नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स: The Best Tips for Job आजच्या काळात नोकरी मिळविणे ही सगळ्यात जास्त आव्हानात्मक गोष्ट झालेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर Job मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. स्वतः च्या करियर विषयी हव्या असलेल्या गोष्टी साध्य करायच्या असल्यास तुम्हाला आजचे तंत्रज्ञान, स्पर्धा, आणि करियर विषयी सतत अपडेट राहावे लागते. डिजिटल युगात तंत्रज्ञानाशी सतत जोडून राहणे हि काळाची गरज झालेली आहे. देशात सर्वच क्षेत्रात होत असलेली प्रगती तुम्हाला करियर च्या नव्या संधी उपलब्ध करून देत आहे. बऱ्याच वेळेस शासनाच्या निघालेल्या भरती प्रक्रिया माहित होत नाही, आणि केवळ त्यामुळे पात्रता असताना बरेच जन वंचित राहतात.
नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best for Job या लेखात आपण आपल्या करियरसाठी हवा असलेला योग्य Job कसा आणि कुठे शोधायची या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
नोकरी
आपली शिक्षणाची पात्रता पूर्ण केल्या नंतर प्रत्येकाला त्या पात्रते प्रमाणे नोकरी मिळावी हि अशा असते. आपण शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाचे फलित म्हणजे नोकरी, शिक्षणाच्या आणि कौशल्याच्या पूर्ततेसाठी आपण आयुष्याची काही वर्ष दिलेली असतात तसेच त्यासाठी आर्थिक भार ही आपल्या पालकांनी उचलेला असतो. या सगळ्या गोष्टीची पूर्तता म्हणजे आपल्याला मिळालेला योग्य Job होय. आपल्या पात्रते प्रमाणे आपल्याला Job कसा मिळवता येईल या बद्दलचे काही मार्ग आणि टिप्स आपण पाहणार आहोत.
ग्राहक सेवा केंद्र: SBI ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी असा करा Online अर्ज
नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स
आपल्या स्वप्नातील नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. योग्य शिक्षण आणि कौशल्य प्राप्त केल्या नंतर Job मिळवण्यासाठी प्रयत्न करावी लागतात. Job शोधण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म चा वापर केला तर नोकरी मिळवण्यासाठी वेळ कमी लागतो शिवाय तुमची मेहनत ही वाचते. Job शोधण्यासाठी योग्य मार्गाचा वापर केल्यास तुम्ही Job कमी कालावधीत मिळवू शकता. अनुभवी व्यवसायिक असाल किंवा नवीन पदवीधर असाल तर या टिप्स तुम्हाला Job शोधण्यात आणि योग्य संधी मिळवून देण्यात मदत करतील. Job शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स काय आहेत ते आपण पाहू.
योग्य शिक्षण आणि कौशल्याची गरज
मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे म्हटले तर तुम्हाला आजच्या तंत्रज्ञानाशी जोडून घेणे अत्यावश्यक आहे. तुम्ही कोणते शिक्षण घेताय किंवा कोणत्या कौशल्यात तुम्ही पारंगत आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून असते. ज्या गोष्टीला भविष्यात स्कोप आहे अश्या गोष्टीवर तुम्ही फोकस करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस शिक्षणाच्या पुढील स्टेप वर चुकीची ब्रांच किंवा पदवी निवडल्याने मनस्ताप होतो. त्यामुळे ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे अशाच गोष्टीची करियर बनवताना शिक्षण आणि कौशल्याची योग्य निवड केलेली कधीही उत्तम राहते. भविष्यात ज्या गोष्टीत करियर करण्याच्या चांगल्या संधी आहेत, या बाबीचा विचार होणे आवश्यक आहे.
Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती
नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टीची पुरतात
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Job मिळवण्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचा बायोडाटा तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या पोर्टलवर एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. तसेच ओरिजनल कागदपत्रांचा बंच तुमच्याकडे असावा.
फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करा
नोकरी शोधण्याचे अनेक मार्ग आहेत. Online jobs मिळवून देणारे अनेक केंद्र आणि संस्था आहेत. तुम्ही एखाद्या Online सेवा देणार्या केंद्रा मार्फत Job मिळवून देण्याच्या सेवेचा म्हणजेच फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकता. तुमचा बायोडाटा Online केंद्राकडे उपलब्ध करून दिल्यास ते तुम्हाला हवा असणारा Job शोधून देतात. त्यासाठी त्यांचे काही चार्जेस असतात, ते तुम्हाला भरावे लागतात.
