महाराष्ट्र शासनाने राज्यतील बेरोजगार तरुणांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हीच योजना आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणून ओळखली जात आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा रु. ८,००० हजार ते १०,००० हजार मदत केली जाणार आहे. या योजने अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कुठे आणि कसा करायचा, यासाठी पात्रता आणि निकष .काय आहेत या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगाचे प्रशिक्षण देऊन, रोजगारक्षम बनविणे हा उद्देश शासनाचा सदरील योजनेतून आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण नंतर सुरु करण्यात आलेली हि लाडका भाऊ योजना आहे. राज्य सरकारने राज्यातील महिलानासाठी दार महा १५०० रुपये देण्याचे जाहीर केल्या नंतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी हि काहीतरी करावे या हेतूने सदरील मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरु करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेलाच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना संबोधण्यात येत आहे.
✅👉🏻 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: शेवटच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली हि योजना कशी आहे
योजनेचे निकष
- बारावी, आय. टि. आय.,पदविका, पदवी व पदव्यूत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करण्याची संधी.
- प्रत्येक आर्थिक वर्षी सुमारे १० लाख प्रशिक्षणार्थी या योजनेतून निर्माण करणे.
- सदर योजनेतून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ महिन्याचा असेल, आणि या प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना विद्यावेतन शासनाकडून दिले जाईल.
- विद्यावेतन हे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.
✅👉🏻 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे: मुख्यमंत्री सहायता निधी योजना
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पात्रता
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान १८ ते जास्तीत जास्त ३५ वर्षाच्या दरम्यान असावे.
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही १२ पास/ आय. टी. आय/ पदविका/ पदवीधर/ पदव्यूत्तर असावी.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नदी केलेली असावी.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना विद्यावेतन
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेतून दिले जाणारे विद्यावेतन खालील प्रमाणे आहे.
अ, क्र. | शैक्षणिक अहर्ता | प्रतिमाह विद्यावेतन |
१ | १२ वि पास | रु. ६,००० |
२ | आय. टी. आय/पदविका | रु. ८.००० |
३ | पदवीधर/ पदव्यूत्तर | रु. १०,००० |
✅👉🏻 Mukhyamantri Tirth Yatra Yojana: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज हा लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज कसा करायचा हे आपण पाहू. सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला पोर्टलवर उजवाय बाजूला दिसणाऱ्या बॉक्स मध्ये नोंदणी नावाचा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Open नवीन पेजवर नवीन नोकरी साधक ( New Job Seeker ) या पेजवर तुम्हाला पहिल्या रकान्यात First Name तुंमचे नाव, दुसऱ्या रकान्यात Last Name तुमचे आडनाव, त्या खालील छोट्या राखण्यात आधार प्रमाणे तुमचे नाव आहे म्हणून टिकमार्क करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला खालील बॉक्स मध्ये Middle Name तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. आणि पुढील बॉक्स मध्ये तुमची जन्मतारीख DOB टाकायची आहे. त्या नंतर खालील रकान्यात तुमचे लिंग Gender निवडायचे आहे. आणि पुढील रकान्यात (Aadhaar Id) तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. खाली रकान्यात तुमचा Mobile no. टाकून पुढील रकान्यात capcha त्या खाली भरायचा आहे, आणि Next वर क्लिक करायचे आहे.
Next या बटनावर क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ती तुम्हाला खालील बॉक्स मध्ये भरून Submit वर क्लिक करायचे आहे. Submit क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमच्या आईचे नाव, तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तुमची मातृभाषा, पत्ता, पिनकोड, धर्म, वैवाहिक स्थिती, कास्ट आणि कॅटेगिरी, भरायचे आहे त्या नंतर त्या खालील बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणाविषयी माहिती भरायची आहे.
Qualification – या मध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणाविषयी माहिती भरायची आहे. शेवटच्या रकान्यात Set Password-मध्ये तुम्हाला तुमचा Password तयार करायचा आहे. हा तयार केलेला Password तुम्हाला लॉगीनसाठी लागणार आहे. Password तयार केल्या नंतर शेवटच्या हिरव्या बटनावर क्लिक करायचे आहे.
Password तयार झाल्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर तुमची ID तुम्ही तयार कलेला Password मॅसेज द्वारे मिळेल. तो तुम्हाला पहिल्या पेज वर येऊन उजव्या बाजूला असणाऱ्या बॉक्स वर टाकून LOGIN करायचा आहे. login न उंची तुमच्या या,एम्प्लॉयमेंट ची पावती काढून घेऊ शकता. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.
✅👉🏻 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024: 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज मिळणार
Conclusion
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी करा अर्ज Online या लेखा मध्ये आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या बद्दल सविस्तर माहिती व online अर्ज कसा करायचा या बद्दल जाणून घेतले. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.