झलकारी देवी इतिहासातील एक दुर्लक्षित वीरांगना

१८५७ च्या उठावात संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटून उठलेला होता. याच उठवा दरम्यान इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले होते, या आक्रमणातून झाशीच्या राणीला सुखरूप गडा बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांगना म्हणजे झलकारीदेवी.झलकारी देवी इतिहासातील एक दुर्लक्षित वीरांगना

झलकारी देवी इतिहासातील एक दुर्लक्षित वीरांगना

झलकारीदेवी यांचा जन्म झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये त्या लहानपणापासूनच प्रभावशाली होत्या, स्थानिक लोकांच्या गीतांमध्ये झलकारीदेवी यांच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. त्या लहान असतांना गाई सांभाळण्यासाठी म्हणून शेतात गेल्या असतांना त्यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला, पण झलकारीदेवी यांनी केवळ हातातील कुराडीच्या साह्याने वाघाला मारले असे स्थानिक कथेमध्ये सांगितल्या जाते.

अशा प्रतिभावान झलकारीदेवी या पुढे झाशीच्या राणी यांच्या सैन्यात एका तुकडीचे नेतृत्व करू लागल्या. झलकारीदेवी या हुबेहूब झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारख्या दिसायच्या, त्यामुळे त्यांना राज कारभारात विशेष स्थान होतं.

झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांचे आक्रमण आणि झलकारी देवी यांची सुटका

१८५७ च्या उठवा दरम्यान इंग्रजांनी झाशीवर ताबा मिळविण्यासाठी झाशीच्या किल्ल्यावर आपला फौजफाटा घेवून आक्रमण केले. गडामध्ये राणी लक्ष्मीबाई, झलकारीदेवी आणि त्यांचे मोजके सैन्य होते.

किल्ल्या जवळ छावणी टाकून असलेले पेशव्यांचे सैन्य मदतीला येयील या आशेने बसलेल्या झाशीच्या राणींना पेशव्यांचे सैन्य येत नाही हे कळल्यावर घडवरून सुखरूप बाहेर पडणे हा एकमेव पर्याय राहिला होता.  इंग्रजांनी आपल्या दारूगोळ्याच्या बळावर किल्ल्यावर मारा चालू केला. दोन्ही बाजूने युध्द सुरु असतांना गडातील एक द्वारपाल इंग्रजांना फितूर झाला आणि त्याने आतून दरवाजा उघडला.

राणी लक्ष्मीबाई यांच्या सुटकेसाठी प्राणाची आहुती : झलकारी देवी

आतून दरवाजा उघडताच किल्ल्या मध्ये घनघोर युद्ध सुरु झाले, संखेने सैन्य कमी असल्याने आपण जास्तवेळ टिकाव धरू शकता नाही हे झलकारी देवी यांच्या लक्षात आले, आणि मग राणींला सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढविली, स्वतः राणीचा वेश धारण करून राणी एका गुप्त मार्गे गडा बाहेर काढले आणि स्वतः झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून स्वतः युद्धात उतरल्या.

वाऱ्याच्या वेगाने लढणाऱ्या झलकारीदेवी पाहून इंग्रजांनी त्यांना वेढा घातला आणि झेरबंद केले. इंग्रजांना वाटलं आपण झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला कैद केले पण जेंव्हा त्यांना कळाले की राणी सुखरूप गडा बाहेर निघून गेल्या आणि या राणी नसून त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या झलकारीदेवी आहेत, तेंव्हा त्यांनी झलकारी देवी यांचा वध केला.

सारांश

अशा शूर विरांगांना झलकारी देवी यांची इतिहासातील कारकीर्द ही अजरामर आहे, पण इतिहासात त्यांना म्हणावे तसे स्थान इतिहासकारांनी दिलेले दिसत नाही. उलट काही स्तानिक कथांमध्ये झलकारी देवी याच झाशीच्या रक्षणासाठी आणि राज्य सुरक्षित ठेवण्यासठी मैदानात लढत राहिल्या तसेच त्यांना राज्यकारभार चालविण्याचे ही संपूर्ण ज्ञान होते.

माहिती संकलन :- Wikipedia and books

माहिती आवडली असल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा.

आमच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर जा.

हे हि वाचा:-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top