रेशन कार्ड नवीन काढणे ही प्रोसेस अत्यंत सोपी असून, आपल्या जवळील कागदपत्रांच्या साह्याने नवीन रेशन कार्ड काढता येते. रेशन कार्ड शासनाकडून डीलर जाणारे एक महत्वाचे दस्तावेज आहे. शासकीय धान्य, गॅस सिलिंडर अनुदान, विविध शासकीय योजना आणि शासकीय कामात ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, या लेखात आपण रेशन कार्ड नवीन काढणे प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
रेशन कार्ड नवीन काढणे प्रक्रिया
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्याला दोन प्रक्रियेने काढता येते ऑफलाईन आणि ऑनलाईन आपण या दोन्ही पद्धती समजून घेणार आहोत.
रेशन कार्ड नवीन काढणे ऑफलाईन प्रक्रिया
महाराष्ट्रात सहसा ऑफलाईन पढणे नवीन रेशन कार्ड बनविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या जवळील कागदपत्रे जमा करून तहसील कार्यालयाला अर्ह करून नवीन रेशन कार्ड काढता येते.
- सर्वप्रथम नवीन रेशन कार्ड काढणाऱ्या लाभार्थ्याला तहसील कार्यालयामध्ये मिळणार अर्ज घेऊन त्यावर कुटुंबाची पूर्ण माहिती भरून अर्ज पूर्ण करावा लागतो.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईजचे फोटो त्या फॉर्मवर चिकटवी लागतात.
- कुटुंबात असलेल्या सर्व सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्स फॉर्म सोबत जोडायचे आहे.
- लाभार्थी महिला किंवा पुरुष जो असेल त्याचे बँक पासबुक सोबत जोडावे लागते.
- फॉर्म मध्ये असलेला रेशन दुकानदार प्रमाणपत्र भरून त्यावर रेशन दुकानदाराची सही आणि शिक्का घ्यावा लागतो.
- तयार झालेला आणि पूर्ण भरलेला फॉर्म तहसील कार्यालयातील अवाक – जावक विभागाला देऊन पोहच पावती घ्यावी लागते.
नवीन रेशन कार्ड काढणे ऑनलाइन प्रक्रिया
रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने एक पोर्टल निर्माण करून दिलेले आहे, ज्या पोर्टल वरून लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahafood.gov.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी कोणकोणती कागपत्रे लगतात ते आपण पुढे पाहणार आहोत.
https://mahafood.gov.in वेबसाईट वर आल्या नंतर नवीन रेशन कार्ड नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.
रेशन कार्ड नवीन काढण्यासाठी आवश्यक पात्रता
महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने काही अटी आणि शर्थी घालून दिलेल्या आहेत या अटी आणि शर्थी मध्ये बसणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नवीन रेशन कार्ड काढता येते.
- अर्जदार लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा कायमचा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराकडे किंवा एकत्र कुटुंब असलेल्या कुटूंबातील अर्जदाराकडे आधीपासून रेशन कार्ड नसावे.
- अर्जदाराचायचे वार्षिक उत्पन्न दिलेल्या उत्पन्न मर्यादेत असावे.
- नवीन विभक्त कुटुंबाला नवीन रेशन कार्ड काढता येते.
रेशन कार्ड नवीन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी खालील कागपत्रांची आवश्यकता असते.
- सर्व कुटुंब सदस्याचे आधार कार्ड.
- रहिवाशी पुरावा :- 1) लाईट बिल 2 )भाडे करार 3 ) घर नमुना न.8.
- नवीन विवाह झालेल्याना विवाह प्रमाणपत्र.
- कुटुंब सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर.
वारी प्रमाणे कागदपत्रे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असतात.
निष्कर्ष
नवीन रेशन कार्ड काढणे प्रक्रिया: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रोसेस या लेखात आपण रेशन कार्ड नवीन काढणे या प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती पहिली. रेशन कार्ड नवीन काढण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सोप्या आहेत. ऑफलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिक जास्त पसंती देतात.
रेशन कार्ड नवीन काढणे प्रक्रिया महाराष्ट्र – आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज कसा करावा. रेशन कार्ड पात्रता व अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन इत्यादी बाबी आपण या लेखात पहिल्या.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- PHH Ration Card: PHH रेशन कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि फायदे
- आता मेरा राशन मोबाईल ॲपच्या साह्याने करता येणार रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
- रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी: रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र
- Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा
- रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र : Ration card all online facility
- Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी
- Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया ग्रुप आयकॉन वर क्लिक करा.