12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा – मार्गदर्शकतत्त्वे, पात्रता आणि कागदपत्रे

12th 17 no form: काही कारणास्तव 12 वीची परीक्षा देऊ शकलेले आणि आता परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना 12 वीच्या 17 नंबरचा फॉर्म भरता येतो. यासाठी शासनाने जाहीर केलेल्या तारखेला विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत घेऊन शासनाच्या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागते. 12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा आणि त्याला कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.12th 17 no Form

12th 17 no form म्हणजे काय?

12th 17 no form हा महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाकडून भरून घेतला जाणारा एक महत्त्वाचा फॉर्म आहे. जे विद्यार्थी काही कारणास्तव १२वीची परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाने 12th 17 no form ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. फॉर्म अंतर्गत जे विद्यार्थी घरून आपल्या स्वतःच्या तयारीने पुढील परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी शासनाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

12th 17 no form कोण भरू शकतो

  • ज्या विद्यार्थ्यांनी आपले नियमित चालू शिक्षण सोडले आहे, असे विद्यार्थी.
  • काही कारणास्तव परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी.
  • कोणत्याही शाळेत प्रवेश न घेता परीक्षा द्यायची आहे असे विद्यार्थी.
  • मागील परीक्षेत नापास झालेले आणि पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी.

12वी 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक पात्रता

  1. विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) महाराष्ट्रात किंवा राज्याबाहेरील तत्सम समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन शैक्षणिक वर्षांनंतर इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र होईल. (उदा. एखाद्या विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 किंवा जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण केली असेल, तर दोन शैक्षणिक वर्षांच्या खंडानंतर म्हणजे मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तो पात्र ठरेल.)
  2. जे उमेदवार कोणत्याही महाविद्यालयीन प्रथम वर्षाची परीक्षा (इ. 11वी) उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असतील, त्यांची नावे संबंधित महाविद्यालयाच्या हजेरी पटावर 31 मे नंतर नसावीत.
  3. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. पदविका (डिप्लोमा) धारक किंवा इतर कोणतीही शैक्षणिक अर्हता असलेला विद्यार्थी पात्र असेल.
  5. तांत्रिक/व्यवसायिक/कमान कौशल्य अभ्यासक्रम गटातील विषय निवडता येणार नाहीत.
  6. फॉर्म क्र. 17 भरून खाजगीरित्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस विज्ञान शाखेतून नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा विज्ञान विषयात किमान 35 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच ज्या महाविद्यालयास विज्ञान शाखेस मंडळाची मान्यता प्राप्त आहे, अशा मान्यताप्राप्त महाविद्यालयामार्फतच नाव नोंदणी अर्ज (फॉर्म क्र. 17) मंडळाकडे पाठविणे बंधनकारक आहे.
  7. विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेऐवजी माहिती तंत्रज्ञान हा विषय घेता येईल. मात्र सदर विषयास संबंधित कोणत्याही महाविद्यालयाने मान्यता घेतलेली असावी. तसेच त्या महाविद्यालयाची योग्यतेची क्षमता असावी.
  8. परराज्य/राष्ट्रीय मंडळांकडून इतर संबंधित मंडळाच्या इ. 10 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विभागीय मंडळाकडे पात्रता प्रमाणपत्र (Eligibility Certificate) मागणी करणे आवश्यक आहे. पात्रता प्रमाणपत्र (Eligibility Certificate) योग्य कालावधीत प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, मंडळाने वेळोवेळी वितरीत केलेल्या पत्रकानुसार दंड लागू होईल. संबंधित महाविद्यालयांनी मंडळाच्या सूचनानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.
  9. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रवेश घेणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी करतांना त्यांच्या वर्तमान पत्त्याचा (Current Address), तालुका व निवडलेली शाखा व महाविद्यालयांची यादी, विद्यार्थ्यांनी एक महाविद्यालयाची निवड करणे आवश्यक आहे. त्या महाविद्यालयाद्वारे परीक्षा दिली जाईल, पुढील प्रक्रियेसाठी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
  10. विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा देण्यासाठी आवश्यक असल्यास, त्यांना त्यांच्या पत्त्यावर असलेल्या अधिकृत डॉक्युमेंट्सची छायाप्रती सादर करावी लागेल. या संदर्भात संबंधित प्राधिकृत कागदपत्रांसह आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

