पावर टिलर सब्सिडी: पावर टिलर खरेदी करा 50% सब्सिडीवर :- शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवीत असते, त्यामध्ये सिंचनाच्या योजना, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर औजारे योजना त्याच बरोबर Mahadbt च्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण मधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना पावर टिलर सारखी स्वयंचलित औजारे दिली जात आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परवडणारे नसते, अशा वेळेस त्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी शासनाच्या Mahadbt पोर्टल च्या माध्येमातून पावर टिलर सारखी स्वयं चलित यंत्रे पुरवली जातात. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला अगदी घरच्या घरी शेती करता यावी, शेती मशागतीसाठी त्याला बाहेर पैसे मोजण्याची वेळ येवू नये हा उद्देश शासनाचा आहे. आपण आजच्या लेखात पावर टिलर साठी अर्ज कसा करायचा आणि पावर टिलर साठी शासन किती सब्सिडी देते, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
Mahadbt कृषी यांत्रिकीकरण योजना
महाराष्ट्र शासनाच्या कृषी Mahadbt या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात प्रामुख्याने कृषी यांत्रिकीकरण योजना हि आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने मधून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नात अदुनिक्तेची जोड मिळावी यासाठी आधुनिक कृषी औजारे पुरविली जातात.
- ट्रॅक्टर
- ट्रॅक्टर औजारे ( सर्व औजारे )
- बैल चलित औजारे
- स्वयं चलित औजारे:- पावर टिलर , कापणी यंत्रे, रिपर कम बाईंडर, पावर टिलर
- वैशिष्ट्यपूर्ण औजारे:- सोलर चलित प्राणी प्रतिबंधक द्वनिक उपकरण
- दालमिल
इत्यादी आणि अशा प्रकारचे औजारे कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना सब्सिडीवर दिली जातात.
✅👉🏻 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/मराठा बेरोजगार तरूणांनसाठी कर्ज योजना
पावर टिलर सब्सिडी योजना
महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt पोर्टल वरून राबविल्या जाणाऱ्या शेतकरी योजनान पैकी कृषी यांत्रिकीकरण हि एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक आधुनिक शेती अवजारे पुरवली जातात. त्यामध्ये पावर टिलर हे स्वयं चलित यंत्र शेतकऱ्यांना सब्सिडी वर दिले जाते.
पावर टिलर हे स्वयं चलित यंत्र असल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेती मशागतीच्या प्रत्येक कामाला उपयुक्त आहे. पावर टिलर प्रत्येच्या साह्याने शेतीचे प्रत्येक काम तुम्ही अगदी सुलभ व कमी खर्चात करू शकता. त्यामध्ये पेरणी असेल, पेरणी पूर्वीची शेती मशागत असेल, पिक अंतर्गत मशागत असेल किंवा पिक काढणी नंतर ची मशागत असेल अशी सर्व शेतीची कामे तुम्ही पावर टिलर च्या साह्याने करू शकतात.
✅👉🏻 Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
पावर टिलर सब्सिडी
कृषी विभागाच्या Mahadbt मधून कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत स्वयं चलित औजारे म्हणून पावर टिलर शेतकऱ्यांना दिले जाते. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून पावर टिलर आणि तत्सम औजारांना 50% सब्सिडी दिली जाते. खरेदी केलेल्या वस्तूवरील बिलातील GST वगळता, उर्वरित रकमेच्या 50% रक्कम सब्सिडी स्वरुपात लाभार्थ्याला दिली जाते.
✅👉🏻 महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
पावर टिलर सब्सिडी योजनेसाठी असा करा अर्ज
पावर टिलर सब्सिडी योजनेसाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या Mahadbt पोर्टलवर जावे लागेल. महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in Open करून तुम्ही अर्जाची प्रोसेस करू शकता, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी पोर्टलवर करावी लागेल, Applicant Name मध्ये नाव टाकून तुमचा Username आणि Password बनवावा लागेल. Username आणि Password भरून तुम्हाला ConfirmPassword हा रकाना भरून खालील रकान्यात तुम्हाला Email Id भरून तो Otp च्या साह्याने सत्यापित करावा लागेल. तसेच त्या खालील रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून तो हि Otp च्या साह्याने सत्यापित करावा लागेल. आणि शेवटच्या रकान्यात कॅप्चा भरून नोंदणी करा या बटनावर क्लिक करावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकाल.
नोंदणी पूर्ण होताच अर्ज करा म्हणून पर्याय दिसेल त्याला क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण या योजनेची निवड करून तुम्ही पुढील फॉर्म भरू शकता. पुढे यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या पर्यायाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर यंत्रणा/अंमलबजावणी निवडा या मध्ये तुम्हाला खालील बॉक्स मध्ये योग्य पर्याय निवडायचे आहे.
- मुख्य घटक :- कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य
- तपशील :- पावर टिलर
- एचपी श्रेणी निवडा :-८ बीएचपी व त्यापेक्षा जास्त
त्या नंतर खालील छोटा चेक बॉक्स टिक करून जतन करा या पर्यायाला क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुमचा पावर टिलर चा अर्ज पूर्ण होईल.
अर्ज भरल्या नंतर तुम्हाला पोर्टल वर काही फीस भरावी लागेल ती तुम्ही Online ही भरू शकता. तुमच्या अर्जाची माहिती तुम्हाला SMS द्वारे कळविली जाते. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाचे updet मिळतात. तुम्ही तयार केलेल्या Username आणि Password या द्वारे पोर्टलवर लॉगीन करून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला बघता येते.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- सातबारा आणि होल्डिंग
- बँक पासबुक
✅👉🏻 www mahabocw in renewal online: बांधकाम कामगार ऑनलाईन रिनीवल
Conclusion
पावर टिलर सब्सिडी: पावर टिलर खरेदी करा 50% सब्सिडीवर लेखामध्ये आपण शासनाची Mahadbt यांत्रिकीकरण योजनेतून पावर टिलर सब्सिडी योजना पहिली. mahadbt अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदानावर पावर टिलर हि एक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
🟢🔵🟣आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यसाठी क्लिक करा.