शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला

शेतकरी सारथी: शेतकर्‍यांना शेती करत असताना पिकांच्या वाडीसाठी आणि आणि इतर कीटक रोगराई नियंत्रणासाठी शासनाकडून मोफत कृषी सल्ला दिला जातो. कृषी सल्ला मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे हि खर्च करण्याची आवश्यकता नाही. ग्रामीण भागात शेतकरी अजून ही पारंपारिक पद्धतीने शेती करतात, बदलत्या हवामानामुळे अनेकदा शेतकर्‍याच्या उत्पनात घाट होते. शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासाठी योग्य सल्ला मिळाल्यास निश्चितच उत्पादनात वाद होईल. इतर खासगी संस्था कडून कृषी विषयक सल्ला घ्यायचा मानले तर पैसे मोजावे लागतात, मात्र शासनाच्या शेतकरी सारथी या योजनेतून विनामूल्य कृषी सल्ला मिळवता येतो.शेतकरी सारथी

शेतकरी सारथी

शेतकरी सारथी हि शासनाने शेतकऱ्यांना शेती विषयक सल्ला देण्यासाठी निर्माण केलेली योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेती पिकांनविषयी माहिती दिली जाते. पिकांचे व्यवस्थापन कशे करावे हे तुम्हाला फोन किंवा SMS द्वारे कळविले जाते. तुम्ही घेत असलेल्या पिकांवर फवारणी तसेच खत आणि इतर व्यवस्थापन कसे करायचे हे तुम्हाला शासनाच्या शेतकरी सारथी पोर्टल मार्फत सांगितले जाते. यासाठी तुम्हाला शेतकरी सारथी पोर्टल वरती जाऊन तुमची नोंदणी करावी लागते.

मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला

शेतकऱ्याला शासनाकडून शेती पीक व्यवस्थापनासाठी मोफत सल्ला दिला जातो. आपल्या मोबाईल वर फोन किंवा SMS द्वारे माहिती कळविली जाते. हि सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला शेतकरी सारथी या पोर्टल वरती जाऊन शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणी कशी करायची ते आपण पुढे पाहू.

कृषी सल्ला मोफत मिळविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी सारथी वर जाऊन नोंदणी करावी लागेल.

  • त्यासाठी तुम्हाला UMANG पोर्टल वर जाऊन Services मध्ये जाऊन कृषी Farmers वर क्लिक करा. त्या नंतर शेतकरी सारथी ला क्लिक करा.
  • शेतकरी नोंदणी या पर्यायाला क्लिक करा.

शेतकरी नोंदणी

  • तुमचे पूर्ण नाव लिहा.
  • तुमचा मोबाईल नंबर.
  • तुमची जन्म तारीख.
  • लिंग निवडा.
  • तुमचे राज्य निवडा.
  • तुमचा जिल्हा.
  • तुमचा तालुका निवडा.
  • तुमचे गाव निवडा.
  • भाषा निवडा.
  • तुमच्या जवळचे कृषी विज्ञान केंद्र निवडा.
  • तुमचे एकूण क्षेत्र टाका.
  • कृषी, शेती, आणि इतर माहिती तुम्ही निवडू शकता.
  • तुमच्या शेतातील तुम्ही घेत असलेल्या पिकांची आवड करा.
  • त्या खालील चेक बॉक्स टिक करून खालील सबमिट बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल. तुमची नोंदणी झाल्यावर कृषी विभागाकडून तुम्हाला SMS किंवा फोन द्वारे माहिती कळविली जाईल.

Conclusion

शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला या लेखात आपण शेतकऱ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या कृषी सल्ला कसा मिळवायचा या बद्दल माहिती पहिली. UMANG या पोर्टल वर जाऊन तुम्हाला शेतकरी सारथी या पोर्टल वर नोंदणी करावी लागते.

पुढील माहिती वाचा ;-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top