सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेली सारथी मार्फत मराठा विध्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या सारथी – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या मार्फत मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना राबविल्या जातात. मराठा समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, आणि त्यातून त्यांची प्रगती घडून यावी यासाठी या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. या शिष्यवृत्ती योजनेसाठी विध्यार्थ्यांना online अर्ज करावे लागतात. अर्ज केल्या नंतर सारथी पोर्टलवर विध्यार्थ्यांच्या पात्र-अपात्रतेची यादी जाहीर केली जाते. काही त्रुटी असल्यास त्या विध्यार्थ्याला पूर्ण कराव्या लागतात. या शिष्यवृत्ती योजना कोणत्या आहेत, त्यासाठी अर्ज कसा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

मराठा समाजातील विध्यार्थ्यांसाठी सारथी मार्फत पुढील शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. छत्रपती राजाराम सारथी शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना, मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी या जातीतील गुणवंत मुला-मुलींना विशेष अध्ययन करण्यासाठी “महाराजा सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती योजना” इत्यादी शिष्यवृत्ती योजना मराठा विध्यार्थ्यांसाठी राबविल्या जातात. या सारथी शिष्यवृत्ती योजनांची माहिती सविस्तर खाली पाहू.

✅👉🏻 उद्योग आधार: उद्योग आधार रजिस्ट्रेशन Online

छत्रपती राजाराम सारथी शिष्यवृत्ती योजना

सारथी मार्फत इयत्ता 9 वी. 10 वी. आणि 11 वी. च्या विध्यार्थ्यांसाठी सदरील योजना राबविली जाते. या योजनेत लाभार्थ्याला भाग घेण्यासाठी NMMS हि परीक्षा उतीर्ण झालेली असावी. NMMS वितीर्ण मात्र शिष्यवृत्ती मध्ये अपात्र असावा, अशा विध्यार्थ्याला या योजनेतून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. विध्यार्थ्याला वार्षिक रु. 9,600 शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्रता

  • लाभार्थी NMMS वितीर्ण पण शिष्यवृत्तीसाठी अपात्र झालेला असावा.
  • विध्यार्थी हा 9 वी. 10 वी.किंवा ११ वी. मध्ये शिकत असलेला असावा.
  • विध्यार्थ्याच्या आई-वडिलाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.3,50,000 इतके असावे.
  • NMMS वितीर्ण गुणपत्रक सोबत जोडावे.
  • विध्यार्थी १० वी. मध्ये असल्यास 9 वी. चे गुण 50% असावे.
  • विध्यार्थी 11 वी. मध्ये असेल तर 10 वी. चे गुण 60% असावे.

कागदपत्रे

  1. विहित नमुन्यां मधील परिपूर्ण अर्ज
  2. मागील वर्षीच्या इयत्तेचे गुणपत्रक
  3. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
  4. NMMS परीक्षा गुम्पत्रक
  5. विध्यार्थी बँक पासबुक

✅👉🏻 Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना

सारथी अंतर्गत देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतून सदरील शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेअंतर्गंत पात्र ठरलेल्या शवद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लार्गणाऱ्या पुसतकांसाठी ₹25,000/- व शिक्षण साहित्य तसेच, इतर शिक्षण खर्चासाठी ₹ 25,०००/-  अशी एकूण रक्कम ₹ 50,000/-  विध्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन जमा केली जाते.

पात्रता

  •  या योजनेंतर्गजत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विध्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ किंवा महाराष्ट्र राज्य शेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून इयत्ता 10 वी. व 12 वी. परीक्षा उतीर्ण केलेली असावी.
  •  या योजनेंतर्गजत पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विध्यार्थ्याचे इयत्ता 12 वी च्या
    परीक्षेतील गुण विचारात जातात 12 वी च्या परीक्षेत किमान 55% गुण आवश्यक आहेत.
  •  पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात डिप्लोमा धारक विध्यार्थ्याचे परीक्षेतील गुण विचारात गेतले जातील त्यसाठी डिप्लोमा परीक्षेत 55% गुण आवश्यक.
  • पद्वुत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी पदवी अभ्यासक्रमात 55% गुण आवश्यक, CGPA व CPA बाबतीत विध्यार्थ्यांचे टक्केवारी प्रमाणपत्र आवश्यक.

✅👉🏻 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना: छोट्या उद्योगांना कर्ज भांडवल योजना

 महाराजा सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती योजना

सारथी अंतर्गत महाराजा सयाजी गायकवाड यांच्या नावाने परदेशात शिक्षणासाठी जाणार्या विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजने मधून परदेशात शिक्षणासाठी जाणार्या विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, पीएच डी. इत्यादी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्रता

  • लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी हा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीतील असावा.
  • विध्यार्थ्याला परदेशातील QS world ranking मध्ये 200 च्या आत ranking असलेल्या शेक्षणिक संस्था/ विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळालेला असावा.
  • परदेशातील विध्यापिठात प्रवेश गेणारा विध्यार्थी हा पूर्ण वेळ विध्यार्थी असावा.
  • लाभार्थ्याचे वय इतर अभ्यासक्रमासाठी 35 तर पीएच डी. साठी 40 वर्ष असावे.

कागदपत्रे

  1. विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज प्रस्ताव.
  2. तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  3. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण झाल्याचे पुरावे. ( मार्कमेमो )
  4. परदेशातील QS world ranking मध्ये 200 च्या आत ranking असलेल्या शेक्षणिक संस्था/ विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळाल्या बाबतचे विना अट ऑफर लेटर.
  5. करार नामे व हमीपत्र.

सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या अधिक माहितीसाठी सारथी पोर्टल वर भेट द्या.

Conclusion

सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सदरील लेख मध्ये आपण सारथी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती बद्दल माहिती पहिली. मराठा समाजाच्या विध्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणार्या शिष्यवृत्ती योजना या विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिष्यवृत्ती उपलब्ध करून देतात. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top