मतदार यादीत नाव शोधणे: 2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाईन तपासा

मतदार यादीत नाव शोधणे:- भारतात लोकशाही राज्य आहे, वयाची १ ८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधाना द्वारे मिळालेला आहे. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला निवडणूक विभागाकडे आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. भारतात वयाची १ ८ वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक आपल्या नावाची नोंदणी निवडणूक विभागाकडे करून निवडणूक प्रक्रिये मध्ये सहभागी होऊ शकतो. तुम्ही नवीन नोंदणी केली असेल किंवा पूर्वी पासून असेल तरी तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे किंवा नाही हे तुम्ही शासनाच्या मतदाता पोर्टल वर जाऊन चेक करू शकता, ते कशे चेक करायचे ते आपण आज पाहणार आहोत.मतदार यादीत नाव शोधणे: 2024

मतदार यादी 

आपल्या देशात निवड प्रक्रिये द्वारे सरकार निवडले जाते, भारतातील १ ८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाद्वारे आपले सरकार निवडण्याचा अधिकार आहे. निवड प्रक्रियेत भाग घेण्यासाठी १ ८ वर्ष पूर्ण जाणाऱ्या भारतीय नागरिकाला आपल्या नावाची नोंदणी निवडणूक विभागाकडे करावी लागते.

मतदार यादी हि निवडणूक विभागाकडून बनविली जाते. या मतदार यादी मध्ये तुमच्या नावाची नोंदणी झाल्या नंतर तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमचे विधानसभा क्षेत्र त्याच बरोबर तुम्हाला निवडणूक विभागाने दिलेला EPIC नंबर आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी गोष्टी असतात.

✅👉🏻 E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड

मतदार यादीत नाव असण्याचे महत्व

मतदार यादीत नाव नसेल तर तुम्ही कोणत्याच भारतीय निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. मतदार यादीत नाव नसेल तर तुम्हाला निवडणूक प्रक्रियेत मतदान करता येत नाही. तुम्ही मतदार यादीत नाव नोंदणी केल्या नंतर निवडणूक विभागाकडून तुम्हाला एक ओळख प्रमाणपत्र दिले जाते. या ओळखपत्रावर तुमचा पूर्ण पत्ता, तुमचा फोटो, EPIC नंबर इत्यादी बाबींची नोंदणी असते.

  • मतदान ओळखपत्र हे तुमच्या पत्त्याचा पुरावा ग्राह्य धरल्या जाणारे एक महत्वाचे दस्तावेज आहे.
  • शासकिय कामात आणि योजनांमध्ये मतदान ओळखपत्राला तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाते.
  • मतदान ओळखपत्रावरून तुम्ही महाराष्ट्राचे किती दिवसापासूनचे रहिवाशी आहेत, हे ठरवले जाते.
  • लाडकी बहीण योजने मध्ये १ ५ वर्षाहून अधिकचा अधिवास म्हणून मतदान ओळखपत्राला एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या गेले.
  • भारतीय निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याचा अधिकार मतदार यादीत नाव असल्याने प्राप्त होतो.

2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाइन कुठे तपासायचे

शासनाने नागरिकांच्या शेवेसाठी आता सर्वच शेवा या ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या विभागाकडे खेटे मारण्याची आवश्यकता भासत नाही. तुम्ही घरबसल्या मतदार यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या शासनाच्या मतदाता सेवा पोर्टल या e – portal वरती जावे लागेल.

✅👉🏻 Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून कमवा एक लाख रुपये महिना

मतदाता सेवा पोर्टल e – portal 👉🏻👉🏻👉🏻  voters.eci.gov.in

वरील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव मतदार यादी मध्ये आहे किंवा नाही हे शोधू शकता. मतदार यादी मध्ये नाव शोधण्यासाठी तुमच्याकडे मतदान ओळखपत्र EPIC नंबर किंवा रजिस्टर मोबाइल नंबर किंवा तुमच्या नावाचे पूर्ण डीटीएल असणे आवश्यक आहे. या तीन पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही तपासू शकता.

मतदार ओळखपत्र किंवा EPIC नंबर वरून मतदार यादीत नाव शोधणे

मतदार यादीत तुमचे नाव कुठे आणि कोणत्या मतदार संघाच्या मतदार यादीत समाविष्ट आहे, हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे मतदार कार्ड उपलब्ध असल्यास त्याच्या साह्याने चेक करू शकता, किंवा मतदार ओळख पत्रावर असलेल्या EPIC नंबर च्या साह्याने चेक करू शकता.