नाव नोंदणी अर्जासोबत (12th 17 no form ) ऑनलाइन अपलोड करायची कागपत्रे

  1. इ.10 वी चा मूळ गुणपत्रिका.
  2. इ. 10 वी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र.
  3. इ. 10 वी / इ. 11 वी शाळा / खाजगी महाविद्यालय / इतर महाविद्यालयातून सोडल्याचा मूळ दाखला (Original T.C.) आणि दुय्यम दाखला (Duplicate T.C.) जोडणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये संबंधित महाविद्यालयीन वर्गात नियमित विद्यार्थ्यांसाठी वेश घेतला नसल्याबाबत कोणीही दाखला देणे आवश्यक आहे.
  4. इ. 11 वी परीक्षेची मूळ गुणपत्रिका.
  5. रहिवासी पुरावा-रेशन कार्ड/आधार कार्ड/मतदान ओळखपत्र/संपत्ती अधिकार कागदपत्रे यांच्या (विद्यार्थ्यांच्या/पालकांच्या) छायाप्रति जोडणे आवश्यक आहे. संबंधित नोंदणी प्रमाणपत्र जोडावे.
  6. विद्यार्थ्यांचे संबंधित नमुन्यातील हमीपत्र (संपूर्ण दस्तऐवज – फॉर्म क्र. 1).
  7. शाळा/खाजगी महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला (Original T.C.) उपलब्ध नसल्यास, दुय्यम दाखला (Duplicate T.C.) सादर करताना मूळ दाखला का सादर करू शकत नाही, याचे कारण नमूद करून, तसेच मागील दोन वर्षांत कोणत्याही महाविद्यालयात नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला नसल्याबाबतचा न्यायालयीन प्रतिज्ञापत्र (AFFIDAVIT) सादर करणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र मा. न्यायाधीशासमोर रु. 100/- किंमतीच्या जनरल स्टॅम्प पेपरवर कोर्ट फी सहित केलेले असावे. (नमुना – फॉर्म क्र. 2).
  8. पूर्वपरवानगीशिवाय खाजगी विद्यार्थ्यांचे 50 पेक्षा जास्त फॉर्म क्र. 17 न पाठविण्याबाबतचे हमीपत्र. (फॉर्म-अ)
  9. भाषा विषय तोंडी परीक्षा, पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिके पूर्ण करण्याबाबतचे हमीपत्र (फॉर्म – ब)
  10. खाजगी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांमध्ये प्रात्यक्षिके असल्यास, ती पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या सुविधा घेण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे एकत्रित शुल्क रु. 100/- भरावे लागेल.
  11. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिलेल्या, अपूर्ण कागदपत्रे जोडलेल्या किंवा कमी शुल्क भरलेल्या नावनोंदणी अर्जांवर (फॉर्म क्र. 17) कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. तसेच, पोस्टाद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  12. इ. 12वीच्या नियमित परीक्षेसाठी कोणताही (फॉर्म क्र. 17 सहित) खाजगी विद्यार्थी इतर कोणत्याही शैक्षणिक सवलतीसाठी (उदा. अनुसूचित जाती, जमाती, इत्यादींसाठी अतिरिक्त गुण) पात्र राहणार नाही. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्व माध्यमिक शाळेमार्फत किंवा खाजगी महाविद्यालयामार्फत सवलतीसाठी आवश्यक असलेला पुरावा, विहित नमुन्यात व विहित मुदतीत, प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यामार्फत मंडळ कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

  13. विद्यार्थ्यांनी ज्या पूर्व माध्यमिक शाळेत किंवा खाजगी महाविद्यालयातून खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केली आहे, त्या संस्थेस परीक्षा केंद्र देण्यात आले असल्यास, त्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा देणे बंधनकारक राहील.

12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा

महाराष्ट्र शासनाकडून 17 नंबरचा फॉर्म (12th 17 no form) भरून घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपली ऑनलाइन नोंदणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, यांच्या अधिकृत वेबसाइटवर करायची आहे. नोंदणी करण्यासाठी http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाइटवर आल्यानंतर ‘विद्यार्थी लॉगिन’ या पर्यायावर जायचे आहे.

‘विद्यार्थी लॉगिन’ या पर्यायावर आल्यानंतर ‘फॉर्म-17 (एच.एस.सी.), फॉर्म-17 (एस.एस.सी.)’ यावर क्लिक करायचे आहे. नवीन पेजवर इमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढील फॉर्म भरायचा आहे.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल ते 15 मे आहे.

निष्कर्ष

12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा – मार्गदर्शकतत्त्वे, पात्रता आणि कागदपत्रे या लेखात आपण (12th 17 no form) 12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा त्याची मार्गदर्शकतत्त्वे, पात्रता आणि कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर जाऊन 12वी 17 नंबरचा फॉर्म ऑनलाइन भरता येतो. कसा भरायचा, ते आपण पाहिले. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा:

आमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top