टिपू सुलतान: मैसूरचा वाघ की खोट्या प्रचाराचा बळी? खरा इतिहास

मागील काही दिवसांपासून मैसूरचे राजा टिपू सुलतान यांच्याबाबत अनेकदा वाद निर्माण केले जात आहेत. सोशल मीडियावर याविषयीच्या पोस्ट अत्यंत चवीने चघळल्या जात आहेत. हिंदूविरोधी, बळजबरीने धर्मांतर करणारे अशी अनेक नव-नवीन दुषणे टिपू सुलतान यांच्यावर लावली जात आहेत. पण खरंच टिपू सुलतान हिंदूविरोधी होते का?टिपू सुलतान

टिपू सुलतान यांचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली साहब उर्फ टिपू असे होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १७५१ रोजी झाला आणि ४ मे १७९९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना सामान्यतः ‘शेर-ए-म्हैसूर’ (म्हैसूरचा वाघ) म्हणून संबोधले जाते.

आपण लहान असताना दूरदर्शन वाहिनीवर टिपू सुलतान ही मालिका पाहिलेली आहे. या मालिकेमध्ये आपण टिपू सुलतान यांना इंग्रजांसमोर न झुकणारा आणि शेवटपर्यंत इंग्रजांशी लढणारा राजा म्हणून पाहिले आहे. “शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगलेले बरे,” असे म्हणणारा म्हैसूरचा राजा म्हणजे टिपू सुलतान.

टिपू सुलतान हिंदूविरोधी होते का?

टिपू सुलतान यांच्या राज्यकारभारात अनेक हिंदू मोठ्या पदांवर कार्यरत होते. तसेच त्यांच्या सैन्यात मराठा तुकडी आणि इतर हिंदू तुकड्याही अस्तित्वात होत्या. युद्धात लढताना टिपू सुलतान शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून नेले. त्या दागिन्यांमध्ये त्यांच्या हातात ‘राम’ नाव कोरलेली अंगठी होती, ज्याचा नंतर इंग्रजांनी लिलाव केला.

टिपू सुलतान यांच्याविषयी अनेक लेखकांनी लेखन केले आहे. त्यामध्ये हरी नारायण आपटे यांनी “म्हैसूरचा वाघ” नावाची कादंबरी लिहिली आहे. तसेच मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या ‘अग्नी पंख’ या पुस्तकात मिसाईल तंत्रज्ञानाची प्रेरणा टिपू सुलतान यांच्याकडून मिळाल्याचे नमूद केले आहे.

टिपू सुलतान यांनी अनेक मंदिरे आणि मठांना देणग्या दिल्याची पत्रे आजही उपलब्ध आहेत. मुस्लिम धर्मग्रंथांबरोबरच त्यांना हिंदू धर्मग्रंथांचेही ज्ञान होते, असेही इतिहासात उल्लेख आढळतात.

वरीलप्रमाणे अनेक इतिहासकार आणि इंग्रज लेखकांनी टिपू सुलतान यांच्या विषयी लेखन केले असून, त्यामध्ये त्यांच्या कारभाराविषयी मोठ्या प्रमाणात स्तुतीपर उल्लेख आढळतात

शृंगेरी मठ आणि टिपू सुलतान

१७९१ मध्ये पेशव्यांनी शृंगेरी मठावर हल्ला केल्याची ऐतिहासिक घटना घडली. या घटनेमध्ये मठातील सोन्याच्या मूर्ती आणि दागिने लुटले गेले तसेच तेथील ब्राह्मण पुजाऱ्यांवर अत्याचार झाले. मठाधीशांनी टिपू सुलतान यांच्याकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर टिपू सुलतान यांनी मदत करून मठासाठी देणगी दिली आणि मठाची दुरुस्ती केली.

सुलतान : रॉकेट तंत्रज्ञान, बिनव्याजी बँका, साखर कारखाने ते आरमारांचा निर्माता

लेखक – सरफराज अहमद
(BBC News Marathi वर ४ मे २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखावर आधारित)

लंडनच्या लिडनहाल स्ट्रीटवर East India Company चे मुख्यालय होते. प्रसिद्ध इतिहासकार B. Sheikh Ali यांच्या मते, टिपू जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत म्हैसूर हे लिडनहाल स्ट्रीटसाठी धडकी भरवणारे आणि कंपनीच्या अस्तित्वाला हादरे देणारे केंद्र होते.

या विधानामागील अर्थ समजून घेण्यासाठी टिपू सुलतानाच्या कारकीर्दीकडे बारकाईने पाहावे लागते.

आर्थिक स्वावलंबनाची दूरदृष्टी

Tipu Sultan यांनी आपल्या राजकारणात सामान्य रयतेला केंद्रस्थानी ठेवले. व्यापाराच्या माध्यमातून लोकांची आर्थिक प्रगती व्हावी, हा त्यांचा स्पष्ट उद्देश होता.

कालिकतच्या फौजदाराला त्यांनी आदेश देताना स्पष्ट लिहिले होते की, इंग्रज व्यापाऱ्यांकडून माल विकत घेऊ नये आणि त्यांना माल विकूही नये. हा स्वदेशीचा विचार त्या काळात अत्यंत क्रांतिकारक होता.

व्यापारी कंपनीची स्थापना

टिपूंनी शेतमाल जागतिक बाजारपेठेत विकण्यासाठी व्यापारी कंपनी स्थापन केली. या कंपनीत धर्म-वर्णभेद न ठेवता लोकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले गेले.

  • 5 ते 500 इमामी गुंतवणूक – 50% नफा

  • 500 ते 5,000 इमामी – 25% नफा

  • 5,000 पेक्षा जास्त – 12.5% नफा

यातून गरीब व मध्यमवर्गीयांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

मस्कत, बहरीन, कतर, इराक, इराण आणि तुर्कस्तानसह अनेक देशांत व्यापार केंद्रे स्थापन करून म्हैसूरचा माल मोठ्या जहाजांद्वारे निर्यात केला जात होता.

‘सिल्क सिटी’चा निर्माता

टिपूंनी परदेशातील पिके भारतात आणण्याचा प्रयत्न केला. लालबाग येथे कृषी प्रयोगशाळा स्थापन करून नवीन पिकांचे संशोधन केले.

इतिहास संशोधक Irfan Habib यांच्या मते, म्हैसूरमध्ये रेशीम उत्पादनाची सुरुवात ही टिपूंच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. 21 केंद्रांत रेशीमकिड्यांचे संगोपन केले जात होते.

यामुळे म्हैसूर ‘सिल्क सिटी’ म्हणून प्रसिद्ध झाले.

साखर उद्योगात आघाडी

श्रीरंगपट्टणमजवळ पालहल्ली आणि चिन्नपट्टणम येथे दोन साखर कारखाने उभारण्यात आले. त्यातील ‘श्री अष्टग्रामा शुगर मिल्स’ विशेष प्रसिद्ध होते.

1803 पर्यंत या साखरेने जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता.

कृषी आणि करमाफी

टिपूंनी काझींना जनगणना करण्याचे आणि बेरोजगारांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले. शेती सोडलेल्या शेतकऱ्यांना नांगर, बैल आणि 20-30 रुपये देण्याची तरतूद केली.

कावेरी नदीवर धरण बांधण्याची योजना आखून जाहीर केले की, “या पाण्यावर शेती करणाऱ्याला करमाफी दिली जाईल.” 1798 च्या कोनशिलेत याची नोंद आहे.

बिनव्याजी बँका

टिपूंनी राज्यात बिनव्याजी बँका स्थापन केल्या. शेतकऱ्यांना कर्ज, शेळ्या आणि इतर गरजेच्या वस्तू पुरविल्या जात. हा सामाजिक अर्थकारणाचा आधुनिक नमुना होता.

अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती

हैदर अली आणि टिपूंनी सैन्याचे आधुनिकीकरण केले. फ्रेंच मदतीने आधुनिक शस्त्रनिर्मिती कारखाने उभारले.

1787 मध्ये फ्रान्सला पाठवलेल्या राजदूतांमार्फत त्यांनी तेथील राजाला आपल्या कारखान्यांची माहिती दिली. Louis XVI यांनाही या बंदुकांची गुणवत्ता प्रभावी वाटली होती.

रॉकेट तंत्रज्ञानाची क्रांती

टिपूंनी विकसित केलेले रॉकेट त्या काळातील सर्वात आधुनिक शस्त्र होते. 100 मीटर अंतरावर स्फोट होणारे लोहनळीचे रॉकेट त्यांनी तयार केले.

6 फेब्रुवारी 1792 रोजी कावेरीच्या दक्षिणेला इंग्रज सैन्यावर या रॉकेटचा मारा झाला. इंग्रजांना म्हैसूर जिंकल्यानंतर 600 रॉकेट लाँचर आणि हजारो रॉकेट मिळाले.

याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे नेपोलियनविरोधी युद्धात झाला, असे मत इलियास नद्वी भटकली यांनी मांडले आहे.

जहाजनिर्मिती आणि आरमार

‘फतुहात-ए-मुजाहीदीन’ या ग्रंथात टिपूंनी सैन्यरचनेचे सविस्तर वर्णन केले आहे.

1796 मध्ये 40 लष्करी जहाजे बांधण्याचे आदेश दिले. त्यांच्या आरमारात सुमारे 10 हजार सैनिक कार्यरत होते.

प्रत्येक जहाजावर 346 कर्मचारी – तोफची, मल्लाह, कारागीर, अधिकारी अशा विविध पदांवर नियुक्त केले जात.

आरोग्य सेवा आणि विज्ञान

टिपूंना वैद्यकीय ज्ञान होते. त्यांनी सैनिकांच्या उपचारासाठी स्वतः पत्रव्यवहार करून औषधे पाठवली.

‘जामिआ अल उमूर’ या विद्यापीठात युनानी प्रयोगशाळा स्थापन केली. युरोपमधील बॅरोमिटरवरील पुस्तक फारसीत भाषांतरित करण्याचे आदेशही दिले.

समृद्ध ग्रंथालय

1799 मध्ये इंग्रजांनी टिपूंचे ग्रंथालय ताब्यात घेतले. ते ग्रंथ पुढे केम्ब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठात ठेवले गेले.

1809 मध्ये चार्लस स्टुअर्ट यांनी ‘Descriptive Catalogue Of The Oriental Library Of The Late Tipu Sultan Of Mysore’ हे पुस्तक लिहिले.

जेकोबियन क्लबची स्थापना

1797 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे फ्रेंच प्रेरणेने जेकोबियन क्लबची स्थापना झाली. स्वातंत्र्य आणि समानतेच्या घोषणेसह 2300 तोफांची सलामी देण्यात आली.

इतिहासकारांच्या मते, ही घटना आधुनिक राज्यरचनेच्या दृष्टीने महत्वाची होती.

टिप:-

सरफराज अहमद हे मध्ययुगीन दख्खनच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. तसंच, ‘गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर’चे सदस्य आहेत.

निष्कर्ष

टिपू सुलतानांचे राज्य दिवसेंदिवस आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत होते. व्यापार, शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण, शस्त्रनिर्मिती आणि आरमार या सर्व क्षेत्रांत त्यांनी नवे प्रयोग केले. यासर्व बाबीमुळे इस्ट इंडिया कंपनीची डोके दुखी वाढत होती. 4 मे 1799 रोजी टिपूंचा मृत्यू झाला. त्यानंतर 1800 साली इंग्रजांनी समारंभ करून भारत आपला झाल्याची घोषणा केली.

इतिहासात टिपू सुलतान केवळ योद्धा म्हणून नव्हे, तर दूरदर्शी अर्थतज्ज्ञ, उद्योगनिर्माता, वैज्ञानिक दृष्टी असलेला शासक आणि आधुनिकतेचा अग्रदूत म्हणून ओळखला जातो.

मागील दशकात जाणूनबुजून टिपू सुलतान यांना अनेक खोट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या क्लुप्त्या लढवून बदनाम करण्यात येत आहे. यातून टिपू सुलतानसारख्या स्वातंत्र्यसेनानीचे महत्त्व कमी करून, ज्यांचे स्वातंत्र्यकाळात काहीच योगदान नव्हते, अशांना स्वातंत्र्यसैनिक बनविण्याचा हा सगळा खटाटोप काही मोजकी मंडळी करताना आपल्याला आज दिसत आहे

हे blog वाचा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top