed.

Scroll to Top