चेक आधार लिंक बँक अकाउंट: डिजिटल युगात, आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र न राहता, अनेक सेवांचा मुख्य आधार बनलं आहे. डिजिटल व्यवहारात आधार कार्ड एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. लाभ, सबसिडी, आणि अनेक महत्वाच्या बँकिंग सेवांसाठी आधार हे आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजनेची रक्कम ही आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरच येते, त्यामुळे “चेक आधार लिंक बँक अकाउंट” ही प्रक्रिया आपल्यासाठी खूप महत्वाची ठरते.
आधार कार्ड फक्त ओळखपत्र आहे का?
आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नसून अनेक डिजिटलसेवा मध्ये एक महत्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड शासनाने आपल्याला दिलेला एका विशिष्ठ 12 अंकी ओळख क्रमांक आहे. जो प्रत्येक व्यक्तीचा बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेला आहे.
शासन अनेक गोष्टी आधार कार्डशी लिंक करत आहे, तुमचा मोबाईल नंबर, बँकेचा व्यवहार, शेतकरी असाल तर सातबारा रेकॉर्ड इत्यादी बाबी आता आता आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहेत.
बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्याची गरज का आहे?
बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे ही काळाची गरज बनली आहे. शासन गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी राबवीत असलेल्या योजनेचा लाभ सरळ लाभार्थ्याला व्हावा हा उद्देश शासनाचा आहे. डिजिटल बँकिंग व्यवहारामध्ये आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून आर्थिक व्यवहारात होणारी फसवणूक थांबवता येते.
बँक खाते आधार कार्डशी लिंक असण्याचे फायदे
- KYC प्रक्रिया सुलभ होते प्रत्येक वेळेस वेगवेगळी कागपत्रे जमा करत बसण्याची वेळ येत नाही.
- शासकीय लाभाचे थेट हस्तांतरण लाभार्थ्याच्या खात्यामध्ये होते (DBT).
- ओळख पडताळणीसाठी तसेच डिजिटल व्यवहार सुलभ आणि जलद होण्यास मदत होते.
चेक आधार लिंक बँक अकाउंट – स्थिती कशी चेक करायची?
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही चेक करण्यासाठी Online आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचा वापर करता येतो. online पद्धतीमध्ये कमी वेळात आधार बँक अकाउंटशी लिंक आहे का हे चेक करता येते, कसे ते आपण पाहू.
- सर्वप्रथम UIDAI च्या MY AADHAAR वेबसाईटवर जावे लागेल.
- MY AADHAAR या वेबसाईटवर आल्या नंतर ‘आधार सर्विसेस’ वरती क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर ‘आधार लिंकिंग स्टेटस’ वरती लिक करावे लागेल.
- नंतर ओपन होणाऱ्या पेजवर ‘बँक सीडिंग स्टेटस’ यावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पेजवर तुमचा आधार नंबर टाकून खालील कॅप्चा कोड भरून आलेला OTP भरून लॉगीन करायचे आहे.
- पुढील नवीन पेजवर पुन्हा एकदा ‘बँक सीडिंग स्टेटस’ वर क्लिक करायचे आहे, ‘बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँकेचे तुमच्या समोर ओपन होईल.
अशा सोप्या पद्धतीने आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही हे आपल्याला चेक करता येते.
निष्कर्ष
चेक आधार लिंक बँक अकाउंट: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? चेक करा या लेखात आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे या बद्दल सविस्तर माहिती पाहिली. MY AADHAAR या वेबसाईटच्या साह्याने चेक आधार लिंक बँक अकाउंट ही प्रोसेस करता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा:
- Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती
- Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा
- असे करा उद्योग आधारचे रजिस्ट्रेशन: उद्योग आधार
- PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा
- रेशन कार्ड: महाराष्ट्रात राबविली जाणार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम
- HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग, फी, आणि संपूर्ण माहिती
- Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज
आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर जा.