समाज कल्याण विभागामार्फत ‘या’ कुटुंबांना मोफत जमीन वाटप; इथे करावा लागेल अर्ज

मोफत जमीन वाटप:- समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती मधील दुर्बल घटकासाठी अनेक योजना राबविल्या जातात. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांना समाजात स्वाभिमानाने जगता यावे असा उद्धेश शासनाचा आहे. मोफत घरकुल योजना, शेतीसाठी वीज पंप योजना या बरोबरच आता भूमिहीन गरीब दारिद्रय रेषेखालील लोकांना मोफत जमीन देण्याची योजना शासनाने समाज कल्याण विभागामार्फत सुरु केली आहे.

योजनेचे उद्दिष्टे

महाराष्ट्रातील गरीब भूमिहीन लोकांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण व्हावे, मागासलेल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करूनत्यांना स्वावलंबी बनविणे. गरीब कुटुंबांना आपल्या आर्थिक गरज भागविता याव्यात यासाठी शासन समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबांना मोफत जमीन वाटप करणार आहे.

योजनेचे पात्रता निकष

  • लाभार्थी हा अनुसूचित जाती तथा नवबोद्ध घटकांमधील असावा.
  • लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा.
  • लाभार्थी हा भूमिहीन असावा.
  • अनुसूचित जाती मधील परित्येकता, विधवा यांना योजनेत प्राधान्य राहील.
  • लाभार्थ्यांचे वय ६ ०  वर्षा पेक्षा जास्त नसावे, पुरुष ६ ०  वर्षा वरील असल्यास त्याच्या पत्नीला लाभ घेता येईल.
  • ज्या गावात जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्या गावाचा लाभार्थी रहिवाशी असावा.
  • ज्या गावात जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे त्या गावातील लाभार्थ्याला प्राधान्य दिले जाईल, जर गावात लाभार्थी नसेल तर लगतच्या गावातील लाभार्थ्याला लाभ दिला जाईल.

जमीन हस्तांतर प्रक्रिया

शासनामार्फत ज्या गावात जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे, ती जमीन शासनाच्या निकषा नुसार समाज कल्याण विभागामार्फत खरेदी केली जाईल. बागायती जमीन ८ लाख तर जिरायती जमीन ५  लाख प्रती एकर या प्रमाणे शासकडून खरेदी केली जाईल. खरेदी केलेली जमीन ज्या गावात खरेदी केली आहे त्याच गावातील लाभार्थ्याला दिली जाईल. त्या गावात लाभार्थी नाही मिळाला तर लगत च्या गावातील लाभार्थ्याला दिली जाईल. जमीन खरेदी करत असतांना ती खरीपात पट्टा, नदी काठची, किंवा नापीक नसावी. जमीन खरेदी केल्या नंतर शासनाच्या निकषा नुसार लाभार्थ्यांना वाटप केली जाईल.

समाज कल्याण विभागामार्फत मिळालेली जमीन लाभार्थ्याने स्वतः कसायची आहे. मिळालेली जमीन लाभार्थी कोणाला विकू शकत नाही किंवा भाडेतत्वावर देऊ शकत नाही.

मोफत जमीन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

अनुसूचित जमाती च्या दुर्बल घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या योजने अंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना विहित नमुन्यात अर्ज तयार करून तो आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडे दाखल करावा लागेल. अर्ज दाखल केल्या नंतर त्याची पडताळणी होऊन तो मंजूर करण्यात येईल. अर्ज मंजूर झाल्या नंतर जमीन खरेदीची प्रोसेस पूर्ण झाल्या नंतर ती जमीन मंजूर यादीतील लाभार्थ्यांना वाटप केली जाईल.

सारांश

समाज कल्याण विभागामार्फत ‘या’ कुटुंबांना मोफत जमीन वाटप; इथे करावा लागेल अर्ज या blog मध्ये आपण शासनाच्या समाज कल्याण विभागाने सुरु केलेल्या मोफत जमीन वाटप योजने बद्दल माहिती पहिली. अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीन आर्थिक दुर्बल घटकासाठी सदरील सुरु करण्यात आलेली आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नटे वाइकांना अवश्य शेअर करा.

हे हि वाचा :-

अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली लिंक ला टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “समाज कल्याण विभागामार्फत ‘या’ कुटुंबांना मोफत जमीन वाटप; इथे करावा लागेल अर्ज”

    1. ‘मोफत जमीन योजना’ अधिवासी (ST) समाजासाठी अशीच योजना आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून राबविली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top