नोकरी विषयक जाहिराती: नवीन नोकरी कुठे शोधायची जाणून घ्या संपूर्ण माहिती

नोकरी विषयक जाहिराती कुठे शोधायच्या हा सर्वश्रुत प्रश्न आहे, आपल्याला हवी असलेल्या नोकरी संबंधी जाहिरात कुठे आणि कशी पाहता येयील यासाठी बेरोजगार प्रयत्नशील असतात. आज नोकरी मिळविणे हे सगळ्यात जास्त आव्हानात्मक काम झाले आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण हेराण झाले आहेत. शासकीय विभागात निघणाऱ्या जागा किंवा खासगी क्षेत्रात निघणाऱ्या जागा यांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी नोकरी विषयक निघणाऱ्या जाहिराती कुठे शोधायच्या या बद्दल माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.नोकरी विषयक जाहिराती

नोकरी विषयक जाहिराती देणारे शासकीय पोर्टल

राज्यात आणि केंद्रात निघणाऱ्या नोकरी विषयक निघणाऱ्या जाहिराती या शासकीय पोर्टल वरून प्रकाशित केल्या जातात.या पोर्टल वर जावून प्रकाशित जाहिराती मधून हवी असलेली नोकरी मिळविता येते. महाराष्ट्र शासनाच्या नोकरी शोधा हे एक पोर्टल आहे, ज्याच्या माध्येमातून महाराष्ट्रात निघणाऱ्या शासकीय विभागातील जाहिराती विषयी माहिती आपल्याला मिळते.

नोकरी शोधा -महाराष्ट्र शासन पोर्टल

नोकरी शोधा हे महाराष्ट्र शासनाचे एक अधिकृत वेब पोर्टल आहे ज्याच्या माध्येमातून शासकीय विभागातील रिक्त पदा विषयीच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. या पोर्टल वर अनेक विभागाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात.

केंद्रीय लोकसेवा आयोग -युपीएससी

भारत सरकारने निर्धारित केलेल्या परीक्षेच्या नियमांनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे विविध पदांसाठीच्या परीक्षांचे आयोजन न्याय्य आणि निःपक्षपाती पद्धतीने केले जाते. केंद्र शासनाच्या सेवेतील, अ आणि ब गटातील विविध पदांसाठी अनुरूप उमेदवारांची गुणवत्तेवर आधारित निवड करण्यासाठी आयोगातर्फे परीक्षा घेतल्या जातात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – एमपीएससी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सरकारी सेवेत विविध पदांवर काम करण्यासाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो. त्याचबरोबर भरतीबाबतचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या, शिस्तभंग कारवाई अशा विविध बाबींवर सरकारला सल्ला देतो.

महाजॉब

कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ आणि मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा महाजॉब पोर्टलचा उद्देश आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच श्रम आणि कौशल्य विकास – उद्योजकता विभाग यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.

महास्वयम कर्मचारी नियोक्ता मंच

महास्वयम पोर्टल हा विद्यार्थी, युवा वर्ग, नोकरदार, प्रशिक्षक, उद्योजक आणि नोकरीच्या शोधात असणारे, अशा सर्वांसाठी सामाईक मंच उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र राज्य शासनाचा अभिनव उपक्रम आहे.

नोकरी विषयक जाहिराती देणाऱ्या वेबसाईट

शासकीय पोर्टल बरोबरच काही खासगी वेबसाईट वरून सुद्धा नोकरी विषयक जाहिराती दिल्या जातात. त्या कोणत्या वेबसाईट आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.

Mahabharti

महाभारती या वेबसाईट वरून शासकीय विभागातील निघणाऱ्या रिक्त पदाच्या जाहिराती तसेच खासगी शेत्रातील जाहिराती दिल्या जातात. वेबसाईट ला भेट देवून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या जाहिराती विषयक माहिती मिळवू शकता.

Maha NMK

Maha NMK या वेबसाईट वरून सर्वच क्षेत्रात निघणाऱ्या भरती विषयी जाहिरात प्रकाशित केली जाते.

Majhi Nukari

माझी नोकरी या वेबसाईट वरून देखील शासकीय आणि खासगी शेत्रातील निघणाऱ्या जागा विषयी जाहिरात प्रकाशित केली जाते.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी विषयक जाहिराती शोधणे

अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, ज्यांच्या द्वारे शासकीय जागा तसेच खासगी जागा यांच्या विषयी जाहिराती प्रकाशित केल्याजातात. लिंक्डइन, व्हाट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अनेक संस्था किंवा वयक्तिक पेजवर निघालेल्या जागेच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. सोशल मीडियाशी जोडून राहिल्यास नोकरी विषयक जाहिरात सहज पाहता येते, आणि आपल्या पात्रतेनुसार हवी असलेली नोकरी मिळविता येते.

सारांश

नोकरी विषयक जाहिराती: नवीन नोकरी कुठे शोधायची जाणून घ्या संपूर्ण माहिती या लेखात आपण नोकरी विषयीच्या जाहिराती कुठे आणि कशा शोधायच्या या बद्दल सविस्तर माहिती पहिली. शासकीय पोर्टल किंवा खासगी वेबसाईट च्या मध्येमातून निरनिराळ्या विभागात किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये निघणाऱ्या जागांविषयीची जाहिरात शोधता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

हे हि वाचा :-

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टाच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top