शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना: शबरी आदिवासी घरकुल योजनेतून शहरी भागासाठी उद्दिष्ठ निश्चित

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना आदिवासी विकास विभागाकडून वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या आदिवासी समाजासाठी शबरी आवास आदिवासी घरकुल योजना राबविली जाते. या योजनेतून आदिवासी समाजाच्या लाभार्थ्याला स्वतः चे घर बांधण्यासाठी शासनाकडून शबरी घरकुल योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जातो. पूर्वी या योजनेतून ग्रामीण भागासातील लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. पण आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार शहरी भागातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना शबरी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नगर पालिका, महानगर पालिका अशा शहरी भागात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालयाकडून सदरील योजनेची अंमलबजावणी करण्यात येते, शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सदरील विभागाला पाठवावा लागतो.शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

शबरी आदिवासी घरकुल योजना कोणासाठी आहे

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून वाड्या-वस्त्यावर कच्च्या, मातीच्या किंवा छपराच्या घरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविली जाते. या योजनेतून कच्चे घर असणाऱ्या आदिवासी लाभार्थ्यांना पक्के घर या योजनेतून दिले जाते. पूर्वी हि योजना फक्त ग्रामीण भागासाठी राबविली जातहोती, पण मात्र या योजनेची व्याप्ती वाढवून आता शहरी भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना हि योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण हि योजना आता शहरी भागात हि लागू करण्यात आली आहे. शासनाच्या निवीन निर्णयानुसार शहरी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेची उद्दिष्ट २०२३-२०२४

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना हि महाराष्ट्रातील बेघर, दगड-मातीचे, छप्परचे कच्चे घर असणाऱ्या आदिवासी समाजातील लाभार्थ्याला पक्के घर निर्माण करून देने. जे आदिवासी लाभार्थी उत्पन्न रु. १,०००,०० लक्ष पेक्षा कमी आहे, आणि त्यांचे राहते घर कच्चे आहे अशा आदिवासी समाजाच्या लाभार्थ्याला शासन पक्के घर बांधून देण्यासाठी सदरील योजना राबविते. आदिवासी समाजातील गरीब बेघर व्येक्तीला त्याच्या हक्काचे स्वतः चे घर उभे करून देणे हा उद्देश शासनाचा आहे. पूर्वी या योजनेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या वाड्या-वस्त्यावरील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जात होता. पण आता सदरील योजनेचा लाभ शहरी भागातील आदिवासी लाभार्थ्यांना हि देण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी जिल्हा निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास मान्यता देण्यात अली आहे.

✅👉🏻 ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी पात्रता व निकष

  • शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा आदिवासी समाजाचा असावा.
  • लाभार्थ्यांचे घर हे कच्चे दगड-मातीचे, किंवा छपराचे असावे.
  • लाभार्थ्याने चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याकडे जातीचा दाखल असावा.
  • लाभार्थ्याकडे कच्चे घर प्रमाणपत्र असावे.
  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • लाभार्थ्याने या पूर्वी इतर कुठल्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थ्याने लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
  • लाभार्थ्याने परिपूर्ण अर्ज भरून,आणि पूर्ण कागदपत्रे जोडूनच दाखल करावा.
  • सदरील योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत/ नगर पालिका /महानगरपालिका यांच्या कडून झालेली असावी, तास ठराव जोडलेला असावा.

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  2. लाभार्थ्याकडे आदिवासी असल्याचे जातप्रमाणपत्र असावे.
  3. लाभार्थ्याकडे ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका चे कच्चे घर प्रमाणपत्र असावे.
  4. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका यांच्या कडून झालेली असावी.
  5. लाभार्थ्याने प्रस्तावा सोबत ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका यांच्या कडून निवड झाल्याचे ठराव जोडावे.
  6. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  7. लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
  8. लाभार्थ्यांचे बँक पासबुक.
  9. लाभार्थ्यांचे रेशन कार्ड.
  10. लाभार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो.
  11. लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर.
  12. ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका यांचे घरकुल बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र.
  13. लाभार्थ्यांचे घर नमुना नंबर ८.

✅👉🏻 Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागीय कार्यालयाकडून शबरी आदिवासी घरकुल आवास योजना हि बेघर, कच्चे घर असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी राबविली जाते. ग्रामीण भागातील वाड्य-वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना या योजनेतून घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत होता. मात्र शहरी भागातील गरीब आणि अल्प वार्षिक उत्पन्न असणारे बेघर लाभार्थी या योजनेतून वंचित राहत होते, त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र महाराष्ट्र शासनाने नवीन GR  काढून शहरी भागातील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरी भागातील लाभार्थी हि शबरी आवास घरकुल आवास योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यासाठी त्यांना ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका यांच्या कडे मागणी अर्ज करून, त्यांच्या ठराव मध्ये नाव टाकून घेऊन वरील कागदपत्रासह प्रस्ताव तयार करावा लागणार आहे.

शासनाचा शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचा नवीन GR वाचण्यासाठी क्लिक करा

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी तुम्हाला वर दिलेल्या कागदपत्रासह प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका यांच्या ठराव आणि सही शिक्क्या सह परिपूर्ण भरलेला प्रस्ताव तालुका पंचायत समिती किंवा एकात्मिक आदिवासी विकास विभाग विभागीय कार्यालय येथे नेवून द्यावा लागणार आहे.

संपर्क कार्यालये

  • ग्रामपंचायत/ नगर पालिका/ महानगरपालिका कार्यालय.
  • तालुका पंचायत समिती कार्यालय.
  • एकात्मिक आदिवासी विकास विभाग विभागीय कार्यालय.

Conclusion

शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना या blog मधून आम्ही तुम्हाला शबरी आदिवासी घरकुल आवास योजने विषयी पूर्ण माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ शहरी भागात हि तुम्ही घेऊ शकता. आम्ही आमच्या blog च्या मध्येमातून शासनाच्या नवनवीन योजना आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आम्हाला फॉलो करा. अशाच माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top