पिक विमा 2025: मधील खरीप हंगाम मध्ये पीकविमा कसा भरायचा हे आज आपण आजच्या blog मध्ये पाहणार आहोत. तुम्हाला विमा कशा पद्धतीने भरायचा आहे कोणते कागदपत्र लागणार आहेत, जर तुम्ही सीएससी सेंटर वरती विमा जाऊन भरत असाल तर सीएससी चालकाने विमा कसा भरायचा या बद्दल सविस्तर माहिती या blog मध्ये मिळणार आहे. व्यवस्थितपणे पहा शेतकऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या की तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे आणि काय काय माहिती द्यावी लागणार आहे.
पिक विमा 2025
शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरु केलेली आहे, या योजने अंतर्गत कमीत-कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्यांना गुंठ्यानुसार विम्याची रक्कम कशी भरायची, किती गुंठ्याला किती विम्याची रक्कम भरावी लागते हे चेक करण्यासाठी शासनाने pmfby.gov.in हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टल वरती जावून तुम्ही तुमच्या शेत्राला भरावा लागत असलेला विमा हप्ता जाणून घेवू शकता. Insurance Premium Calculator या पर्यायाला क्लिक करून तुम्हाला तुमच्या पिक निहाय क्षेत्राला किती विमा हप्ता भरावा लागतो हे माहित करून घेवू शकता.
पिक विमा कसा भरायचा
शेतकऱ्यांना पिक विमा हा CSC केंद्रावरून किंवा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल app वरून पण भारता येणार आहे. मोबाईल app च्या साह्याने विमा भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ‘क्रॉप इन्शुरन्स’ नावाचे मोबाईल app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. या अप्लिकेशन मध्ये लॉगीन करायचे आहे. मोबाईल नंबर टाकून OTP घेतल्यास शेतकऱ्याची माहिती अपोआप येवून जाईल जर माहिती नाही आली तर नव्याने शेतकऱ्याची माहिती भरायची आहे. app डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा- Crop Insurance app
CSC केंद्रावर जावून पिक विमा 2025 भरणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल सोबत नेणे आवश्यक आहे. तुमचा फार्मर आयडी सोबत असेल तर ठीक नसेल तर तुमचा मोबाईल नंबर टाकताच तुमचा फार्मर आयडी येवून जाईल. सातबारा उतारा आणि तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. पिक विमा भरत असताना प्रत्येक व्यक्तीला सेपरेट खात्याचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. कारण की पुढे तुम्हाला माहिती घेण्यासाठी भविष्यामध्ये ते उपयोगी पडते.
पिक विमा 2025 फॉर्म कसा भरायचा सविस्तर आपण आता पाहणार आहोत. pmfby.gov.in सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा पोर्टल ओपेन होईल. इथे ऑप्शन दिलेले आहेत जे तुम्हाला विमा आणि इतर माहिती उपलब्ध करून देतात. विमा भरण्यासाठी वरील बाजूस असणाऱ्या ENROLLMENT PARTNERS या पर्त्यायायावर जाऊन CSC लॉगिन करून घ्यायचे आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर साइन इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे सिलेक्ट करायचा आहे. आयएफसी कोड टाकून घ्यायचा आहे सिलेक्ट करायचे आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे, तुमचा अकाउंट नंबर न चुकता टाकायचा आहे.
Farmer Details मध्ये शेतकऱ्याची माहिती भरायची आहे. या मध्ये पहिल्या रकान्यात पासबुक प्रमाणे नाव टाकायचे आहे. तसेच दुसऱ्या रकान्यात आधार प्रमाणे नाव टाकायचे आहे. शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करताच शेतकऱ्याची फार्मर आयडी अपोआप पुढील रकान्यात येयील. त्या खाली रेलेटीव आणि आपला पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे.
नोमिनी टाकायचा असेल तर तो खालील बॉक्स मध्ये टाकता येतो. अन्यथा नोमिनी नंतर तक्ता येत असल्यामुळे तो पर्याय सोडता येतो.
मोबाईल नंबर ताक्ळून आलेला otp टाकून मोबाईल नंबर सिरीफाय करायचा आहे. शेतकऱ्याची वर्गवारी आणि इतर माहिती खाली भरायची आहे.
तिसऱ्या पायरी मध्ये शेतकऱ्याला ज्या पिकाचा विमा भरायचा आहे, ते पिक जर मिश्र पिक असेल तर तसे निवडायचे आहे. विमा भरतांना शेत्र किती आहे हे भरायचे आहे. क्षेत्रानुसार लागणारी रक्कम इत्यादी माहिती भरून शेतकर्याचे पासबुक, सातबारा आणि पीकपेरा इत्यादी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
वरील पद्धतीने CSC धारकांना शेतकऱ्याचा पिक विमा 2025 भारता येतो. विमा भरतांना काही चुका आपल्या कडून होऊ नाही याची काळजी घ्यावी लागते.
पिक विमा भरतांना आवश्यक कागदपत्रे
- शेतकर्याचे आधार कार्ड.
- शेतकर्याचे पासबुक.
- फार्मर आयडी.
- सातबारा उतारा.
सारांश
पिक विमा 2025: कसा भरायचा आणि कागदपत्रे कोणती अपलोड करायची या बद्दल सविस्तर माहिती या लेखात आपण पिक विमा 2025 खरीप हंगामासाठी मोबाईल वरून तसेच CSC केंद्रावरून कसा भरायचा या बद्दल माहिती पहिली. 31 जूलै ही शेवटची तारीख शासनाने होती पण बरेच शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले असल्याने आता विमा भरण्याची तारीख वाढवून 14 आगस्ट करण्यात आलेली आहे, त्यामुळे शासन ही तारीख वाढवून देवू शकते. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा