सोयाबीन हे पिक महाराष्ट्रात सर्वात जास्त घेतले जाणारे पिक आहे. कमी दिवसातील आणि जास्त उत्पादन मिळवून देणारे पिक असल्याकारणाने, या पिकाला शेतकऱ्यांकडून जास्त पसंती दिली जाते. कमी-जास्त प्रमाणात होणाऱ्या पर्जन्यमानात पण तग धरून राहणारे पिक म्हणून सोयाबीन पिक ओळखले जाते. सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी योग्य पेरणी आणि खतांची निवड आवश्यक असते. आज आपण पेरणीची योग्य पद्धत आणि पिकाचे नोयोजन याबद्दल माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन /Soybean
महारष्ट्रात सगळ्यात जास्त जमिनीच्या क्षेत्रावर पेरले जाणारे सोयाबीन हे पिक आहे. हे पिक कमी किंवा जास्त पावसात तग धरून राहते. तसेच या पिकला पेरणी ते काढणी कालावधी कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना एकाच शेतात दोन पिकांचे उत्पन्न घेणे सोपे जाते. सोयाबीन पिकाला जवळच मार्केट मिळत असल्याने विक्री करण्यास सोपे जाते.
अनेक प्रक्रिया उद्योगात सोयाबीनचा वापर होत असल्याने, सोयाबीनला मागणी भरपूर प्रमाणात आहे. माघनी असल्याने व्यवस्थित भाव मिळतो.
पेरणीसाठी बियाणे निवड करतांना बियाणांची उगवण क्षमता तपासणी
सोयाबीन बियाणांची पेरणी करण्यापूर्वी त्या बियाणांची उगवण क्षमता तपासणी करणे महत्वाचे असते. बियाणे घरचे असेल किंवा बाजारातून आणलेले असले तरी त्या बियाणांची उगवण क्षमता ही कमीत कमी 60 ते 70 टक्के असावी. जी टक्केवारी येयील त्याप्रमाणात बियाणे वाढवावे. या पेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास अशा बियाणांची पेरणी करू नये.
बियाणे उगवण क्षमता घरघुती पद्धतीने कशी तपासायची
अ) सोयाबीनचे न निवडलेले 100 दाने एका गोणपाटात टाकून ते भिजत ठेवावे, आणि दोन दिवसांनी 100 दाण्यामधून किती दाण्यांना अंकुर आलेत हे चेक करावे. 100 मधून 60 किंवा 70 दाण्यांना अंकुर आल्यास ती टक्केवारी बियाणांची धरावी व त्याप्रमाणात बियाणे वाढवावे.
ब) वर्तमानपत्रावर 100 दाने टाकून भिजत ठेवल्यास अंकुर एणारे दाने बाजूला करून ते मोजून उगवण क्षमतेची टक्केवारी काढता येते.
क) साउलीखाली माती मध्ये 3 ते 5 सेंटीमीटर खोलीत 100 दाने टाकून दोन दिवसाने त्यांची उगवण क्षमता चेक करावी, (दाने टाकतांना न निवडलेले सरसकट टाकावे) अंकुर असलेले बियाणे मोजल्यास बियाणांची टक्केवारी मिळते.
अशा पद्धतीने सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासता येते.
बिजप्रक्रीया
पेरणी करतांना बिजप्रक्रीया करूनच बियाणे पेरणी करावी, बियाणांना बुर्शी लागून बियाणांचे नुकसान होऊ नाही म्हणून बिजप्रक्रीया करणे आवश्यक आहे.
अ) रासायनिक बिजप्रक्रीया पेरणीपूर्वी दोन महिने किंवा एक दिवस अगोदर करावी, कार्बोझीन 37.5 %+ थायरम 3 ग्रॅम/ प्रती किलो बियाणांना वापरावे.
ब) जैविक बिजप्रक्रीया पेरणीच्या दोन अगोदर करून सावलीत सुकवून घ्यावे, आणि 25 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मिली पी एस बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मिली प्रती एक किलो बियाणास लावावे.
सोयाबीन वाणाची निवड
बियाणे निवडतांना शक्यतो 10 वर्षातील आतील बियाणाची निवड करावी. खालील काही सोयाबीन वान महाराष्ट्रात शासनाकडून सुचविले जातात.
विधर्भ आणि मराठवाडा Soybean Vatiety ( सोयाबीन वान).
- अहिल्या -1 (NRC 124).
- JS -335.
- JS- 71-05.
- JS- 93-05.
- JS-80-21.
- MACS-58.
- परभणी सोना-(MAUS-47).
- प्रतिष्ठा ( MAUS-61-2 ).
- शक्ती (MAUS-81 ).
- MACS- 13.
- मोनेत्ता.
- प्रसाद (MAUS-32).
- PK -472.
- TAMS-38.
- फुले कल्याणी (DS 228).
दक्षिण महाराष्ट्र soybean seed variety ( सोयाबीन वान).
- MACS-124.
- MACS-450.
- पंत सोयाबीन -1029.
- पूजा (MAUS 2 ).
- प्रतिकार (MAUS 61).
- प्रसाद ( MAUS 32 ).
- MACS -13.
- मोनेत्ता आणि फुले कल्याणी (DS -228 )
पेरणी
पेरणी करत असतांना जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस किंवा जमिनीत कमीत-कमी 6 इंच ओलावा असावा लागतो. जमिनीत व्यवस्थित वापसा झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी ही शक्यतो B B F पेरणी यंत्राने करावी, B B F पेरणी यंत्र न मिळाल्यास साध्या पेरणी यंत्राची एक नळी बंद करून पेरणी करावी, आणि कोळपणी वेळेस 6 तासानंतर एक सरी काढून घ्यावी. पेरणीची ही योग्य पद्धत गणली जाते.
एकरी बियाणांची मात्रा
- सर्वसाधारण पेरणी यंत्राचा वापर केल्यास एकरी 26 ते 30 किलो बियाणे पेरावे.
- B B F पेरणी यंत्राने पेरणी केल्यास एकरी 22 किलो बियाणे पेरणी करावे.
- सरी वरंबा पद्धतीने टोकन यंत्राने पेरणी केल्यास 14 ते 16 किलो एकरी बियाणे पेरणी करावी.
- अंतर पिक पेरणी करतांना 22 किलो सोयाबीन तर 2 ते 3 किलो तूर एकरी प्रमाणात पेरावे.
पेरणीची खोली
ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत असतांना बियाणे हे जमिनीच्या 5 ते 6 सेंटीमीटर खोलीवर पडत आहे का याची खात्री करावी. बियाणांच्या खाली खत पडले पाहिजे म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर च्या खाली खताची मात्रा पडली पाहिजे हे आवर्जून तपासावे. पेरणी करत असतांना ट्रॅक्टर सेकंड लोड गेर मध्ये चालवावे. 1.960 R P M असावे. साधारणतः 45 ते 52 मिनिटात एक एकरची पेरणी व्हावी. ज्या भागात 75 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तेथे दर 6 तासानंतर एक सरी मारून पाणी काढून द्यावे.
सोयाबिन पिकासाठी रासायनिक खतांची शिफारस
- युरिया 16 किलो + 10;26;26; – 46 किलो + सिंगल सुपर फोस्पेट 75 किलो.
- युरिया 7 किलो + 12;32;16; – 75 किलो + गंधक 10 किलो.
- युरिया 26 किलो + सिंगल सुपर फोस्पेट 150 किलो + म्युरेट ऑफ पोट्याश 20 किलो.
- युरिया 6 किलो + डी. ए. पी. 52 किलो + म्युरेट ऑफ पोट्याश 20 किलो + गंधक 10 किलो.
- 15;15;15; – 80 किलो + सिंगल सुपर फोस्पेट 75 किलो.
- 18;18;10; – 67 किलो + सिंगल सुपर फोस्पेट 75 किलो + म्युरेट ऑफ पोट्याश 9 किलो.
वरील पैकी खताची एक मात्रा पेरणी करतांना द्यायची आहे. पेरणी केल्या नंतर युरिया खताची दुसरी मात्रा सोयाबीन पिकला देण्यात येवू नये, याने अतिरिक्त वाढ होऊन उत्पन्नात घट होते.
सोयाबीन पिकावर तणनाशकचा वापर
पेरणीनंतर साधारण 15 ते 20 दिवसानंतर तणनाशकचा वापर करावा मार्केट मध्ये अनेक तणनाशक उपलब्ध आहेत, आपल्या अनुभवानुसार तणनाशकचा वापर करावा. ताननाशक फवारणी करतांना पिकांना इजा होऊनाही यासाठी तणनाशक मध्ये हुमिक अॅसिडचा वापर योग्य प्रमाणात करावा अथवा फवारणी नंतर हुमिक अॅसिडचा वापर इतर कीटक नाशक मध्ये करावा. तणनाशक फवारणी झाल्यानंतर 7 ते 8 दिवस कोळपणी करू नये, 7 ते 8 दिवस झाल्यानंतर कोळपणी करण्यास हरकत नाही.
शेती आणि शेतीविषयीच्या माहितीसाठी शासनाची वेबसाईट पुढील प्रमाणे आहे – www.krushi.maharashtra.gov.in
सारांश
सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री : सोयाबिन उत्पादनवाढीचा हमखास मंत्र या लेखात आपण सोयाबीन पेरणीचे योग्य नियोजन कसे करावे या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. योग्य पद्धतीने पेरणी आणि खताचे नियोजन केल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होण्यास मदत होते. पारंपारिक पध्दत सोडून आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास निच्छित सोयाबीन पिकाच्या उत्पनात वाढ होते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला टच करा.