राज्य शासन महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यातच आता बहिणीसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासन माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत बहिणीला व्यवसायासाठी थेट 40,000 रुपये देणार आहे. राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा या उद्देशाने राज्य शासन लाडकी बहिण योजने अंतर्गत सदरील योजना राबविणार आहे. चला जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेतून आर्थिक लाभ कसा मिळणार आहे व परतफेड कशी करावी लागणार आहे.
माझी लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना सुरु करून राज्यातील महिलांना रु. 1500 महिना सुरु केलेला आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील महिलांना सशक्त बनविण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक गरजा त्यांना पूर्ण करता याव्यात म्हणून सदरील योजनेतून महिन्याला रु. 1500 अनुदानाच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 70% महिला या योजनेचा लाभ उचलत आहेत.
लाडक्या बहिणीला व्यवसायासाठी मिळणार 40,000 रुपये
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय उभा करता यावा यासाठी सरकार लाडक्या बहिणीला रु. 40,000 हजाराचा निधी एकठोक उपलब्ध करून देणार आहे. यानिधीमधून लाडक्या बहिणींनी स्वतःचा व्यवस्य उभारून आत्मनिर्भर व्हावे हा शासनाचा उद्देश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी सदरील योजनेची घोषणा एका सभेमध्ये बोलताना केली आहे.
लाडक्या बहिणींना कसा मिळणार रु. 40,000 हजाराचा निधी आणि कशी असणार परत फेड
महाराष्ट्र शासन राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा रु. 1500 एवडा निधी अनुदान स्वरुपात देते. पण या सोबतच राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा व्यवसाय करता यावा यासाठी लाडक्या बहिनाणींना एकरकमी रु. 40,000 हजार निधी दिला जाईल अशी घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी जाहीर सभेत बोलतांना केली.
निधीची परतफेड कशी असणार
राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एकरकमी रु. 40,000 हजार व्यवसायासाठी दिले जाणार आहेत. ही दिलेली रक्कम लाडक्या बहिणीला परत कार्याची आहे, पण दिलेला निधी स्वतःच्या जवळच्या पैशातून न जाता शासन लाडक्या बहिणींना देत असलेल्या मासीक रु. 1500 या रकमेतून काटून घेणार आहे.
लाडक्या बहिणीला एकदा रु. 40,000 हजार पडले की, पुढील हप्ते हे 40,000 हजार रुपये कपात होई पर्यंत पडणार नाहीत. म्हणजे महिन्याला 1500 रुपये देण्याएवजी एकदाच 40,000 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या हातात पडणार आहेत. एकरकमी 40,000 रकमेतून महिलांना स्वतःचा छोटा-मोठा ऊद्योग व्यवसाय सुरु करता येवू शकतो.
कोणाला मिळणार लाभ
महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना सुरु झाली आणि राज्यातील जवळपास 60-70% महिलांनी या योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या महिलांना रु. 1500 महिना मिळत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केल्या प्रमाणे माझी लाडकी बहिण योजनेत पात्र असलेल्या सर्वच महिलांना सदरील योजनेचा लाभ मिळणार आहे.
सदरील योजनेची घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी केली आहे, पण या योजनेच्या अंमलबजावणीस वेळ लागू शकतो.
निष्कर्ष
लाडक्या बहिणीला व्यवसायासाठी मिळणार 40,000 रुपये – उपमुख्यमंत्र्यांची घोषणा या Blog मध्ये आपण उपमुख्यमंत्री यांनी जाहीर सभेत घोषित केलेल्या लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना एकरकमी रु. 40,000 हजार याविषयी सविस्तर माहिती पहिली. माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत शासन महिलांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी एकरकमी रु. 40,000 हजार एवढी रक्कम देणार आहे. सदरील रक्कम शासन लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या हप्त्यामधून कपात करून घेणार आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा.
अशाच माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया आयकॉनला क्लिक करा.
हे ही वाचा –