मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना: महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजने नुसार ज्या मुलांचे दोन पैकी एक किंवा दोन्ही पालक लहानपणीच वारले आहे. अशा मुलांना शासन प्रतीमः रुपये 4,000 रुपये आर्थिक मदत करणार आहे. शासन नेहमीच निराधार आणि पालकाचे छत्र हरवलेल्या मुलांना वेगवेगळ्या योजनेतून अर्हिक मदत करत असते, अशाच स्वरुपाची एक नवीन योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली आहे. या मुख्यमंत्री बाल आरोग्य योजनेतून पालक नसलेल्या मुलांना महिन्याला एक ठराविक रक्कम मदत म्हणून मिळणार आहे.
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना
महाराष्ट्र शासनाने समाजातील दुर्बल घटकांसाठी इतर योजना बरोबरच ‘मुख्यमंत्री बाल आरोग्य योजना’ नावाची योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील पालकत्व हरवलेल्या मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांचे पुढील आयुष्य सुखकर करता यावे, यासाठी प्रतिमहिना 4000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून राज्यातील आई-वडील नसलेल्या किंवा दोन्ही पैकी एक पालक नसलेल्या मुलांना सदरील लाभ घेता येणार आहे.
पात्रता व निकष
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने अंतर्गत 1 मार्च 2020 नंतर ज्यांची दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकापैकी एकाचा मृत्यू झाला असेल अशा वय वर्ष 18 च्या आतील मुलांना शासन प्रतिमहिना 4000 रुपये आर्थिक मदत देणार आहे. एका कुटुंबातील दोन मुलांना सदरील योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदरील योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.
कागदपत्रे
- मुल आणि आई ( किंवा हयात असलेले पालक ) यांचे संयुक्त खाते.
- रेशन कार्ड.
- आधार कार्ड आई आणि मुल.
- शाळेचे ओळखपत्र.
- वडिलांचे किंवा आईचे मृत्यू प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा पुरावा.
अर्ज कुठे करायचा
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने अंतर्गत वरील कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज तालुक्याच्या तहसील कार्यालयात जमा करायचा आहे.
सारांश
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना काय आहे, यांनी या योजनेची पात्रता निकष आणि कागदपत्रे कोणती आहेत. या विषयी सविस्तर माहिती आपण वरील BLOG पहिली. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना सदरील योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण पहिली, माहिती आवडली असल्यास गरजू लोकांना अवश्य शेअर करा.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर टच करा.
हे हि वाचा
- PHH Ration Card: PHH रेशन कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि फायदे
- रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी: रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र
- रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र : Ration card all online facility
- Bandhkam Kamgar Pension Yojana: नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन
- Mahabocw Payment receipt: Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची