राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने नाचवीन पांदन रस्ते धोरण राबविण्याचे ठरविले आहे. पूर्वीच्या प्रशासकीय अडचणी दूर करून पांदन रस्त्याचे काम अधिक जलद आणि उत्कृष्ठ कसे करता येयील, यासाठी शासन राज्यात नवीन नियमावली पांदन रस्त्यासाठी राबविणार आहे. पूर्वीच्या पांदन रस्ते धोरणात येणाऱ्या प्रशाकीय अडचणी दूर करून रस्त्याच्या कामाला गती देण्याचे शासनाच्या विचारधीन आहे. कामाच्या ठिकाणी मजूर न मिळणे, कामाच्या बिल निघण्यास विलंब होणे या सगळ्या गोष्टीमध्ये शासन सुधारणा करणार आहे.
पांदन रस्ते
शेतकऱ्यांना शेतात पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी शेतीची सर्व कामे वेळेवर आणि अचूकरीत्या पार पाडण्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते. तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठीही बारमाही शेतरस्त्यांची अत्यंत गरज आहे. शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरण वापरली जाणारी विविध यंत्रसामग्री जसे की, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, थ्रेशर आदी यंत्रे शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा वापर सुकर होण्यासाठी मजबूत आणि योग्य रस्ते असणे आवश्यक आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत हे शेतरस्ते अनेकदा ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेत समाविष्ट नसतात. परिणामी, हे रस्ते खराब अवस्थेत असून, पावसाळ्यात चिखलाचे स्वरूप घेतात आणि उन्हाळ्यात धुळीने भरतात.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अडथळा निर्माण होऊ नये, आणि त्यांचा माल सुस्थितीत मार्केट पर्यंत पोहचावा यासाठी शासन नवीन पांदन रस्ते मजबुती करणावर भर देणार आहे.
राज्य शासनाने यासाठी विशेष योजना तयार करून, शेत/पाणंद रस्ते प्रभावीपणे सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतरस्त्यांचे नकाशे, दुरुस्ती, व दर्जेदार बांधकाम, तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागाने रस्ते व्यवस्थापन कण्याचे शासनाने योजिले आहे.
पांदन रस्ते नवीन शासन निर्णय
शासनाने पूर्वीच्या पांदन रस्त्याच्या नियमांना बदलून नवीन पांदन रस्ते धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठीत करण्याची ठरविले आहे. हि समिती मागील पांदण रस्त्याचा अभ्यास करून त्यातील अडचणी सोडविण्यासाठी नवीन नियमांची शिफारस करेल. आणि समितीच्या अहवालानुसार शासन पांदण रस्ते नियम आणि धोरणात सुधारणा करेल.
समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल :
मातोश्री पांदण रस्ते योजनेचा अभ्यास
सध्या अस्तित्वात असलेल्या मातोश्री पांदण रस्ते योजनेचा सखोल अभ्यास करून त्यामधील त्रुटी ओळखून त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचवाव्यात.नागपूर, अमरावती व लातूर जिल्ह्यांतील योजनांचा अभ्यास
या विभागांमध्ये राबविण्यात आलेल्या शेतरस्ता योजनांचा अभ्यास करून त्या योजनांतील यशस्वी बाबींचा अन्य ठिकाणी अवलंब कसा करता येईल हे पाहावे.- माबंदी आयुक्त यांच्या समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही करावी. स्वतंत्र लेखाशिर्ष (Budget Head) तयार करण्याचा विचार
शेत / पाणंद रस्ते योजना राबविण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष ठेवावा किंवा त्याबाबत शक्य तितक्या पर्यायांचा विचार करावा.Convergence द्वारे योजना पूर्ण करण्याची शक्यता
सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांद्वारे Convergence पद्धतीने ही योजना कशी पूर्ण करता येईल याचा अभ्यास करावा. त्यासाठी कोणत्या लेखाशिर्षातून निधी उपलब्ध होऊ शकतो याचे संभाव्य प्रमाण निश्चित करावे.पाच वर्षांचा कालबद्ध आराखडा तयार करणे
पुढील पाच वर्षांत राज्यातील सव्वन शेत / पाणंद रस्ते मजबुत करण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवाव्यात व त्या अनुषंगाने कालबद्ध कृती आराखडा तयार करावा.- योजना कोणत्या विभागामार्फत राबवायची याबाबत निर्णय
सदर योजना कोणत्या विभागामार्फत (उदा. महसूल, ग्रामविकास, कृषी इ.) राबवायची याबाबत स्पष्ट आणि ठोस निर्णय घ्यावा.
समितीबाबत विशेष बाबी :
समितीचे अध्यक्ष मा. मंत्री (महसूल) राहतील.
त्यांना विशिष्ट सल्लागार किंवा विषयतज्ञ व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत.
वरील कार्यकक्षेशी संबंधित अतिरिक्त मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर मार्गदर्शन करण्याचे स्वातंत्र्य समितीला राहील.
अहवाल सादरीकरणाची वेळमर्यादा :
वरील सर्व बाबींचा पुरेपूर अभ्यास करून समितीला अहवाल सादर करायचा आहे. समितीला १ महिन्यामध्ये सदरील अहवाल शासनाला सादर करायचा आहे.
सदरील शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील शासनाच्या वेबसाईटला भेट द्या –https://gr.maharashtra.gov.in
सारांश
पांदन रस्ते: आता पांदन रस्त्यासंबंधीच्या अडचणी होणार दूर, रस्त्यांचे होणार मजबुतीकरण या लेखात आपण पांदण रस्ते विषयी शासनाने काढलेल्या नवीन शासन निर्णयाविषयी माहिती पहिली. नवीन शासन निर्णयानुसार आता पांदन रस्त्याच्या कामाला गती मिळणार असून येणाऱ्या प्रशाकीय अडचणी कमी होणार आहेत. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.
हे वाचा :-