नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र शासन मराठा तरुण-तरुणीसाठी अनेक योजना राबवीत आहे. सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (Incubation) उपक्रम, डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना, महाराजा सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती योजना या सारख्या अनेक योजना शासन मराठा तरुण-तरुणींसाठी सारथी पोर्टल मार्फत राबवीत आहे. अशाच स्वरुपाची नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना सारथी मार्फत चालू करण्यात आलेली आहे. या योजनेतून माह्राष्ट्रातील तरुण-तरुणींना तसेच शेतकऱ्यांना शेती पिकांना फवारणीसाठी उपयुक्त असलेले ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण हे विना मूल्य देण्यात येणार आहे. हि योजना काय आहे, आणि अर्ज कसा करायचा ते आपण पाहू.
नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना
कृषी क्षेत्रात कृषी यांत्रिकीकरण वाढावे, आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने शासन अनेक योजना राबवीत असते. शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शासन प्रयत्नशील असते. शेती मध्ये विविध फळपिके, भाजीपाला, रब्बी व खरीप शेती पिके यांच्या फवारणीसाठी ड्रोन हे अत्याधुनिक यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. ग्रामीण भागात ड्रोन चालीवणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी आणि शेतीशेत्रातील लक्षित गटांना युकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना हि सारथी मार्फत राबवीत आहे.
सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद केलेली असून,सदरील प्रशिक्षण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रा मार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. हे 7 दिवसाचे प्रशिक्षण असून या मध्ये 5 दिवस ड्रोन पायलटिंग आणि 2 दिवस फवारणी करण्याचे प्रशिक्षण याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात 7 दिवसाच्या 10 प्रशिक्षानार्थ्याच्या 4 बॅचेस घेण्यास सबंधित केंद्राने मान्यता दर्शवली आहे.
नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना पात्रता व निकष
- लाभार्थ्याचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
- लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा. मात्र असे लाभार्थी न मिळाल्यास अन्य विषयाचे पदवीधरांचा विचार करण्यात येयील.
- मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे किंवा EWS प्रमाणपत्र आवश्यक.
- प्रशिक्षणार्थी लाभार्थ्याकडे वैध पासपोर्ट असावा.
- वैधकीय योग्यता ( फिटनेस ) प्रमाण असावे.
- शेतकरी कुटुंबातील सदस्यास प्राधान्य.
✅👉🏻अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: Annasaheb Patil Loan Apply Online
असा करा अर्ज
नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना हि महाराष्ट्राच्या स्वायत्त संस्था असलेल्या सारथी मार्फत राबविली जात आहे. या योजने अंतर्गत मराठा समाजातील शेतकरी/तरुण-तरुणींना ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा कार्याचा ते आपण पाहू.
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असेलेल्या सारथी https://sarthi-maharashtragov.in/ पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर गेल्या नंतर डाव्या साईडला असलेल्या सगळ्यात वर दिसणाऱ्या सूचना फलक या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक केल्या नंतर सदरील योजनेचे नाव असणाऱ्या पर्यायाला क्लिक करा. त्या नंतर तुमच्या मोबाईल e-mail वरून लॉगीन होईल किंवा कॉम्पुटर वर तुम्हाला तुमची e-mail टाकावा लागेल आणि शेवटी असलेल्या पर्याय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का या खाली Yes किंवा No निवडायचे आहे. या नंतर Next वर क्लिक करायचे आहे. Next वर क्लिक करून पुढील फॉर्म भरायचा आहे.
✅👉🏻 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना
Conclusion
नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना: मराठा, कुणबी-मराठा शेतकरी/युवक/युवतींनी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा या लेखात आपण मराठा शेतकरी/ तरुण-तरुणींसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजने बद्दल माहिती पहिली आहे. या योजनेसाठी शासनाकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती आवडली असल्यास शेअर करा.
🟢🔵🟣 आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.