शिक्षणाअभावी मुस्लीम समाजाचा ऱ्हास : कठोर वास्तव

मुस्लीम समाजाची आजची स्थिती पहिली तर बरेच मुस्लीम तरुण आज रोडच्या कडीला लहान सहन धंदे करतांना दिसतात. अब्दुल म्हणले कि पंचरची दुकान अशी ओळख मुस्लीम समाजाची झालेली दिसते. आजच्या डिजिटल युगात शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणाच्या जोरावर अनेक क्षेत्रांत करिअर घडविण्याच्या संधी आज उपलब्ध आहेत. गरज आहे ती आवश्यक शिक्षणात योग्य डिग्री मिळवण्याची.शिक्षणाअभावी होत आहे मुस्लीम समाजाचा ऱ्हास : कठोर वास्तव

शिक्षणाअभावी होत आहे मुस्लीम समाजाचा ऱ्हास : कठोर वास्तव

आज देशातील एकूण शेक्षणिक सर्वेक्षणाचा विचार केला, तर मुस्लिम समाजातील तरुणांचे शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून येते. 2020-21 च्या सर्वेक्षणानुसार उच्च शिक्षणात (महाविद्यालयीन शिक्षणात) मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 4.9% ते 5% दरम्यान आहे. तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात हे प्रमाण आणखी कमी असून पदवीधरांमध्ये 4% तर पदव्युत्तर शिक्षणात फक्त 2% इतकेच आहे.

मुस्लिम विद्यार्थ्यांचे शिक्षणातील प्रमाण कमी असण्यामागे अनेक कारणे

ती पुढीलप्रमाणे—

  • बऱ्याच अंशी मुस्लिम समाजात अशी धारणा आढळते की, आपल्याला सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, मग शिक्षणावर पैसा आणि वेळ खर्च करण्याचा काय उपयोग? लिहिता-वाचता आले म्हणजे पुरेसे झाले, असे मानले जाते.
  • वडिलोपार्जित व्यवसाय असल्यास, माध्यमिक शिक्षणानंतर मुलांना शिक्षणातून काढून थेट त्या व्यवसायात गुंतवले जाते.
  • काही (सुमारे 4–5%) पालकांना मुलांना पुढे शिकवायची इच्छा असते; मात्र आर्थिक अडचणींमुळे माध्यमिक शिक्षणानंतरचा खर्च परवडत नाही. त्यामुळे मुलांना शाळेतून काढून लहान-मोठ्या व्यवसायात किंवा वेठबिगारीच्या कामात लावले जाते.

काही होतकरू तरुण या सर्व अडचणींवर मात करून शिक्षण घ्यायची इच्छा ठेवतात; पण मुस्लिम विद्यार्थ्यांना हॉस्टेल किंवा शैक्षणिक खर्चासाठी शासनाकडून पुरेशी शिष्यवृत्ती मिळत नाही.

मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध न होणे, ही समाजाप्रती शासनाची उदासीनता दर्शवते. मुस्लिम समाजातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून येतात; मात्र मतदानापुरतेच मुस्लिम समाजाचा वापर करून त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

अनेक मुस्लिम आमदार व खासदार समाजाचे प्रतिनिधी असले, तरी स्वतःच्या हितापलीकडे समाजाचे हित त्यांना कधी दिसले नाही. समाजाच्या नावावर स्वतःचे खिसे भरणारे स्वयंघोषित मुस्लिम नेते आपण पाहिले असतील; पण सत्ताधाऱ्यांचे बूट चाटून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचेच भले करण्यापलीकडे त्यांची मानसिकता नाही.

शासनाकडून इतर सुविधांच्या मागण्यांपेक्षा मुस्लिम समाजाने शैक्षणिक सोयी-सवलतींवर भर दिला, तर तरुणांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येणार नाहीत. परिणामी समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढेल. शिक्षणाच्या जोरावर तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळतील आणि त्यातून कुटुंब, समाज व देशाच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल.

आज देशात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी अनेक षड्यंत्रे रचली जात आहेत. मुस्लिम समाजातील तरुण वर्ग शिक्षणाअभावी सहजपणे या षड्यंत्रांचा बळी ठरतो. संपूर्ण माहिती आणि ज्ञान नसल्यामुळे चुकीच्या मुद्द्यांवर गोंधळ घालून तरुण कायद्याच्या कचाट्यात स्वतःला अडकवून घेतात.

शिक्षणाच्या अभावामुळे समाजाचे किती मोठे नुकसान होत आहे, हे अनेकांना कळत नाही आणि परिणामी स्वतःचा तसेच समाजाचा ऱ्हास होत जातो.

निष्कर्ष

शिक्षणाअभावी मुस्लीम समाजाचा ऱ्हास : कठोर वास्तव या blog मध्ये आपण मुस्लीम शिक्षण या विषयाविषयी चर्चा केली. आज देशातील मुस्लिम समाजाची परिस्थिती सुधारायची असेल, तर शिक्षण हाच एकमेव आणि प्रभावी पर्याय आहे.

माहिती आवडली असल्यास आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा.

अमच्य ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हे हि वाचा:-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top