  • मतदार ओळखपत्र किंवा EPIC नंबर च्या साह्याने मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या मतदाता सेवा पोर्टल वरती जावे लागेल.
  • पोर्टेलावरती आल्या नंतर उजव्या बाजूने दिसणार्‍या Services मधील Search in Electoral Roll या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • Search in Electoral Roll या वरती क्लिक केल्या नंतर ओपन होणार्‍या पेज वर Search by EPIC हा पहिला पर्याय निवडावा लागेल.
  • पहिल्या रकान्यात तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल Select Language.
  • त्या खालील रकान्यात तुम्हाला तुमच्या मतदार ओळख पत्रावरील EPIC Number टाकावा लागेल.
  • त्या समोरील रकान्यात तुम्हाला तुमचे{ State } राज्य निवडावे लागेल.
  • पेज सर्वात खाली दिलेला कॅप्चा पुढील बॉक्स मध्ये हारून SEARCH या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • SEARCH क्लिक करताच तुमच्या समोर तुमचे नाव, तुमचे वय, तुमच्या वडीलांचे नाव, तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचे विधानसभा मतदार संघ, तुमचे गाव, तुमचे मतदान बूथ इत्यादी माहिती तुमच्या समोर ओपन होईल.

आशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदार ओळखपत्र किंवा EPIC नंबर च्या साह्याने मतदार यादीत नाव चेक करू शकता.

वैयक्तिक तपशीलावरून मतदार यादीत नाव शोधणे

निवडणूक विभागाच्या मतदार यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र किंवा EPIC नंबर नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या वैयक्तिक तपशीलावरून मतदार यादीत नाव शोधू शकता. या साठी तुम्हाला मतदाता सेवा पोर्टल वरती यावे लागेल.मतदार यादीत नाव शोधणे 2024

  • पोर्टेलावरती आल्या नंतर उजव्या बाजूने दिसणार्‍या Services मधील Search in Electoral Roll या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • Search in Electoral Roll या वरती क्लिक केल्या नंतर ओपन होणार्‍या पेज वर  Search by Details हा पहिला पर्याय निवडावा लागेल.
  • सर्वात वरील रकान्यात तुम्हाला राज्य आणि दुसऱ्या रकान्यात तुमची भाषा निवडायची आहे.
  •  PERSONAL DETAILS रकान्यात पहिले नाव, मध्यम नाव (असल्यास)/First Name ,Middle Name(if any) टाकायचे आहे.
  • पुढील रकान्यात वडील किंवा पतीचे नाव टाकायचे आहे, आणि त्या पुढे आडनाव टाकायचे आहे.
  • Select Birth Details या बॉक्स मध्ये तुम्हाला Date of Birth तुमची जन्म तारीख आणि वय/Age टाकायचे आहे.
  • Select Gender मध्ये तुम्हाला तुमचे लिंग निवडायचे आहे.
  • LOCATION DETAILS मध्ये जिल्हा/District आणि विधानसभा मतदारसंघ/Assembly Constituency निवडायचा आहे.
  • सगळ्यात शेवटी दिलेला कॅप्चा टाकून तुम्हाला SEARCH या बटणावर टच आहे.
  • SEARCH क्लिक करताच तुमच्या समोर तुमचे नाव, तुमचे वय, तुमच्या वडीलांचे नाव, तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचे विधानसभा मतदार संघ, तुमचे गाव, तुमचे मतदान बूथ इत्यादी माहिती तुमच्या समोर ओपन होईल..

वरील पद्धतीने तुम्ही वैयक्तिक तपशीलाच्या आधारे तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता.

✅👉🏻 Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट

मोबाइल नंबर वरून मतदार यादीत नाव शोधणे

निवडणूक विभागाच्या २ ० २ ४ च्या मतदार यादी मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वरून जाणून घेऊ शकता. तुमच्याकडे ओळखपत्र किंवा EPIC नंबर नसेल अशा वेळेस मतदार यादी मध्ये नाव टाकताना दिलेल्या मोबाइल नंबर द्वारे तुम्ही मतदार यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे शोधू शकता.