प्रभावी नेटवर्किंगशी जोडून रहा
नेटवर्किंग हे तुमचे करियर घडविण्यात महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या स्वप्नातील Job मिळवायचा असेल तर तुम्हाला नेटवर्किंगशी जोडले जाणे महत्वाचे आहे. Job संबंधीच्या Online ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सोशल मीडिया मार्फत तुम्हाला निघणाऱ्या नोकर्या आणि नवीन संधीची माहिती मिळते, लिंक्डइन, व्हाट्सअप, फेसबुक, या सारख्या मध्येमातून तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा योग्य वापर
आजच्या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे केंद्र बनले आहे. आज बऱ्याच गोष्टी आपल्या पर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहचतात. जवळ पास घडणार्या गोष्टीची माहिती सोशल मीडिया लगेच आपल्याला देते. शासकीय विभाग किंवा कंपन्या मार्फत सोशल मीडिया पेज काढून त्यांच्या कडे असणार्या नोकरी संबंधी च्या जाहिराती आणि माहिती आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून देते.
लिंक्डइन वापरून नोकरी शोधा
लिंक्डइन हा एक व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती तुम्ही तुमची व्यावसायिक प्रोफाइल तयार करून अनेक Jobs देणाऱ्या कंपन्यांशी आणि संस्थांशी जोडले जाऊ शकता. तुमच्या नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेत इतर तज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकता. लिंक्डइन नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वर तुम्ही कायम Job शोधण्याच्या प्रक्रियेत सक्रिय राहू शकता.
Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट
व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊन नोकरी शोधा
व्हाट्सअप हे नेहमी वापरले जाणारे नेटवर्किंग साधन आहे. अनेक Job मिळवून देणाऱ्या संस्था व्हाट्सअप ग्रुप चा वापर करतात. तसेच Job साठी Online अर्ज करणारे सर्व्हिसेस सेंटर किंवा CSC सेंटर व्हाट्सअप ग्रुप द्वारे तुम्हाला निघालेल्या जागेची माहिती देतात.
फेसबुक ग्रुपद्वारे नोकरी विषयीची माहिती मिळवा
फेसबुक च्या मध्येमातून अनेक कंपन्या तसेच शासकीय विभाग त्यांच्याकडे असणाऱ्या नोकरी विषयी ची माहिती फेसबुक पेज वर उपलब्ध करून देतात. तसेच काही संस्था आणि सोशल वर्कर या पेजवर निघणाऱ्या नोकऱ्या विषयीची माहिती आपल्या पेज वर देतात.
Online शासकिय पोर्टलद्वारे माझी नोकरी शोधण्याचा मार्ग
शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी संबंधीचे अनेक पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमची नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. या पोर्टल वरती तुम्हाला शासनाच्या विविध विभागात निघणाऱ्या नोकर भरतीची माहिती दिली जाते तसेच Online अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तुमच्या शिक्षणाच्या पात्रते प्रमाणे तुम्ही या पोर्टल वरती अर्ज करून नोकरी मिळवू शकता. तसेच काही खासगी वेबसाईटवर सुद्धा नोकरी विषयीच्या जाहिराती आणि माहिती उपलब्ध करून दिल्या जातात.
महाराष्ट्र शासन महास्वयंम पोर्टल
शासनाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महास्वयंम पोर्टल सुरु केलेले आहे. या पोर्टल वरती तुम्ही तुमच्या झालेल्या शिक्षणाच्या अनुषंगाने तुमची नोंदणी करू शकता. या पोर्टल वर नोंदणी केल्या नंतर शासनाकडून तुम्हाला उपलब्ध असलेला जॉब तुमच्या पात्रते नुसार दिला जातो. तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मॅसेज द्वारा किंवा ई मेल द्वारे कळविले जाते. महास्वयंम पोर्टल वर तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागते, तुमचा ID आणि PASSWORD बनविल्या नंतर तुम्ही इथे Job साठी नोंदणी करू शकता. महाराष्ट्र शासन याच पोर्टल वरून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना राबवित आहे.
Employment Entrepreneurship and Innovation
महाराष्ट्र शासन महास्वयंम पोर्टल अंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या कडे असलेल्या शिक्षणाचे अथवा डिग्री चे Employment या पोर्टल अंतर्गत करून देत आहे. त्याच बरोबर नवीन उपक्रम किंवा उद्योग व्यवसायासाठी नवीन संधी आणि साधन उपलब्ध करून देत आहे.
महाजॉब्स आद्योगिक कामगार संस्था
महाराष्ट्र शासनाने राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी सदरील महाजॉब्स पोर्टल सुरु केलेले आहे. या पोर्टल वर जाऊन तुम्ही तुमच्या तांत्रिक ट्रेड किंवा ब्रांच नुसार नोकरी मिळविण्यासाठी निघणाऱ्या जागेच्या जाहिराती आणि माहिती मिळवू शकता आणि त्या प्रमाणे अर्ज करू शकता.
महाराष्ट्र लोक सेवा आयोग
महाराष्ट्र लोक सेवा आयोग मार्फत MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी शासनाने सदरील पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टल मार्फत परीक्षा आणि इतर अपडेट तुम्हाला मिळविता येतात.
संघ लोक सेवा आयोग
संघ लोक सेवा आयोग UPSC च्या उमेदवारांसाठी सदरील पोर्टल आहे. UPSC च्या नवीन अपडेट साठी हे पोर्टल उपयोगी आहे.
नोकरी शोधा पोर्टल-महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाच्या नोकरी शोधा पोर्टल वर शासनाच्या सर्व विभागात निगणाऱ्या भरती विषयीची पूर्ण माहिती दिली जाते. तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल तर हे पोर्टल तुम्हाला तुमची नोकरी मिळवून देऊ शकते. महाराष्ट्रातील सर्व विभागीय निवड प्रक्रिये ची माहिती तुम्हाला या पोर्टल वरून मिळू शकते. तसेच निवड प्रक्रियेची पूर्व तयारी करण्यासाठी या पोर्टलची मदत तुम्हाला होते.
Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज
वेब साईट वरून नोकरी शोधा
महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल बरोबरच काही खाजगी संस्था किंवा खाजगी blogger हे आपल्या वेबसाईट वरून शासनाच्या आणि इतर निगणाऱ्या जागांची माहिती देतात. खाजगी वेबसाईटवर कंपन्या किंवा इतर क्षेत्रातील सर्व निगणाऱ्या जागा विषयी माहिती दिली जाते. नोकरी संबंधीच्या जाहिराती ते आपल्या वेबसाईटवर टाकतात. तसेच अर्ज करण्याची तारीख आणि कुठे करायचा या बद्दल पण माहिती देतात. या वेबसाईट चा फायदा तुम्हाला Job शोधण्यात होतो.
- MahaBharati
- NMK
- Majhi Naukri
या वेबसाईट वरून तुम्ही Job शोधू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या नोकरीसाठी तुम्हाला वरील पोर्टल आणि वेबसाईट तसेच सोशल मीडिया इत्यादी गेष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
सारांश
नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best Tips for Job या लेखात आपण नोकरी कशी शोधायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली. आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्या नंतर साहजिकच आपल्याला आपल्या पात्रतेनुसार Job मिळावा असा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. तुम्हाला हवा असलेला Job शोधण्यात आम्ही दिलेल्या टिप्स ची मदत तुम्हाला नक्कीच होईल. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांना त्यांची नोकरी शोधण्यात मदत करा. अशाच नवीन महतीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
हे ही वाचा :-
- उद्योगिनी योजना: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 30% अनुदानावर बिनव्याजी कर्ज
- सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा व्यवसाय उभा करण्याची सुवर्ण संधी /Mukhyamantri Rojgar Yojna Maharashtra
- वाहनाच्या नंबर प्लेट वरून शोधा वाहन मालकाचे नाव आणि वाहनाचा संपूर्ण तपशील
- Phonepe Bike Insurance-अगदी काहीवेळात फोनपेवर काढा तुमच्या बाईकचा विमा
- पॅन कार्ड दुरुस्ती- ऑनलाइन दुरुस्त करा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर बाबी
- वाहन चालविण्याचे ड्रायविंग लायसेन्स रिनिव कसे करावे ? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी आमचे ग्रुप जॉईन करा.
Pingback: Www Mahabocw In Renewal Status: बांधकाम कामगार रिन्यूअल स्थिती अशी तपासा