जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अ‍ॅपच्या मदतीने

मित्रांनो आपणाला बऱ्याच वेळेस आपली जमीन वाहितीला किती किती आहे, हे माहीत करून घ्यायचे असते पण जमीन मोजणी हि एक खर्चिक बाब असल्या कारणाने आपण जमीन मोजणी करत नाही. शासकीय जमीन मोजणी करायची म्हटले तर रीतसर शासकीय फिस भरून दिलेल्या तारखे पर्यंत वाट पहावी लागते. आणि या मोजणीला आपल्या शेजारील सर्व शेतकऱ्यांना नोटीस पाठवून कळवावे लागते. म्हणजे आपली जमिनीचे वाहितीचे शेत्र आपल्याला माहित करून घ्यायचे असते परंतु त्याचा त्रास मात्र शेजारील शेतकऱ्यांना होतो. पण आता मात्र आपण ऑनलाइन अ‍ॅप च्या मदतीने आपली जमीन घरच्या घरी मोजू शकतो. ती मोजणी कोणतीही फीस न भरता ऑनलाइन अ‍ॅप च्या मदतीने कशी करता येते ते आपण पाहणार आहोत. जमीन मोजणी

जमीन मोजणीच्या पारंपारिक पद्धती खर्चिक आणि वेळ खाऊ

जमीन मोजनी करायची म्हणले की, पूर्वी पारंपारिक साखळी पद्धतीने किंवा इतर पारंपारिक पद्धतीने मोजावी लागत असे. शास्त्रोक्त पद्धतीने करायची म्हणले तर शासकीय फीस भरावी लागत असे, आणि जेंव्हा तारीख भेटेल तेंव्हा मोजणी करून मिळत असे, या मध्ये भरपूर वेळ आणि खर्च हि होत होता. आता मात्र तुम्ही ऑनलाइन अ‍ॅप च्या माध्येमातून स्वतः मोबाईल द्वारे जमिनीची मोजणी करू शकता. या मध्ये तुमचा खर्च आणि पैसा देखील वाचतो.

जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अ‍ॅप च्या मदतीने

जमीन मोजनीसाठी तुम्हाला आता पारंपारिक पद्दत अवलंबिण्याची गरज नाही तुम्ही आता तुमच्या मोबाईल च्या साह्याने आधुनिक GPS पद्धतीने जमीन मोजणी करू शकता. यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करायचा आहे. त्या अ‍ॅप च्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता.

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हला तुमच्या मोबाईलच्या PLY STOR वरती जावे लागेल.

  • PLY STOR वरती गेल्यावर तुम्हाला GPS Area Calculator टाईप करावे लगेल, टाईप करताच दिसणारे पहिले अ‍ॅप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे.
  • हे अ‍ॅप डाउनलोड केल्या नंतर तुम्हाला त्या अ‍ॅप साठी हव्या असलेल्या परमिशन द्याव्या लागतील.
  • परमिशन दिल्या नंतर तुम्ही क्षेत्र हे पर्याय निवडून चालून किंवा म्यानुअल अशा दोन्ही स्पश्टीने जमीन मोजू शकता.
  • म्यानुअल पद्धती मध्ये तुमची जमीन निवडून त्यावर बांधा नुसार मार्किंग करून तुम्ही तुमचे एकूण क्षेत्र मोजू शकता.
  • अ‍ॅप मध्ये तुम्ही शेत जमिनीच्या बांधा वर चालून तुम्ही तुमच्या जमिनींची मोजणी करू शकता.

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा https://play.google.com/store/apps/details?id=kbk.maparea.measure.geo

निष्कर्ष

जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अ‍ॅप च्या मदतीने लेखात आपण कोणतीही फिस न भरता जमीन ऑनलाइन अ‍ॅप च्या मदतीने कशी मोजायची या बद्दल माहिती पहिली. अ‍ॅप साह्याने तुम्ही तुमची जमीन आपल्या मोबाईल च्या साह्याने घरच्या घरी मोजू शकता. मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे हि वाचा :-

अशाच नव – नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top