  • पोर्टेलावरती आल्या नंतर उजव्या बाजूने दिसणार्‍या Services मधील Search in Electoral Roll या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
  • Search in Electoral Roll या वरती क्लिक केल्या नंतर ओपन होणार्‍या पेज वर Search by Mobile हा पहिला पर्याय निवडावा लागेल.
  • वरील पहिल्या दोन बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे राज्य आणि तुमची भाषा निवडावी लागेल.
  • MOBILE DETAIL मध्ये तुम्हाला तुमचा Mobile Number टाकायचा आहे.
  • Enter Captcha मध्ये तुम्हाला दिलेला कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लिक करायचे आहे.
  • SEND OTP वर टच करताच तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर OTP येईल ती तुम्हाला खालील बॉक्स मध्ये भरून SEARCH वर क्लिक करायचे आहे.
  • SEARCH क्लिक करताच तुमच्या समोर तुमचे नाव, तुमचे वय, तुमच्या वडीलांचे नाव, तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचे विधानसभा मतदार संघ, तुमचे गाव, तुमचे मतदान बूथ इत्यादी माहिती तुमच्या समोर ओपन होईल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाइल क्रमांका द्वारे मतदार यादीत नाव शोधु शकता.

मतदार यादीत नाव नसल्यास काय करावे ?

भारतीय निवडणूक विभागाच्या मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्हाला मतदार यादी मध्ये नाव टाकावे लागेल. निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्यासाठी आणि शासनाच्या इतर शासकिय कामा मध्ये पत्त्याच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मतदार यादी मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी तुम्हाला शासनाच्या मतदाता सेवा पोर्टल या वेब पोर्टल वर जाऊन ६  नंबरचा फोरम भरावा लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला वेब पोर्टल वर जाऊन Forms मधील ६  नंबरचे फॉर्म भरावे लागेल.
  • Forms नंबर ६ वरती जाऊन तुम्हाला अगोदर तुमची ID आणि PASSWORD तयार करून LOGIN करावे लागेल.
  • LOGIN केल्या नंतर तुम्हाला ओपन होणार्‍या फॉर्म वर तुम्हाला तुमची पूर्ण वैयक्तिक माहिती भरायची आहे.
  • माहिती भरल्या नंतर तुमच्या मोबाइल नंबर वर otp घेऊन तो टाकायचा आहे, आणि फॉर्म submit करायचा आहे.

मतदार यादीत नवीन नाव नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

मतदार यादीत नवीन नाव नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • आधार कार्ड.
  • वयाचा पुराव्यासाठी शैक्षणिक दाखला ( T. C. ).
  • तुमचे पास पोर्ट साईज फोटो.
  • तुमचा मोबाइल नंबर.

इत्यादी कागद पात्रांची आवश्यकता मतदार यादीत नवीन नाव टाकण्यासाठी लागतात.

E-EPIC DOWNLOAD/मतदार कार्ड डाउनलोड कसे करायचे

मतदार यादीत नाव नोंदणी केल्या नंतर तुम्ही वेब पोर्टल वर जाऊन तुमचे मतदार कार्ड DOWNLOAD करू शकता. कार्ड DOWNLOAD करण्यासाठी तुम्हाला मतदाता सेवा पोर्टल वर जावे लागेल.

  • Services मधील E-EPIC DOWNLOAD वरती जावे लागेल.
  • इथे तुम्हाला तुमची ID आणि PASSWORD तयार करून LOGIN करावे लागेल.
  • LOGIN करुणालेला OTP भरावा लागेल.
  • OTP टाकल्या नंतर ओपन होणार्‍या  Download electronic copy of EPIC Card पेज वर EPIC no किंवा Form Reference no या मधून एक पर्याय निवडून टिक मार्क करायचे आहे.
  • खालील रकान्यात Select State राज्य निवडायचे आहे.
  • SEARCH बटनावर क्लिक करायचे आहे.
  • पुढील पेज वर
    Epic No Name Relative Name State AC Mobile No. Email Id
  • या खाली SEND OTP या बटनावर क्लिक करताच तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर OTP येईल तो पुढील रकान्यात भरून VERIFY वर क्लिक करायचे आहे.
  • DOWNLOAD E-EPIC वर क्लिक करताच तुमचे मतदार कार्ड DOWNLOAD होईल. याची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मतदार ओळख पत्र DOWNLOAD करू शकता.

Conclusion

मतदार यादीत नाव शोधणे: 2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाईन तपासा या लेख मध्ये आपण मतदार यादीत नाव शोधणे तसेच नवीन नाव नोंदणी आणि ओळखपत्र DOWNLOAD कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली.  या निवडणूक विभागाच्या पोर्टल वरून तुम्ही तुमच्या इलेक्शन कार्ड आणि मतदान यादी विषयीचे सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया  ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top