बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय : तपासणी ते उपचार आरोग्य योजना – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन योजना कामगार कल्याणकारी मंडळाकडून चालविल्या जातात. शासनाच्या नवीन निर्णया नुसार कधी कधी या योजनान मध्ये बदल हि केले जातात. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक धोरणानुसार योजनांमध्ये बदल किंवा सुधारणा केल्या जातात. फार पूर्वी पासून चालवली जाणारी योजना आजच्या काळात निरूपयोगी असेल तर अशा योजनांमध्ये बदल केले जातात. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी शासनाच्या नवीन निर्णयाकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. शासनाच्या कोणत्या GR मध्ये काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाल्या पासून शासनाकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
आज आपण शासनाने चालू काळामढील शासन निर्णय पाहणार आहोत, आणि त्या शासन निर्णयात ( GR ) बांधकाम कामगारांच्या योजनेविषयी काय बदल किंवा Updat आहे ते पाहणार आहोत.
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय : तपासणी ते उपचार आरोग्य योजना
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या बेठकीत बांधकाम कामगारासाठी त्यांच्या आरोग्य ठणठनीत राहावे म्हणून “तपासणी ते उपचार आरोग्य योजना” सुरु केली आहे. पूर्वी बांधकाम कामगार मंडळाच्या लाभार्थ्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आजारावरील उपचार खर्च भरपाई दिली जात होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत फक्त रु. 5 लाखा पर्यंत उपचार खर्च दिला जात होता. त्या वरील खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागत असे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
तपासणी ते उपचार आरोग्य योजना
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय नुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या लाभार्थ्याला अथवा पात्र कुटुंब सदस्याला सदरील योजनेचा लाभ घेता येणार आहे. पूर्वी कामगार मंडळाच्या आरोग्य विषयीच्या योजनेचा लाभ घेतांना उपचार खर्चाच्या मर्यादा होत्या पण आता मात्र रु.5 लाख वरील उपचारासाठी हि शासनाकडून मदत मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण उपचारावरील खर्च जर रु. 5 लाखाच्या वर जात असेल तर त्यावेळेस लाभार्थ्याला तपासणी ते उपचार आरोग्य योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच आजारावरील उपचारासाठी नवीन रुग्णाला सुरुवातीपासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
तपासणी ते उपचार आरोग्य योजनेचे स्वरूप व निकष
- तपासणी ते उपचार आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत लाभार्थी असावा.
- महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेत असलेल्या नोंदणीकृत कामगार अथवा पात्र कटुंब सदस्य यांना या योजनेचा लाभ तेंव्हाच घेता येयील जेंव्हा त्यांच्या उपचारावरील खर्च हा रु. 5 लाख पेक्षा जास्त असेल.
- बांधकाम कामगाराच्या स्वतः च्या उपचारासाठी किंवा कुटुंबाच्या सदस्याच्या उपचारासाठी सुरुवातीपासून नवीन लाभार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात.
- बांधकाम कामगाराला स्वतः च्या किंवा कुटुंब सदस्याच्या उपचारासाठी महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना किंवा तपासणी ते उपचार आरोग्य योजना या दोन्ही पेकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या शासन निर्णयानुसार तपासणी ते उपचार आरोग्य योजना हि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत लाभार्थ्यानसाठी चालू करण्यात आली आहे. या योजनेतून कामगाराला महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेतून दिला जाणाऱ्या उपचार खर्च रु. 5 लाख पेक्षा जास्त होणारा खर्च हा लाभार्थ्याला खिशातून भरण्याची वेळ येवू नाही, या साठी सदरील योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून रु. 5 लाख ते 5 लाखावरील वरील उपचार खर्च शासन तपासणी ते उपचार आरोग्य योजना या योजनेतून उपलब्ध करून देते. नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Conclusion
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय : तपासणी ते उपचार आरोग्य योजना हि नवीन शासन निर्णया नुसार अमलात येणार आहे या योजने विषयी आपण पूर्ण माहिती पहिली आहे. आम्ही आमच्या blog च्या माध्येमातून अशाच शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आपल्या पर्यंत पोहचवीत असतो, अशाच नवीन माहितीसाठी आणि आमच्या सोबत जोडल्या जाण्यासाठी आम्हाला फॉलो करा, आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. गर्जुवंता पर्यंत माहिती पोहोचल्यास निश्चितच हा लेख लिहिण्या माघचा उद्देश पूर्ण होईल. आमच्या Telegram ग्रुप मध्ये सामील व्हा.