जालना जिल्ह्यात ५०% अनुदानावर गोठा आणि शेळी गट वाटप: मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या,२ बोकड गट वाटप करण्यात येणार आहे. गेली 3 ते4 वर्षापासून मराठवाडा विभागात कमी पर्जन्यमान असल्याने टंचाईची परिस्थिती उद्भवत आहे. या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागामार्फत अनेक उपाय योजना अरण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय/शेळीपालन/कुकूट पालन हे व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय समजले जातात. शेती करता करता शेतकऱ्याला आर्थिक समतोल साधता यावा, आणि त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शासन जालना जिल्ह्यासाठी २० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप अशी योजना राबवित आहे. या योजनेतून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर २० शेळ्या आणि २ बोकड असा शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.
सदरील योजना जालना जिल्ह्यासाठी मराठवाडा पॅकेज अंतर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आज पाहू.
मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या,२ बोकड गट वाटप योजना
मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान आणि टंचाईची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा म्हणून हि योजना जालना जिल्ह्यातील ७ तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱयांना उस्मानाबादी २० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप तसेच शेळ्यांनसाठी गोठा उभारणीस अनुदान अशा स्वरूपात राबविण्यात येणार आहे. हि संपूर्ण योजना लाभार्थ्याला ५०% अनुदानावर लाभ उपलब्ध करून देणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ हा ५०% अनुदानावर मिळणार असून, या योजनेसाठी अर्ज करतांना विशिष्ठ प्रवर्गाची अट नाही.
✅👉🏻 महाराष्ट्र कामगार नोंदणी: कामगार नोंदणी करा मोबाईल वरून
जालना जिल्ह्यात ५०% अनुदानावर गोठा आणि शेळी गट वाटप योजनेतून मिळणारे अनुदान
जालना जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून २० उस्मानाबादी शेळ्या, २ बोकड तसेच शेळ्यांच्या गोठ्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. सदरील योजनेतून रु. २,३१,४०० एव्हडी रक्कम खर्चासाठी प्रास्तवित असून, लाभार्थ्याला सुरुवातीला १००% रक्कम स्वतः उभी करायची आहे. लाभार्थ्याने गट खरेदी केल्या नंतर शासनाची अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सदरील योजने अंतर्गत शासन ५०% अनुदान लाभार्थ्याला उपलब्ध करून देणार आहे.सदरचे अनुदान प्रकल्प स्थापनेच्या पाहल्या वर्षा नंतर २०% दुसऱ्या वर्षा नंतर २०% आणि उर्वरित १०% अनुदान तिसऱ्या वर्ष नंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत थेट लाभार्त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अ. क्र. | तपशील | दर ( प्रति शेळी, बोकड ) |
२० शेळ्या +२ बोकड आकडे रुपये |
१. | शेळ्या खरेदी | ६,००० | १,२०,००० |
२. | बोकड खरेदी | ८,००० | १६,००० |
३. | शेळ्यांचा वाढा ( ४५० | २१३ रु. प्रति चौ. फूट | ९५,४०० |
एकूण | २,३१,४०० रु. |
लाभार्थी निवडीचे सर्वसाधारण निकष
- लाभार्थ्यांनकडे चारा उत्पादनासाठी स्वतः ची पुरेशी जमीन अणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांकडे शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी मोकळी जागा २०० चौ. फूट असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याने शेळीपालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
- छोटे कुटुंब संकल्पना अवलंबिवणारे कुटुंब योजनेस पात्र.
- शेळीपालन व्यवसाय करीत असणाऱ्या आणि निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य.
- सदरील योजनेत ३% विकलांग तसेच ३०% महिलांना लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
- मराठवाडा पॅकेज अंतर्गत प्रस्तावित ०२ देशी/संकरित गाई/म्हशीचा गट वाटप या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना सदरील योजनेचा लाभ घेता येणार नाही.
✅👉🏻 कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून
योजना अंमलबजावणी
सदरील योजनेचे अंमलबजावणी अधीकारी हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जालना हे राहणार असून, योजनेचेची अंमलबजावणी आणि निधी वितरित करण्याचे त्यांचे कडे असणार आहे.
अर्ज कुठे करायचा
मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या,२ बोकड गट वाटप योजना या योजनेसाठी तुम्ही तुमच्या पंचायत समिती मधील पशु विकास अधीकारी ( विस्तार अधिकारी ) पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे अर्ज करू शकतात.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जालना जिल्ह्यात ५०% अनुदानावर गोठा आणि शेळी गट वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- लाभार्थ्यांच्या मालकीची २०० चौ. फूट जागा असल्याचा पुरावा ( नमुना न.८ किंवा ७/१२ )
- छोटे कुटुंब प्रमाणपत्र
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- लाभार्थ्यांचे रेशन कार्ड
- लाभार्थ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक
- पासपोर्ट साईज फोटो
- अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता जालना जिल्ह्यात ५०% अनुदानावर गोठा आणि शेळी गट वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
✅👉🏻 PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर
Conclusion
जालना जिल्ह्यात ५०% अनुदानावर गोठा आणि शेळी गट वाटप: मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या,२ बोकड गट वाटप करण्यात येणार आहे या blog मध्ये आपण महाराष्ट्र्र शासनाच्या जालना जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या,२ बोकड गट वाटप योजनेविषयी संपूर्ण माहिती पहिली. या योजनेतून जालना जिल्ह्यातील शेतकरी आणि इतर लाभार्थ्यांना सदरील योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पूर्व प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करू शकतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवं नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.
Santosh Dasu Adhe
At. Gulkhand tanda post. Pangari gosavi tq. Mantha dist jalna