घरकुल योजनेच्या अनुदानात झाली भरघोस वाढ, किती मिळणार अनुदान वाचा सविस्तर

केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या कडून महाराष्ट्रातील बेघर कुटुंबासाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. गेली कित्येक वर्षापासून सलग या योजना राबविल्या जात आहेत. बेघर लाभार्थ्याला स्वतः चे घर मिळावे हा शासनाचा उद्देश या मघाचा आहे. वेगवेगळ्या योजनेतून एक  ठाराविक अनुदान घरकुल योजनेमधून लाभार्थ्याला देण्यात येते. घरकुलाचे अनुदान हे बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उपलब्ध करून दिले जाते.घरकुल योजना

घरकुल योजना महाराष्ट्र

महाराष्ट्रात अनेक योजनेतून बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. महाराष्ट्रात प्रत्येक योजनेतून लाभार्थ्याला साधारणतः 1 लाख 20 हजार इतके अनुदान घरकुल बांधणीसाठी दिले जाते तर 18 हजार घरकुलाचा पाया खोदण्यासाठी MREGS अंतर्गत आणि 12 हजार स्वछालय बांधकाम करण्यासाठी मिळतात. असे एकूण 1 लाख 50 हजार रुपये लाभार्थ्याला घरकुल योजनेतून अनुदान स्वरुपात मिळतात. पण वाढती माघाई पाहता शासनाने सदरील अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयानुसार नुसार पंतप्रधान घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्या पासून लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे.

घरकुल योजनेतून किती मिळणार वाढीव अनुदान

पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत मिळणारे 1 लाख 20 हजार अनुदान तसेच MREGS आणि स्वछालय बांधकामसाठी मिळून 30 हजार रुपये असे एकूण 1 लाख 50 हजार अनुदान मिळते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार पंतप्रधान घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्याला आता अतिरिक्त 50 हजार अनुदान मिळणार आहे. म्हणजेच आता घरकुल योजनेसाठी सगळे मिळून 2 लाख अनुदान मिळणार आहे.

मिळणाऱ्या वाढीव 50 हजार अनुदान मधून 15 हजार रुपये हे छतावरील सोलर सिस्टमसाठी बंधन कारक असणार आहे. रूफ टाॅप सोलर बसविण्यासाठी सदरील 15 हजार रक्कम वापरणे बंधन कारक आहे. रूफ टाॅप सोलर बसविल्या नंतरच सदरील मिळणार आहे, अन्यथा नाही. अतिरिक्त 50 हजार मधील उर्वरित रक्कम 35 हजार ही बांधकाम कामासाठी वापरता येणार आहे.

पंतप्रधान घरकुल योजनेत तुमचे नाव आहे का ? कसे करायचे चेक

पंतप्रधान घरकुल योजनेच्या सर्वे नंतर पत्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी शासनाकडून तयार करण्यात आलेली आहे. या यादी मध्ये नाव असणाऱ्या लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्यामध्ये लाभ देण्यात येणार आहे. या ग्रामपंचायत स्तरावरील मंजूर लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे ते आपण पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण https://rhreporting.nic.in या पोर्टलवरती जावे लागेल.
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पोर्टल वरती आल्या नंतर Social Audit Reports या पर्यायावर जावे लागेल.
  • Social Audit Reports या पर्यायामध्ये Beneficiary details for verification यावर क्लिक करावे लागेल.
  • त्या नंतर डाव्या कोपर्य मध्ये MIS Report मध्ये सर्व प्रथम तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • राज्य निवडल्या नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • जिल्हा निवडल्या नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे.
  • तालुका निवडल्या नंतर तुमचे गाव निवडायचे आहे.
  • गाव निवडल्या बरोबर त्या खालील कॅप्चा कोड बरून आल्यावर तुमच्या गावाची प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तुमच्या समोर ओपेन होईल, त्या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

अशा पद्धतीने प्रधानमंत्री घरकुल योजनेत तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

सारांश

घरकुल योजनेच्या अनुदानात झाली भरघोस वाढ, किती मिळणार अनुदान वाचा सविस्तर या लेखात आपण घरकुल योजनेच्या अनुदानात योजनेत झालेली वाढ आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेत लाभार्थी यांचे नाव आहे किंवा नाही हे कसे शोधायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

हे ही वाचा :-

आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top